तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 31 July 2020

अखंड हरिनाम सप्ताह सकारात्मक ऊर्जेचा स्त्रोत – महंत रामगिरी महाराजगोरख पवार वैजापूर औरंगाबाद


योगीराज गंगागिरी महाराज
 173  व्या सप्ताहाची सांगता,
करोनाच्या पार्श्वभुमिवर 50 भाविकांच्या उपस्थितीत पार पडला  सप्ताह. 

सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांनी  सप्ताहाच्या माध्यमातून मानवांना ईश्वर भक्ती म्हणजे नामस्मरण, स्तोत्र पठण, ग्रंथ वाचन, ध्यान, चिंतन व संत सहवास करण्याचा आग्रह केलेला आहे.या गोष्टींनी आपली चित्ताची शुध्दी होत असते.आपल्यातील दोष निघून जाऊ लागतात व आपण शुध्द पवित्र बनतो व प्रसन्नता, सदगुण, सदविचार यांची प्राप्ती होते. नामस्मरणामुळे परमशांती मिळते. निरंतर नामस्मणामुळे कुळाची परंपरा शुध्द होते. नामस्मरण करण्यासाठी विशिष्ट काळ-वेळेचे बंधन नाही. नामाचे महात्म्य इतके अपूर्व आहे की, नाम उच्चारणारा व ते ऎकणारा दोघेही उध्दरून जातात. भक्ताचे सर्व दोषहरण करुन नाम त्याला दोष मुक्त करते, म्हणून जड- जीवांना तारणारे नामस्मरणच आहे.त्यामुळेच अखंड हरिनाम सप्ताह सकारात्मक ऊर्जेचा स्त्रोत असल्याचे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले.

श्री क्षेत्र सरला बेटावर  असलेल्या सदगुरू योगीराज गंगागिरी महाराज यांच्या 173 व्या अखंड हरिनाम सप्ताहातील सांगता पर्वाच्या किर्तन सेवेत ते लक्ष लावून अंतरी पहातात नर नारी " ज्ञानेश्वर  महाराजांच्या गौळण पर अभंगाचे विवेचन करताना महाराज म्हणाले की? ज्ञानी भक्त भगवंताकडे प्रेम मागतो तर जिज्ञासू उदारता मागतो, आमच्याकरिता ज्ञानमार्ग आहे. पण त्यांच्या लक्षात येत नाही की तो अत्यंत कठीण आहे. त्यात अभिमान नष्ट होण्याऐवजी वाढण्याचाच संभव जास्त असतो. 'ब्रहम सत्यं जगत्‌ मिथ्या' हे तत्त्व त्यांच्या बुद्धीला पटते. पण त्यांच्या अनुभवाला मात्र येत नाही. जग मिथ्या आहे असे ते म्हणतात. पण आपल्या देहाला मात्र सत्य मानतात. नुसत्या विचाराने देहाचे मिथ्यत्व अनुभवाला येणे अत्यंत कठीण आहे. कर्मठ लोक म्हणतात की, आम्ही आमच्या कर्ममार्गानेच जाणार आमचा नामावर विश्वास नाही. आम्ही कर्मानी घालून दिलेली बंधने आणि नियम यांचे पालन करणार असे म्हणून ते बंधने आणि नियम यांचे इतके काही पालन करतात की ते बंधनालाच सर्वस्व मानतात. त्यांच्या हे लक्षात येत नाही की ईश्वरप्राप्ती हे साध्य असून बंधने आणि नियम हे साधनरूप आहेत. साध्य साधण्यापुरतीच बंधने पाळायला हवीत असे महाराज म्हणाले .

व्यासपीठावर यावेळी सप्ताह समिती अध्यक्ष   वैजापूरचे आमदार  रमेश पाटील बोरनारे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, कृष्णा पाटील डोणगावकर, माजी सभापती  बाबासाहेब जगताप,  नागेबाबा पतसंस्थेचे कडुभाऊ काळे, कापसे पैठणीचे संचालक बाळासाहेब कापसे, बाबासाहेब चिडे,कमलाकार कोते,  ,सराला बेटाचे विश्वस्त मधुकर  महाराज , बाळासाहेब महाराज रंजाळे , दौलतराव मनाळ,प्रदीप साळुंके ,आदी उपस्थित होते.

गणेशराव रोकडे दादा याच्या हास्ते रोड चे उद्धाटन संपन्न
आरूणा शर्मा 
पालम दिनांक 31/7/ 2020 रोजी सकाळी पालम येथील शीतला माता मंदिर ते महादेव मंदिर रोड  तसेच समशान भूमी ते आदर्श नगर रोड चे उद्घाटन भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य गणेशराव रोकडे दादा याच्या हास्ते उद्धाघटन करण्यात आले  त्यावेळी पालम चे नगरसेवक गफार खुरेशी, मोबीन कुरेशी व सुनिल छाजड, सय्यद मिस्तरी, सुधाकर रोकडे .माऊली पौळ इतर मान्यवर व कार्यकर्ते
या वेळी उपस्थित होते अनेक दिवसा पासून या रोडची मागणी नागरीकाची होती आज गणेशराव रोकडे यानी पूर्ण केल्यामुळे या भागातील नागरीकानी अनंद व्यक्त केले

स्वतःची व कुटुंबाची काळजी घेऊन साजरी करा बकरी ईद; धनंजय मुंडे यांनी दिल्या शुभेच्छा!


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) (दि. ३१) ---- : बीड जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता उद्याची बकरी ईद घरच्या घरी साजरी करावी या आवाहनासह जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मुस्लिम बांधवांना बकरी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

यावर्षी कोरोना महामारीच्या वाढत्या प्रदूर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्वधर्मीय सण - उत्सवांना ब्रेक लागला आहे. सर्व धर्मियांनी या कठीण काळात आपले विविध सण - उत्सव साधेपणाने व घरच्या घरी साजरे करून आदर्श निर्माण केला आहे. बकरी ईद च्या  संदेशाचा प्रत्यय देऊन मुस्लिम बांधवानी हा आदर्श उत्सव घरीच साजरा करावा असे ना. मुंडे यांनी म्हटले आहे.

बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, दिवसेंदिवस वाढत जाणारे हे आकडे चिंताजनक आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्या सर्वत्र साजरी केली जाणारी बकरी ईद सुद्धा साधेपणाने साजरी करावी असे आवाहन ना. मुंडे यांनी केले आहे.

