तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 29 June 2020

पुलाच्या बोगस बांधकामाचा शेतकर्‍यांना फटका,ठेकेदारावर कारवाईची मागणीमंगरूळपीर(फुलचंद भगत)-तालुक्यातील वाढा लगतच्या पुलाचे बांधकाम निकृष्ठ असल्याने पहिल्याच पावसात पुलाची साईडची भर वाहुन गेल्याने लगतच्या लखनसिंग ठाकुर यांच्या शेताचा धुरा पुर्णपणे खचल्या गेल्याने शेतात पाणी घुसुन पिकांचे नुकसान होवू शकते त्यामुळे या कामाची चौकशी करुन शेताच्या धुर्‍यालगत भिंत बांधुन द्यावी या मागणीसाठी प्रशासनाला लेखी निवेदन सादर केले आहे.
         महाराष्टराज्य ग्रामीण विकास संस्था वाशिमव्दारा मुर्तीजापुर ते चांभई या रस्त्याचे डांबरीकरण आणी पुलाचे बांधकाम प्रधानमंञी ग्रामसडक योजनेअंतर्गत करन्यात आले आहे.या रोडचे आणी पुलाचे काम इष्टीमेटनुसार केल्या गेले नसल्याच्या तक्रारीही सबंधित विभागाला परिसरातील शेतकर्‍यांनी केल्या आहेत.सध्या पावसाळा सुरु असुन पहिल्याच पावसाच्या पान्याने वाढा या गावाजवळ असलेल्या पुलाच्या भिंतीलगतचे काम पुर्णपणे वाहुन गेले आहे,दोन्ही साईडला कपार पडलेली आहे.यामुळे पुलही कोसळन्याची शक्यता नाकारता येत नाही.या वाहुन गेलेल्या भागामुळे शेतसर्वे नंबर ७५/२ मधील शेतीचा धुराही वाहुन गेल्याने शेतात पाणी घुसुन पिकाचे नुकसान होवु शकते.शेतकरी लखनसिंग ठाकुर यांनी एका वर्षापासुन सबंधित प्रशासनाला त्या पुलाचे काम निकृष्ट सुरु असल्याचे आणी शेतीचे नुकसान होवु शकते याविषयी तक्रारीही केल्या होत्या परंतु प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नव्हती.पहिल्याच पावसाने पुलाचे बोगस काम चव्हाट्यावर आले असुन दोन्ही बांजुची पिचिंग न केल्याने असलेली सर्व माती वाहुन गेल्याने पुलाच्या साईडला कपार पडली त्यामुळे पुलही कोसळु शकतो.दोन्ही बाजुंची माती वाहुन गेल्याने ठाकुर यांच्या शेतीचा धुराही पान्याच्या प्रवाहामुळे वाहुन गेला त्यामुळे शेतीतही पाणी घुसुन पिकांचे नुकसान होवु शकते.लखनसिंग ठाकुर यांचा शेतीवरच ऊदरनिर्वाह असल्याने पिकाचे नुकसान झाल्यास ऊपासमारी येवुन प्रसंगी आत्महत्या करन्याची वेळ येवु शकते त्यामुळे त्वरीत बोगस काम करणार्‍या सबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी आणी पुलाच्या बाजुला सरंक्षक भिंत बांधावी या मागणीचे लेखी निवेदन सर्व संबधित प्रशासकीय यंञणांना दिले आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206
     9763007835

No comments:

Post a comment