तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 29 June 2020

मंगरुळपिर येथील विश्राम भवन येथे मनसेची तालुका आढावा बैठक
मंगरुळपीर-दि २६ जून शुक्रवार रोजी मनसे प्रभारी जिल्हा अध्यक्ष मनीष डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली. आढावा बैठक घेण्यात आली बैठकी ला प्रमुख उपस्थितांमध्ये  जिल्हा उपाध्यक्ष अमोल लुलेकर, नितीन शिवलकर, तालुका अध्यक्ष मनोज खडसे, मनसैनिक गजानन वैरागडे , शहर अध्यक्ष महादेव भस्मे, मनवीसेनेचे अमोल गाभणे यांची उपस्थिती लाभली . या बैठकीमध्ये सुरवातीला वरील सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. नंतर या बैठकीला सुरवात करण्यात आली.शेतकरी पीक कर्ज, दुबार पेरणीचे संकट, बोगस बियाणे,अति वृष्टी मुळे शेती खरडून जाणे अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये रवी राऊत,उदय परळीकर, अनिकेत जामकर, रुपेश लहाने,मनोज खुळे, गोपाल खुळे, गुणवंता जामकर,अजय गोदमले,संजय आंबलकर, अनिकेत शिंदे, चेतन यनडोले,मनोज इंगळे, राधेश्याम जाधव,निलेश आव्हाळे, पवन मिसाळ, विशाल आव्हाळे, इत्यादी कार्यकर्त्यांचा समावेश होता.या दोन तासांच्या बैठकीमध्ये युवा नेतृत्व लक्ष्मन जाधव यांचे नाव सर्व कार्यकर्त्यांच्या सहमताने तालुका अध्यक्ष पदासाठी समोर आले. सूत्र संचालन अनिकेत शिंदे यांनी केले . 
तर आभार मनसे जिल्हा उपाध्यक्ष अमोल लुलेकर यांनी मानले.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

No comments:

Post a comment