कोणत्याही ठिकाणी गर्दी न करता कुर्बानी साठी स्थानिक प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे रीतसर परवानगी घेऊनच कुर्बानी द्यावी, तसेच शुभेच्छा देण्यासाठी एकमेकांना  भेटण्याऐवजी समाज माध्यमांचा वापर करून एकमेकांना शुभेच्छा द्याव्यात असेही ना. धनंजय मुंडे यांनी आपल्या आवाहनात म्हटले आहे.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती घराघरात आणि मनामनात साजरी करा - धनंजय मुंडे


मुंबई (प्रतिनिधी) (दि. ३१) ---- : २०२० हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे, कोरोना मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत जयंती महोत्सव आयोजित न करता उद्या एक ऑगस्ट रोजी साजरी होणारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची शंभरावी जयंती घरच्या घरीच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून साजरी करावी असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

धनंजय मुंडे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती जाग्या करत, २०२० हे वर्ष आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे करत आहोत, यानिमित्ताने राज्य शासनाच्या वतीने विविध उपक्रमांचे व खास जन्मशताब्दी महोत्सव साजरा करण्याचे राज्य शासनाने ठरवले होते.
परंतु जगावर आलेल्या कोरोनाच्या संकटाने या सर्व संकल्पनाना बंधन घातलं आहे. हे बंधन शरीराला असू शकतं, पण मनाला नाही! अण्णाभाऊ साठे यांचे विचार त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून अजरामर झालेले आहेत. त्यामुळे यंदाची जन्मशताब्दी विशेष जयंती आपण घराघरात आणि मनामनात साजरी करूयात, असे धनंजय मुंडे यांनी आपल्या आवाहनात म्हटले आहे.

आपण सर्व जण लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या विचारांचे अनुयायी म्हणून, आपल्या, आपल्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावर्षीची जयंती घरच्या घरीच अण्णाभाउंच्या प्रतिमेस अभिवादन करून साजरी करू. कुठेही कोरोनाविषयक नियमांचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन आपण सर्वांनी अण्णाभाऊ साठेंच्या स्मृतींना उजाळा द्यावा, त्यांना अभिवादन करावे असे ना. मुंडे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शंभराव्या जयंतीच्या पूर्व संध्येला केलेल्या आवाहनात म्हटले आहे.

फरकंडा येथिल गायत्री पौळ दहावी परिक्षेत यश


तालुक्यातून  अभिनंदन


आरूणा शर्मा
पालम, तालुक्यातील फरकंडा येथील रहिवाशी कु. गायत्री मारोतराव पौळ या विद्यार्थिनीने नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी माध्यमिक परीक्षेत ९५.६० टक्के गूण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे.या यशामुळे तिचे कौतूक होत आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व ऊच्च माध्यमिक शालांत परिक्षेचा निकाल नूकताच जाहीर झाला. या परिक्षेत तालुक्यातील फरकंडा येथील रहिवाशी विद्यार्थिनी गायत्री हिने यश संपादन केले आहे. गायत्री नांदेड येथील केंब्रीज विद्यालयात शिकत होती. लहान पणा पासूनच शिक्षणाची गोडी अंगी असल्याने वडिलांनी नांदेड येथे शिक्षणासाठी पाठविले. रात्रं- दिवस एक करत वडिलांचा विश्वास सार्थ ठरविण्याचा तिचा मानस होता. शिवाय पुढील भविष्यात विज्ञान शाखेतून आपले शिक्षण पूर्ण करत डाॅक्टर होण्याचे स्वप्न तिला स्वस्थ बसु देत नव्हते. त्यामुळे अधिकच जोमाने तिने अभ्यास सुरु केला.गायत्री पौळ हिचे फरकंडा सह तालुक्यातून तिचे अभिनंदन होत आहे

*पेठशिवणी चेक पोस्ट गंगाखेड उपविभागीय अधिकाऱ्यांची अचानक भेट,वाहन चालकांची तारांबळ*
नांदेड जिल्हयातुन अप-डाऊन करणाऱ्यावर पोलिस कार्यवाही करण्याच्या दिलेल्या सुचना         ‌

आरूणा शर्मा 

 कोरोना संसर्गजन्य रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी परभणी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी विना परवानगी शिवाय जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश बंदीचे आदेश दिली असताना पालम- गंगाखेड तालुक्यातील शासकीय अधिकारी-कर्मचारी नांदेड जिल्ह्यातून अपडाऊन करीत आहेत अशा अधिकारी-कर्मचार्‍यांवर पोलीस कारवाई करण्याची सूचना गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी संबंधित यंत्रणेला दिली आहेत.                                 गंगाखेड येथील उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी दिनांक 29 जुलै रोज बुधवार रोजी सकाळी 10,30 वाजण्याच्या सुमारास पेठशिवणी चेक पोस्ट ला अचानक भेट दिली तसेच त्यांनी रस्त्यावर थांबून स्वतः वाहन तपासणी केली. तेव्हा अनेक रस्त्यावरून ये-जा करणारे प्रवासी वाहन विनापरवानगी चे आढळून आले .तसेच अनेक दुचाकी वाहनावर मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी बसलेले दिसून आले. त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यातून गंगाखेड आणि पालम तालुक्यातील शासकीय कर्मचारी अपडाऊन करीत असल्याचे निदर्शनास आले.पालम तालुक्यातील पेठशिवणी येथील चेकपोस्ट चा भोंगळ कारभार लक्षात आल्याने त्यांनी भ्रमणध्वनीवरून तहसीलदार पालम यांना सूचना केल्या तसेच त्यांनी विना परवानगी शिवाय जिल्ह्यात वाहनास बंदी असल्याचे व अप-डाऊन करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्या संबंधी परभणी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आदेश काढलेले असताना कर्मचाऱ्यांना समजत नाही का ? अशा कर्मचाऱ्यावर पोलीस कार्यवाही करावी अशा सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील हे रस्त्यावर थांबून लोहा आणि पालम कडून येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनास थांबून तपासणी करीत असल्याने वाहनधारकांची एकच तारांबळ उडाली असल्याची चित्र पेठशिवणी बस स्थानक परिसरात पाहायला मिळाले. दरम्यान उपविभागीय अधिकारी गेल्यानंतर पालम तहसीलदार ज्योती चव्हाण व पालम पोलीस निरीक्षक दिपक शिंदे यांनी चेकपोस्ट येथे भेट देऊन चेक पोस्टला कामावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रवासी वाहतुकीवर बारकाईने लक्ष ठेवून तपासणी करण्याची सूचना उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यानी दिले आहेत

