तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 29 June 2020

जीवनआधार भक्तीप्रेम आश्रमात वृक्षारोपण, जीवनआधार भक्तीप्रेम आश्रम वृद्ध-निराधारांसाठी आशेचा किरण-बन्सीआण्णा सिरसाट
अंबाजोगाई (प्रतिनिधी) :-  तालुक्यात जीवनाधार भक्तीप्रेम आश्रम ही संस्था ख-या अर्थाने निराधार वृध्दांना आधार देण्याचे मोठे कार्य करीत आहे.कर्तव्याला बांधिलकी मानून हा आश्रम सेवाकार्य करीत आहे.एका अर्थाने आज जीवनआधार भक्तीप्रेम आश्रम हा समाजातील वृद्ध आणि निराधारांसाठी आशेचा किरण ठरतोय असे प्रतिपादन बीड जिल्हा सहकारी मजूर संस्थांच्या सहकारी संघाचे चेअरमन बन्सीआण्णा सिरसाट यांनी केले.


शनिवार,दि.27 जून रोजी तालुक्यातील धायगुडा पिंपळा येथील जीवनआधार भक्तीप्रेम आश्रमात वृक्षारोपण करण्यात आले.याप्रसंगी बीड जिल्हा सहकारी मजूर संस्थांच्या सहकारी संघाचे चेअरमन बन्सीआण्णा सिरसाट,दीनदयाळ नागरी सहकारी बँकेचे संचालक गौतमचंद सोळंकी,डॉ.नवनाथ घुगे,अंबाजोगाई कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक बळवंत बावणे या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून जीवनआधार भक्तीप्रेम आश्रमाच्या सेवाकार्याचे कौतुक केले.यावेळी दीनदयाळ नागरी सहकारी बँकेचे संचालक गौतमचंद सोळंकी,डॉ.नवनाथ घुगे,अंबाजोगाई कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक बळवंत बावणे,गिरवली (आपेट) गावचे सरपंच सचिन आपेट,वसंतराव पतंगे,राहूल लंगे,जीवन आधार भक्तीप्रेम आश्रमाचे संचालक पवन सोमनाथअप्पा गिरवलकर, सुमीत आपेट,सर्जेराव सावरे,दत्ताभाऊ आपेट, किरण निळेकर,दत्ताभाऊ उपाडे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मान्यवरांचे हस्ते जीवनआधार भक्तीप्रेम आश्रमाच्या परिसरात 30 आंबा वृक्षरोपांचे रोपण करण्यात आले.प्रारंभी प्रास्ताविक जीवनआधार भक्तीप्रेम आश्रमाच्या सेवाकार्याची माहिती संचालक पवन गिरवलकर यांनी दिली.सर्जेराव सावरे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करून उपस्थितांचेे आभार मानले.

समाजातील दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे यावे-संचालक पवन गिरवलकर

मौजे पिंपळा धायगुडा (टी.व्ही.टॉवरच्या बाजूला) ता.अंबाजोगाई जि.बीड येथे 'जीवन आधार भक्तीप्रेम आश्रम' नांवाने सामाजिक प्रकल्प चालवला जात आहे.या आश्रमात निराधार वृध्द,अनाथ मुले यांना मोफत प्रवेश दिला जातो.आश्रमात सध्या 28 निराधार,वृद्ध,महीला व पुरूष आपले सर्व दुःख विसरून आनंदी जीवन जगत आहेत.एकिकडे दिवसेंदिवस लाभार्थीच्या संख्येत वाढ होत आहे.त्याप्रमाणे त्यांच्या देखभाली वरील खर्च ही वाढत आहे.या आश्रमाला कुठलीही शासकीय मदत वा अनुदान मिळत नाही.आश्रमाचा सर्व खर्च हा लोकसहभागातून चालवला जातो.आश्रमाच्या वतीने आवाहन करण्यात येते की,आपण सर्वांनी या समाजकार्याला आपला हातभार लावावा.दात्यांनी साहित्याच्या स्वरूपात मदत करावी.संस्थेच्या नांवे रोख किंवा चेक द्वारेही देणगी देऊ शकता.बँक डिटेल्स :- जीवनआधार सेवाभावी संस्था,गिरवली.(खाते क्र.09880200000635,/
IFSC:-BARB0AMBBHI(आयएफएससी कोड-बीएआरबीझिरोएएमबीबीएचआय),बँक ऑफ बडोदा,शाखा.अंबाजोगाई जि.बीड) अधिक माहिती किंवा जीवनआधार भक्तीप्रेम आश्रमाला मदत वा सहकार्य करण्यासाठी कृपया पवन गिरवलकर (मोबा.8857022009/ 9767711197) यांचेशी संपर्क साधावा.

No comments:

Post a comment