तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 24 June 2020

स्वाभिमानीचा बँक शाखा व्यवस्थापकांना घेराव .


आक्रमक पविञा घेत सोडविल्या पिककर्जाच्या अडचणी.


डोणगांव :- २४
 सध्या शेतकऱ्यांना पाऊस उघडल्यामुळे दुबार पेरणी करावी लागत आहे एवढे मोठे संकट शेतकर्यांच्या समोर आ करुन उभे आहे त्यातच बॕंकाकडुन   पिककर्जाच्या संदर्भात येणाऱ्या अडचणी बघता त्या  सोडविण्यासाठी व तातडीने पिककर्ज मिळवून देण्यासाठी 'स्वाभिमानी'चे जिल्हाअध्यक्ष डाॕ.टाले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्ते घेऊन बॕंकेमध्ये धडक देली.जसे जिल्यामध्ये रविकांत तुपकर यांनी पिककर्जाबाबत 'ऑन द स्पॉट फैसला' ही मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत प्रत्येक तालुक्यातील बँकांमध्ये स्वतः पोहचून ‘ऑन द स्पॉट’ तक्रारी व प्रकरणे मार्गी लावण्याचे काम रविकांत तुपकर करीत आहेत. त्यांच्या आदेशाप्रमाणे आज २४ जुन रोजी मेहकर  तालुक्यातील डोणगांव भारतीय स्टेट बँक, विदर्भ क्षेञीय कोकण ग्रामिण बॕंक, या बँकांमध्ये धडक देत शेतकर्यांच्या पिककर्जाच्या अडचणी सोडवील्या. दिड महीण्याअगोदर ज्यानी फाईल दिल्या त्यांचे पिककर्ज अजुनपर्यंत का दिले नाही आक्रमक पविञा घेऊन जाब  विचारला.यावेळी  सदर बाब ही मेहकर उपविभागीय अधिकारी गणेश राठोड तसेच तहसिलदार डाॕ.संजय गरकल यांनाही सांगितले कि बॕंकाकडुन शेतक-यांना अनावश्यक कागदपत्रे मागणी होत आहे व पिककर्ज देण्यासाठी विलंब होत आहे आपण तात्काळ येथे यावे नाहीतर तोपर्यंत येथुन उठणार नाही अशी भुमिका घेताच नायब तहसिलदार मुंडे तलाठी  मस्के  यांना घेऊन दाखल झाले त्यांच्याबरोबर चर्चाअंती सदर प्रश्नी मार्गी लागला. पिककर्ज देऊन बँका शेतकऱ्यांवर उपकार करत नाहीत त्यामुळे बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांप्रति सहकार्याची भावना ठेवावी असे आवाहन  डाॕ.ज्ञानेश्वर टाले यांनी केले तसेच शेतकऱ्यांना विनाकारण त्रास द्याल तर आम्ही सर्व बँकेतच येवून ठाण मांडु असा इशाराही त्यांनी दिला. शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी बिनधास्तपणे ‘स्वाभिमानी’ पदाधिकारी कार्यकर्त्ते यांच्या कडे मांडाव्यात असे आवाहन देखील डाॕ.टाले  यांनी केले. यावेळी महसुल व बॕंक प्रशासनाची धावपळ झाली,यावेळी पोलीस प्रशासन सुध्दा हजर होते
    यावेळी जिल्हाअध्यक्ष डाॕ.ज्ञानेश्वर टाले यांच्यासह जिल्हाउपाध्यक्ष अनिलभाऊ बोरकर प्रफुल्ल देशमुख,नितीन अग्रवाल,अमोल धोटे,गणेश जुनघरे,गणेश धाबे,सचिन मेंटागळे,पप्पु देशमुख,मिनेष बाजड प्रल्हाद खोडके,सोनु काळे,निलेश सदावर्ते,गौतम सदावर्ते,रामेश्वर वायाळ,युसुफ खान,संतोष मानवतकर,महादेव कांबळे,भुषण मोरे,शब्बीर खाॕ पठान,शे.जब्बार,शे.लियाकत,गणेश देशमुख,प्रमोद देशमुख व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.



जमील पठाण
8804935111 /8805381333

No comments:

Post a comment