अण्णाभाऊ साठेंची लेखणी, ही मुक्या वंचितांचा हुंकार (भिमराव परघरमोल)


              सन १९२० साल हे अनेकांगाने ऐतिहासिक ठरलेले आहे. कारण त्या वर्षामध्ये घडलेल्या घटनांनी भांडवलशाही व  ब्राह्मणवादी व्यवस्थेच्या पाठीवर ओढलेल्या आसुडांच्या व्रणांना आज परिपूर्ण एक शतक होत आहे. ते आसुडांचे व्रण  आजही ताजे आणि स्पष्ट दिसतात. ते तमाम बहुजन समाजाला लढण्याची नी जगण्याची प्रेरणा देतात. ते आसुड म्हणजे ३१ जानेवारी १९२० ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तोंड असूनही मुक्या  असणाऱ्या समाजाच्या वतीने बोलण्यासाठी  मूकनायक या वृत्तपत्राची केलेली सुरुवात. २१,२२ मार्च १९२० ला ऐतिहासिक माणगाव परिषद भरली होती. त्या परिषदेच्या विचारपीठावरून बोलताना राजर्षी शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अस्पृश्यांचे अखिल भारतीय नेते घोषित करून, तेच पुढे देशाचे नेतृत्व करतील असे भाकीत वर्तविले होते. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिषदेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना छत्रपती  राजर्षी शाहूंचा जन्मदिवस हा दिवाळी सणा प्रमाणे साजरा करण्याचे आवाहन समाजाला केले होते. अस्पृश्यता हा आमच्या देहावरील कलंक आहे त्याच्या निवारणार्थ ३० मे १९२० रोजी नागपूरला भरलेल्या परिषदेचे अध्यक्षस्थान राजर्षी शाहूंनी भूषवून त्यामध्ये बरेच निर्णय घेण्यात आले होते.त्याच प्रमाणे १ ऑगस्ट १९२० रोजी अण्णाभाऊ साठे यांचा जन्म व टिळकांचा मृत्यू या घटनांची नोंद घेणे सुद्धा इतिहासाला क्रमप्राप्त ठरले. 
           यावर्षी २०२० ला वरील सर्व घटनांचा शतकपूर्ती महोत्सव आहे. त्यानिमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न.
          अण्णाभाऊ साठे यांचा जन्म पिढ्यानपिढ्या अनेकांगाने शोषणाला बळी पडलेल्या अस्पृश्य जातींपैकी ' मांग ' जातीत झाला होता. घरात पाचवीला पुजलेले अठराविश्वे दारिद्र्य होते. घरात कोणीही शिक्षित नव्हते. परंतु तरीही आपला मुलगा शिकला पाहिजे ही अपेक्षा ठेवणाऱ्या अनेक मायबापांप्रमाणे  अण्णाभाऊंच्या मायबापांनी त्यांना शाळेत घातले. परंतु दुर्दैव हे कि, ते फक्त दिड दिवसच शाळेत जाऊ शकले. कारण त्यावेळी शाळेमध्ये पंतोजिची (शिक्षक) मनमानी  असायची. शूद्रातिशूद्रांच्या  मुलांनी शिकू नये, अशी त्यांची मनोकामना असायची. परंतु देशात  इंग्रजी शासन व  शिक्षण सर्वांसाठी खुले असल्यामुळे पंतोजी (शिक्षक) कोणालाही  नकार देवू शकत नव्हते. परंतु  शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे अनेक मार्ग त्यांना आत्मसात होते. म्हणून त्यांनी समाजामध्ये एका म्हणीचा प्रचार करून भ्रम निर्माण करण्याचे कपटी कार्य केले होते. ते म्हणजे
   *छडी लागे छमछम*
   *विद्या येई घमघम*
          ज्याप्रमाणे सायकल शिकताना चार-दोन वेळा पडून जखमी झाल्याशिवाय सायकल चालवता येत नाही, त्याप्रमाणे शिक्षकांचा मार खाल्ल्याशिवाय शिक्षण येत नाही. अशी मानसिकता तयार करण्यामध्ये मनुवादी विचारधारा पूर्णपणे यशस्वी झाली होती. परंतु असह्य मारामुळे अनेक मुलांनी शाळा सोडून शिक्षणापासून वंचित राहिल्यामुळे कित्येकांच्या जीवनाची राखरांगोळी झाल्याचे पुरावे आजही पूर्वजांकडून ऐकायला मिळतात. ही कपटी मखलाशी सर्वप्रथम महात्मा ज्योतिराव फुले यांनी हेरून त्याची नोंद आपल्या एका अखंडात घेतली आहे.तो अखंड असा,
*शूद्र लेकरा मुकामार देऊन पळवीती l*  
*चापट्या  गुद्दे  मारिती जोराने कान पिळती l*
*परंतु स्वाजातीला  शिक्षा बोधाने करिती l*
        शूद्रांना ते स्पर्श करीत असल्यामुळे हाताने मार देत होते. परंतु अतिशूद्रांना (अस्पृश्य- स्पर्श करण्यास योग्य अयोग्य) मारण्याची मोठी विचित्र पद्धत त्यांच्याकडे होती. स्पर्श न करता मारण्यासाठी जोडा, दगड, ढेकुळ जे हातात येईल ते फेकून मारायचे. काही शिक्षक टेबलवर नेहमी मातीची ढेकळे ठेवायची.
          अण्णाभाऊ साठेंची पहिल्याच दिवशी शाळेत माराने प्रताडणा झाली. म्हणून त्यांनी दुसऱ्या दिवशी मध्यांनापूर्वीच  शिक्षकांच्या डोक्यात दगड घातला. आणि शाळेकडे कायमची पाठ फिरवली. त्यांनी मारलेला दगड हा शिक्षकांना नसून तो विषमतावादी व्यवस्थेच्या ऊरात घातलेला प्रतिकत्मक पहिला टोला होता. म्हणून त्यांनी शाळेकडे पाठ फिरवली परंतु शिक्षणाकडे नाही!
        काही दिवसानंतर संपूर्ण कुटुंबाने पोटाची खळगी भरण्यासाठी वाटेगाव ते मुंबई हा तीनशे ते साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास पायी केला. मुंबईत आल्यानंतर वडिलांना गिरणी कामगार म्हणून हाताला काम मिळाल्यामुळे कुटुंबाला थोडेफार स्थैर्य मिळाले. अण्णाभाऊ मुंबईच्या सडकांवरून कामाच्या शोधार्थ फिरतांना, दुकानावरील लिहीलेल्या पाट्यावरील अक्षरे, एखाद्या दगडाची किंवा खापराची लेखणी व सडकेची पाटी करून त्यावर गिरवत होते. शिक्षणाची उत्कट इच्छा आणि विषमतावादी व्यवस्थेविरुद्ध ह्रदयात असणारी धगधगती आग, यामुळे अण्णाभाऊंनी अल्पावधीतच साक्षरता संपादित केली . स्वकष्टाने संपादेिलेली साक्षरता त्याला वाचनाची जोड, अनुभवांची गाठोडी, मनुवादी व्यवस्थेकडून पिढ्यानपिढ्या सर्वांगाने झालेले शोषण, पावलागणिक अस्पृश्य म्हणून झालेला अपमान, व्यवस्थेने नाकारलेले नैसर्गिक हक्क अधिकार, यामुळे अण्णाभाऊंची प्रतिभा आणि प्रतिमा एवढी उजळली, की त्यामधून जगावेगळी साहित्यसंपदा प्रसवली. या संपदेची दखल अनेक देशांनी घेऊन कित्येक भाषांमध्ये भाषांतरित झाली. त्यामध्ये ३४ कादंबऱ्या, १५ पोवाडे,१३ लोकनाट्य,१७ कथासंग्रह,७ चित्रपट कथा,३ नाटके,१ शाहिरी पुस्तक,१ प्रवास वर्णन (रशियाची भ्रमंती) अशी प्रदीर्घ साहित्यसंपदा आहे.
          अण्णाभाऊंच्या प्रदीर्घ साहित्य संपदेमधून एक बाब प्रकर्षाने लक्षात येते, ती म्हणजे त्यांनी आपल्या आप्तस्वकीयांच्या दुःख-कष्टांना, हाल-अपेष्टांना, त्यांच्या किळसवाण्या जगण्याला लेखणीच्या माध्यमातून मूर्त रूप दिले. हे जीवन त्यांनी स्वतःहून स्वीकारलेलं नाही, हेही सांगण्यास ते विसरले नाही.ज्यांनी ज्यांनी त्यांच्या जातीच्या अनेक पिढ्या गढीच्या पायात गडप करून वंश निर्वंशाकडे नेला त्यांच्याकडे अंगुलीनिर्देश करताना अण्णाभाऊच्या  लेखणीने थोडीही कच खाल्ली नाही. त्यांचं साहित्य हे बंद खोलीत बसून, मांडीवरच्या खुणा मोजत लिहिलेले नव्हते, तर कष्टामुळे हातापायावरील फोडातून येणाऱ्या रक्ताचे परिमापन तथा झाडाखाली तीन दगडांची चूल मांडून संसार गाडा हाकणाऱ्या, तरीही कुटुंबव्यवस्थेवर प्रगाढ श्रद्धा असणाऱ्यांचे प्रतिनिधित्व करताना लिहिलेले आहे. दुसऱ्या बाजूने पाहू गेलो असता बहुजन समाजातील अनेक लेखकांनी सुशिक्षितांनी समाजाकडे कायमची पाठ फिरवून व्यवस्थेची गुलामी पत्करण्यात धन्यता मानल्याचेही दिसुन येते.
        २०२० हे वर्ष अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीचे शतकमहोत्सवी वर्ष असल्यामुळे, अनेक लोक त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करताना त्यांना अनेक विशेषणे, बिरुदावली लावताना दिसून येतील. परंतु एक बाब प्रकर्षाने समजून घ्यावी लागेल कि, ते आजन्म आंबेडकरवादी होते. ज्याप्रमाणे आमचे उद्धारकर्ते महापुरुष महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत प्रत्यक्ष कधीच सहभागी झाले नाहीत. कारण  ते जाणत होते की, आमचा बहुजन समाज हा गुलामांचा गुलाम आहे. आमच्यावर दुहेरी गुलामी लादलेली आहे. इंग्रजांची गुलामी संपली तरी ब्राह्मण वाद्यांची गुलामी कायमच राहणार आहे. म्हणून अण्णा भाऊंनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत १६ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईमध्ये  *यह आझादी झुठी है, देश कि जनता भुकी हैl* अशा घोषणा देत आझाद मैदान ते मंत्रालय असा भव्य मोर्चा काढला होता.
            आज भारतामध्ये त्यांच्या घोषणेचा तंतोतंत प्रत्यय येतना दिसत आहे. देशाचे भूकबळी प्रमाण खूपच वाढलेले आहे. २०१९ च्या ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये भारत ११७ देशांपैकी १०२ व्या स्थानावर आहे. कोरोना   लॉकडाऊन मुळे हा क्रमांक कदाचित आणखीच वाढला असावा. अण्णाभाऊंनी ज्या समाजाच्या व्यथा आणि वेदना आपल्या साहित्यातून मांडल्या त्यापैकी ८३ कोटी लोकांचा समावेश त्यामध्ये आहे. परंतु त्यावर  कुठेही चर्चा होताना दिसत नाही.  म्हणून आम्हाला त्यांचा संदेश लक्षात घ्यावा लागेल, ते म्हणतात
*एकजुटीच्या रथावर आरूढ होऊन चलबा पूढती l*
 *मिळवून स्वातंत्र्य या जगती कमवी निज नाव l*
 *मला सांगून गेले भीमराव l*
         अण्णाभाऊ साठे यांच्या मुक्या वंचितांचा हुंकार झालेल्या लेखणीला त्यांच्या जयंती शतक महोत्सवी वर्षात जर खरीखुरी आदरांजली अर्पण करायची असेल, तर बहुजन समाजाला एकोप्याने पेटून उठावे लागेल तरच सुस्तावलेली यंत्रणा जागृत होऊन आमची दखल घेईल, अन्यथा!!.......

                    भिमराव परघरमोल
             व्याख्याता तथा अभ्यासक
            फुले शाहू आंबेडकरी विचारधारा
                    तेल्हारा जी. अकोला
                  मो. ९६०४०५६१०४

शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी 5 दिवसांची मुदतवाढ,पुरोगामी पञकार संघाच्या मागणीला यश


जिल्हाध्य फुलचंद भगत यांनी मुदतवाढीसाठी दिले होते निवेदन

मंगरुळपीर :- आधी कृषी सेवा केंद्रांचा संप सुरू असताना जनता कर्फ्यु पाळल्यानंतर 7 दिवसाचा लॉकडाऊन पाळण्यात आला आहे शेतकऱ्यांची अनेक कामे प्रभावित होण्याची शक्यता असून एकीकडे कोरोनाची भीती असतांना ताळेबंदीचा फटकाही बसणार असल्याचे दिसून येत होते. सर्व्हर बिझी असणे व इंटरनेट कनेक्टिव्हिटी मधील अडचणी पाहता शेतकऱ्यांना ऑनलाइन पीक विमा भरण्यासाठी  मुदतवाढ देण्याची मागणी पुरोगामी पञकार संघाचे जिल्हाध्यक्ष फुलचंद भगत यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे लेखी निवेदनाव्दारे केली होती.शासनाने मागणीचा सकारात्मक विचार करुन 5  दिवसाची मुदतवाढ दिली आहे.
           कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून लोकांच्या मनात याबाबत भीतीचे वातावरण आहे. तसेच कोरोना काळात दीर्घ लॉक डाऊनमुळे आधीच सामान्य मजुरवर्ग, लघु व्यावसायिक यांचे कंबरडे मोडलेले आहे पगारदारांचे पगार मात्र सुरू असताना याचे नुकसान जास्तीत जास्त गरीब व मध्यमवर्गीय लोंकांना झेलावा लागणार आहे मंगरूळपीर  शहरांमध्ये तसेच लगतच्या काही गावांमध्ये १५ जुलैपासून सात दिवस कडक लॉकडाऊन करण्याचा पाळण्यात आला आहे. या कालावधीत सर्व दुकाने, आस्थापना, खासगी कार्यालये, पेट्रोलपंप, बँक बंद ठेवण्यात आल्या होत्या. मंगरूळपीर शहरांमध्ये १५ जुलै ते २१ जुलै २०२० (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत सात दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आला आहे. या कालावधीत संचारबंदीची कठोर अंमलबजावणी करण्यात आली  संपूर्ण लॉकडाऊन काळात दवाखाने, मेडिकल स्टोअर २४ तास सुरु राहतील. तसेच दुध व भाजीपाला विक्री सकाळी ७ ते १० वाजेपर्यंतच सुरु होती. याशिवाय इतर सर्व दुकाने, आस्थापना, खासगी कार्यालये, पेट्रोलपंप बंद होती. सर्व प्रकारची सार्वजनिक व खासगी वाहतूक बंद ठेवून. घरगुती गॅस व पिण्याच्या पाण्याचा पुरवठा घरपोच करण्यास मुभा देण्यात आली. लॉकडाऊन काळात मंगरूळपीर  शहरातील सर्व बँक शाखा बंद होत्या. या काळात नागरिकांना राष्ट्रीयकृत बँक खात्यातून १० हजार रुपये पर्यंत रक्कम घरबसल्या काढण्याची सुविधा डाक विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आली सकाळी ७ ते १० वा. पर्यंतच्या काळात एटीएममधून पैसे काढण्यास मुभा होती. या सगळ्या प्रकारात शेतकरी व शेतमजूर हे भरडल्या जाणार असल्याने आधी विविध मागण्यांसाठी 3 दिवस कृषी सेवा केंद्रांनी संप व बंद पाळला त्यामुळे 3 दिवसात शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता त्यानंतर सोमवारी हा बंद मिटला तरीही सोमवारीपासून जनता कर्फ्यु पाळण्यात आल्याने मंगरुळपीर शहरातील कृषी सेवा केंद्र बंद होती मंगळवार 14 रोजी एक दिवस सुरू राहिल्यानंतर पुन्हा बुधवार 15 पासून 7 दिवसांचा लॉक डाऊन करण्यात पार पडला आहे त्यामुळे या सर्वांचा फटका शेतकऱ्यांना नकीच बसणार आहे एका दिवसात पैसे आणून काही घेणे त्यांना शक्य होणार नसून कृषी केंद्रांचा बंद मिटल्यानंतर आता पूर्वपदावर येण्याची आशा आतांना कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याचा फटका मंगरुळपीर शहराला बसला असून जिल्हाधिकारी यांनी 7 दिवसांचे लॉक डाऊन जाहीर करून कडकडीत बंद पाळण्याचे संकेत दिले होते आधी 3 दिवसांचा व्यापारी व संघटनांच्या हट्टाने पाळलेला जनता कर्फ्यु पाहता मंगरुळपीर शहराला 10 दिवस बंदचा फटका बसला आहे पगारदार,मोठे व्यापारी यांच्यावर याचा काही एक फरक पडणार नाही पण शेतकरी, शेतमजूर,मध्यमवर्गीय कुटुंबे,लघु व्यावसायिक यांचे या वर्षातील लॉक डाऊन मुळे हळू-हळू कंबरडे मोडणार आहे त्यामुळे असे उपाय करण्यात येत असताना समाजातील कमकुवत घटकांना धक्का पोहचू नये यासाठी वेळेत कपात करणे,ठराविक वेळा आखून देणे, गावपातळीवर सेवा पुरविणे, फिरत्या विक्री सेवा केंद्राची व्यवस्था करणे यासारखे  उपाय आखणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे पीक विमा योजनेला विशिष्ट मुदत असून त्यात तो भरला गेला पाहिजे त्यासाठी सेतू सेवा केंद्र रात्री 10 पर्यंत सुरू ठेवण्यास मुभा मिळाली परंतु  इंटरनेट ची स्पीड ची अडचण, कनेक्टिव्हिटी ची अडचण, सर्व्हर बिझी असणे यामुळे पीक विमा ऑनलाइन भरण्यास अनेकदा बराच वेळ खर्ची जातो त्यात सभासदांची संख्या पाहता सायबर कॅफे,सेतू केंद्र यांना या काळात दिवसरात्र काम करून विमा भरावा लागत ही केंद्रही 3 दिवस जनता कर्फ्यु मुळें बंद होती पुन्हा 7 दिवस लॉक डाऊन मुळे चा फटका बसल्याने  शेतकऱ्यांना मोठी अडचण होऊ शकते त्यांना कमी कालावधीत विमा भरावयाचा असल्याने राहून गेल्यास खूप नुकसान होऊ शकते त्यामुळे शेतकरी पीक विमा भरण्यापासून वंचित राहू नये याची काळजी घेणे आवश्यक आऊन त्यासाठी  पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी पुरोगामी पञकार संघाचे जिल्हाध्यक्ष फुलचंद भगत यांनी केली होती. समाजात कोरोनाची भीती असली तरीही इतर कारणांनी लोकांना अडचण येऊ नये हे पाहणेही तेवढेच आवश्यक आहे . शेतकरी व शेतमजुरही याला अपवाद नसून  त्यांनाही कोरोनाची भीती आहे मात्र दुसरीकडे शेतीचा वर्षभराचा हंगाम आहे विविध कामांसाठी त्यांना शहरात यावे लागणार आहे.शेतकर्‍यांना पिक विमा भरन्यासाठी किमान १० दिवसाचा अवधी वाढवुन द्यावा अशी मागणी महाराष्ट पुरोगामी पञकार संघाचे जिल्हाध्यक्ष फुलचंद भगत यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाव्दारे केली होती.प्रशासनाने दखल घेत ही मुदत वाढवली आहे.आता शेतकरी आपला पिकविमा 5 तारखेपर्यत आॅनलाईन भरु शकणार आहेत.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206
     9763007835

मंगरुळपीर नगरपरिषदेचा नागरीकांच्या जिवाशी खेळ,हजारो लिटर पाणी रस्त्यावरमंगरूळपीर(फुलचंद भगत)-येथील न.प.चा नियोजनशुन्य व ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असुन बिरबलनाथ मंदीराजवळील मुख्य चौकात पाईपलाईन फुटल्याने पान्याचे ऊंचच उंच फवारे वर ऊडत होते,तिथुनच गेलेल्या विजतारांपर्यत हे पान्याचे फवारे ऊडत असल्याने अपघात होन्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच ही पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी तासनतास रोडवरुन वाहत असल्याने असा पान्याचा अपव्ययही होत आहे.याविषयी समाजसेवक नितीन विटकरे यांनी प्रशासनाला कळवले असता थातुरमातुर ऊत्तरे देवुन वेळ मारुन नेन्याचा प्रकार करन्यात आला.या न.प.च्या ढिसाळ कारभाराची चौकशी करुन संबधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.

फुलचंद भगत,वाशिम
मो.8459273206

शेतकऱ्यांच्या पिककर्जासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले 'हे' आवाहन!बीड (दि. ३०) ---- : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येणाऱ्या पीककर्जाच्या संबंधित एक महत्वपुर्ण निर्णय घेतला असून, पीक कर्जापासून एकही पात्र शेतकरी वंचित राहू नये यासाठी संबंधितांना आदेश दिले आहेत.

पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या निर्देशानुसार खरीप हंगाम २०२० - २१ मध्ये पीक कर्जासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना विविध कारणांमुळे कर्ज मिळत नाही , त्यांना तलाठ्यांमार्फत आपली माहिती सादर करण्याचे आवाहन केले आहे.

संबंधित शेतकऱ्यांनी आपली माहिती आधार कार्ड, पॅन कार्ड, गावचे नाव, मोबाईल क्रमांक, शेतकऱ्याचा एकूण लाभक्षेत्र यासह सविस्तर माहिती विहित नमुन्यामध्ये सादर करण्याबाबत आवाहन केले आहे.

ना. मुंडे यांनी जिल्हाधिकारी यांना निर्देशित केल्याप्रमाणे सदर आदेशान्वये, संबंधीत शेतकऱ्यांचे अर्ज घेऊन ते तलाठी - मंडळ अधिकारी यांचेमार्फत मार्गी लावून त्यांना पीक कर्ज मिळवून देण्यासाठी कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

तसेच गावातील सेवा सहकारी संस्था किंवा जिल्हा बँकेच्या यादीत एखाद्या शेतकऱ्याला पीक कर्जासाठी अपात्र ठरवले असल्यास त्याचे अपात्रतेचे कारण लेखी स्वरूपात देण्याचेही या आदेशात म्हटले आहे.

दरम्यान सर्व पात्र शेतकऱ्यांनी पीककर्ज घेण्यासाठी आवश्यक करवाई करावी तसेच प्रशासनाने शेतकऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन ना. मुंडे यांनी केले आहे.

"जनतेसाठी सदैव तत्पर" कन्हेरवाडीचे सरपंच श्री राजेभाऊ फड याच्या वतीने गावातील "सात " मुलीच्या लग्नासाठी प्रत्येकी दहा हजार रुपयांची रोख मदतपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  कन्हेरवाडी चे सरपंच तसेच रासपा चे युवा प्रदेशाध्यक्ष  श्री  राजेभाऊ फड यांच्या वतीने गावातील  "सात" मुलींच्या लग्नासाठी प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत देऊन ही सेवा अखंडित सुरू ठेवण्यात आली .
दी.31 जुलै 2020 रोजी कन्हेरवाडी गावातील आत्माराम भगवान फड , वचिष्ट तुकाराम पांचाळ, एकनाथ तुकाराम पांचाळ, सखाराम गंगाराम फड, प्रल्हाद जनार्दन रोडे,  बालासाहेब भानुदास मुंडे, वसंत रघुनाथ पवार,  यांच्या मुलीच्या लग्नासाठी प्रत्येकी घोषणा केल्या प्रमाणे गावचे सरपंच श्री राजेभाऊ  फड वतीने ही रक्कम देण्यात आली या वेळी सरपंच श्री राजेभाऊ फड , सहकारी सोसायटी चेअरमन श्रीरामजी मुंडे  सहकारी सोसायटी  व्हॉ. चेअरमन नाथराव फड, स.सो.सदस्य गुंडीबा फड, नामदेव खांडे, मिनीनाथ फड , सोपानराव पांचाळ, हनुमंत पांचाळ, महादेव मामा मुंडे,  दिनकर फड, बालासाहेब पांचाळ, मधुकर मुंडे( टेलर), नागनाथ आप्पा , बबन मंदे, सुनील फड, नंदकिशोर पांचाळ, जीवन पांचाळ,  राजू फड,  यांच्या सह इतर नागरिक उपस्थित होते.

अनिल मुंडे यांची अ. भा. भ्रष्टाचार निर्मूलन समिती परळी ता. अध्यक्षपदी निवडपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  येथील अनिल  ज्ञानोबा  मुंडे  यांची  नुकतीच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष  समितीच्या परळी  तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 
    या  बाबत राष्ट्रीय  अध्यक्ष प्रदीप पाटील  खंडापूरकर यांनी  अनिल  मुंडे यांना  नियुक्ती पञ दिले आहे. टोकवाडी येथील अनिल मुंडे हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. 
    समाजातील सर्व  सामान्यांचे या  संघटनेच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्यासाठी आपण काम करणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले. त्यांच्या या  निवडीबद्दल सर्वञ त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी विद्यार्थ्यांना अर्ज दाखल करण्याचे आवाहन


बीड, (प्रतिनिधी) :- दि. 31 साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत असून या योजनेसाठी मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील इयत्ता 10 वी, 12 वी, पदवी, पदव्यूत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी या अभ्यासक्रमामध्ये सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात सरासरी 60% किंवा जास्त गुण प्राप्त झालेल्या विद्यार्थी , विद्यार्थीनींकडून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय बीड कडून अर्ज मागविण्यात आले आहेत. 

सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इ.10 वी, 12 वी, पदवी, पदव्यूत्तर
वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी सरासरी 60% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या जिल्ह्यातील प्रथम 3 ते 5 विद्यार्थ्यास निधीच्या उपलब्धते नुसार शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येणार आहे. सदरील शिष्यवृत्ती योजनेचा शिष्यवृत्ती मागणी अर्ज जिल्हा कार्यालयाच्या ईमेल आयडीवर (slasdcdobeed@gmail.com) किंवा प्रत्यक्ष जिल्हा कार्यालयामध्ये दि.10 ऑगस्ट 2020 पर्यंत सादर करावे.

त्याप्रमाणे सदर योजनेचा अर्ज भरत असताना अर्जासोबत जातीचे प्रमाणपत्र,मार्कमेमो,फोटो, पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा उदा. प्रवेशपावती किंवा बोनाफाईड, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रेशनकार्ड, आधारकार्ड, इत्यादी कागदपत्रे जोडणे आवश्यक असून संपूर्ण भरलेला अर्ज साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय बीड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय
विश्रामगृहासमोर, नगर रोड, बीड येथे दि.10 ऑगस्ट 2020 पर्यंत दोन प्रतींमध्ये अर्ज दाखल करावेत असे आवाहन व्ही. एस. सोनवणे, जिल्हा व्यवस्थापक बीड यांनी केले आहे.

सदर शिष्यवृत्तीचे वितरण करण्यासाठी जास्त टक्केवारी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची गुणानुक्रमानुसार निवड महामंडळाच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयाकडून उपलब्ध निधीच्या प्रमाणात केली जाते.

शेख मोहम्मद फरहाल मोहम्मद जमील चे दहावीत ९९% टक्के घेऊन घवघवीत यशपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत शेख मोहम्मद फरहाल याने ९९% टक्के गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले असून याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
 परळी शहरातील मलीकपुरा  येथील मोहम्मद जमील यांचा मुलगा मोहम्मद फरहाल  यांनी दहावी बोर्ड परीक्षेत ९९% टक्के घेऊन घव घवीत यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल शिक्षक परिवार, नातेवाईक, मित्रपरिवार व परळी शहरातील नागरीकानी कौतुक करून अभीनंदन व्यक्त केले.

अभिनव विद्यालयाचे दहावी परीक्षेत घवघवीत यश शाळेचा निकाल 96.38 टक्के


प्रयत्नशील विद्यार्थ्यांना यश मिळत असते-साहेबराव फड

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  ज्ञानप्रबोधिनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अभिनव विद्यालय नेहरू चौक परळी येथील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे या यशाबद्दल संस्थेचे सचिव परळी भूषण साहेबराव फड व संस्थेचे अध्यक्ष राजेभाऊ जब्दे व संस्थेच्या उपाध्याक्षा सौ . गयाबाई साहेबराव फड यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे . शाळेतील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेतील यशाची परंपरा राखत यावर्षी एकूण शाळेचा निकाल 96 .38 एवढा लागला आहे यामध्ये सेमी च्या वर्गातून प्रथम कु . हालगे भक्ती भिमाशंकर _ 98.8O, द्वितीय चि . शास्त्री मयुरेश विजयकुमार -96 .2O, तृतीय चि . सोळंके संकेत ज्ञानोबा _ 95.4O टक्के गुण प्राप्त केले आहेत तसेच मराठीच्या वर्गातून प्रथम कु . वाघमारे आयोध्या सूर्यकांत _ 92.4O, द्वितीय कु . पोतदार स्वाती राजेंद्र _ 88.4O, तृतीय लांडगे गायत्री गुणाजी-85 टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे तसेच शाळेतून विशेष प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी संख्या 33 तर प्रथम श्रेणीमध्ये27 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत दरवर्षीपेक्षा यावर्षी निकालाचे प्रमाण वाढून गुणवत्तेचे प्रमाणही वाढले आहे याबद्दल संस्थेचे सचिव परळी भूषण साहेबराव फड व संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ जब्दे व संस्थेच्या उपाध्याक्षा सौ . गयाबाई साहेबराव फड यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे स्वागत केले आहे तसेच शाळेचे मुख्याध्यापक  व सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे शाळेच्या निकालाबाबत व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल पालकांनीही मोठ्या प्रमाणात शाळेला शुभेच्छा दिले आहेत तसेच शाळेतून सेमी वर्ग व मराठी वर्ग यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सत्कार संस्थेचे सचिव परळी भूषण साहेबराव फड व संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ जब्दे व संस्थेच्या उपाध्याक्षा सौ . गयाबाई साहेबराव फड यांनी केला यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी शाळेचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी या सत्कार सोहळ्याला उपस्थित होते.

विद्यावर्धिनी विद्यालयाचे माध्यमिक शालान्त परीक्षेत देदीप्यमान गरुड झेपपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
      नुकताच माध्यमिक शालान्त परीक्षेचा मार्च 2020 चा निकाल जाहीर करण्यात आला आहे त्यात परळीच्या विद्यावर्धिनी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देदीप्यमान यश मिळवले आहे शाळेचा निकाल       टक्के लागला असून 53 विद्यार्थ्यांद्वितीय तरनी 90 टक्क्यांच्यावर गुण घेतले आहेत
22 विद्यार्थ्यांनी संस्कृत या विषयात 100 पैकी 100 गुण घेतले आहेत.2 विद्यार्थ्यांनी गणित या विषयात 100 पैकी 100 गुण घेतले तर 1 विद्यार्थ्यांने विज्ञान या विषयात 100 पैकी 100 गुण घेतले आहेत
       कु स्नेहल महादेव मुंडे ही विद्यार्थ्यांनी 99.60% गुण घेऊन शाळेतून प्रथम आली तर चि आदित्य सुदाम आंधळे हा विद्यार्थी 99% गुण घेऊन द्वितीय आला तर चि वनवे तुषार जगन्नाथ हा विद्यार्थी 98.60% गुण घेऊन शाळेतून तृतीय आला.
   90 %च्यावर गुण घेणारे शाळेतील विद्यार्थी गुण यादी खालील प्रमाणे
 1 कु मुंडे स्नेहल महादेव।         99.60
 २ चि आंधळे आदित्य सुदामराव 99
 3 चि वनवे तुषार जगन्नाथ         98.60
 4 कु वाव्हळे तेजश्री तानाजी     98.40
 5 कु बनसोडे ऋतुजा विजय     98.40
 6 कु कराड शिवानी मदन          98.40
 7 चि राठोड मंथन रमेश            97.80
 8 कु.फड भाग्यश्री गोविंद              97.40
 9 कु.कांदे अमृता गोविंद                97.40
10 कु.वाघमारे नेहा शिवणारायण   97.20
11 कु. चौहान तमन्ना शशिकांतसिंग 97.00
12कु. पेटेवार आदित्य गोविंदराव     97.00
13चि. केंद्रे अक्षय अंगदराव            96.80
14कु. रोडे प्रतीक्षा धम्मपाल            96.60
15चि. गिराम रितेश मोहन              96.60
16कु.मुंडे पंकजा विष्णू                   96.40
17कु.मुंडे ऋतुजा श्रीहरी                 96.40
18कु.भास्कर स्नेहा संतोष                96.40
19चि. फड ऋषिकेश सोपान            96.20
20कु.सोनपीर हर्षदा सुनील              96.00
21कु.डापकर नंदिनी माणिक             95.80
22कु.गित्ते संध्या सुभाष                    95.60
23चि.वाघमारे तेजस लक्ष्मीकांत         95.20
24कु.दहिफळे देवयानी सुशेन             95.00
25चि. सारडा विनायक गिरीश            94.80
26कु.नागरगोजे साक्षी गोविंद              94.60
27कु.ताटे अंजली शंकर                     94.40
28कु.मुंडे गायत्री काळभैरव                94.40
29कु.नाईकवाडे अमृता श्रीराम            94.20
30कु.फड अश्विनी शिवाजी                  93.80
31कु.फड शीतल वसंत                      93.60
32कु.तांबडे गीता संजीवन                  93.00
33चि. कांदे श्रेयस सौदागर                  93.00
34चि.उदगीरकर दिग्विजय रमाकांत     93.00
35 कु गुजर ऋतुजा रमाकांत।              93.00
36 कु गडेकर गौरी बालासाहेब             92.80
37 चि पुजारी श्रीनाथ सुभाष               92.20
38 चि बोन्दरे श्रद्धा माणिक                 92.20
39 चि काकडे प्रेमनाथ सत्यप्रेम।          92.00
40 चि भंडारी हर्ष शिवकुमार।              91.80
41 चि मोरे वैजनाथ सुधाकर।               91.80
42 कु दौंड निकिता ज्ञानोबा                 91.40
43 चि शेंदरे आकाश पुनमसिंग।           91.40
44 चि तांबडे चैतन्य संदीपान।              91.20
45 कु नाईकवाडे ऋतुजा रत्नाकरराव।   91.20
46 कु मुंडे ममता महादेव।                    91.20
47 कु कलिंदर साक्षी राजकुमार।           91.00
48 चि सावजी प्रथमेश बालाजी।          91.00
49 कु टकले वैष्णवी संतोष                 90.40
50 चि कुरकुट चेतन लालचंद               90.40
51 कु फुन्ने गायत्री संजय।                     90.40
52 चि हेरकर कार्तिक सदाशिव              90.00
53 कु वाघमारे अनुजा राजेंद्र                 90.00 वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे सचिव श्री. पी जी इटके तसेच कार्यकारणी सदस्य श्री भिंगोरे,श्री एम टी मुंडे ,श्री पैंजणे, श्री कोळगे, श्री एस जी कुलकर्णी ,श्री चेवले ,श्रीमती पुष्पाताई अभंग तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री मातेकर, श्री नांदूरकर व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे आणि पुढील उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

; हिंगोलीतील रेल्वेच्या मोकळ्या जागेत धान्याचे गोदाम बांधणार -


केंद्रीय अन्न पुरवठामंत्री रामविलास पासवान यांची मंजुरी

हिंगोली :प्रतिनिधी 

 हिंगोलीत हळद संशोधन केंद्रास मंजुरी देण्यासाठी राज्य शासनाने हिरवा कंदील दर्शविल्यानंतर  खासदार हेमंत पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी आणखी एक आशेचा किरण निर्माण केला आहे. हिंगोलीतील रेल्वेच्या मोकळ्या जागेत केंद्र सरकारच्या अन्नपुरवठा विभागाकडून ५० लाख मेट्रीक टन क्षमतेचे गोदाम बांधण्याची मागणी केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे केल्यानंतर या विषयात मागील महिन्यात झालेल्या सचिव स्तरावरील बैठकीनंतर मंजुरी देण्यात आली आहे.
खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात हिंगोलीत ओस पडलेल्या या जागेत शेतकऱ्यांनी पिकवलेल्या अन्नधान्याचा साठा करण्यासाठी मोठे गोदाम उपलब्ध करण्याची मागणी केली होती. त्यावर केंद्रिय मंत्री रामविलास पासवान यांनी मागील महिन्यातील १८ जून २०२० रोजी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे वाणिज्य मंत्रालयाचे सहसचिव अनंत स्वरुप, रेल्वेमंत्र्यांचे खाजगी सचिव डॉ. रविकांत गुप्ता, रेल्वे भुविकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष वेदप्रकाश डुडेजा, रेल्वे मंत्रालयांच्या संयुक्त कंपनीचे कार्यकारी संचालक अजय शर्मा, मालमत्ता विभागाचे कार्यकारी संचालक ए. के. सिन्हा, अन्न महामंडळाचे कार्यकारी संचालक रविंद्र अग्रवाल तसेच सरव्यवस्थापक रजत शर्मा या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीस खा.हेमंत पाटील हे देखील उपस्थित होते. त्या बैठकीत हिंगोली येथे रेल्वेच्या मोकळ्या जागेवर धान्य साठवण्यासाठी गोदाम उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
खासदार पाटील हे केंद्र सरकारच्या वाणिज्य समितीचे सदस्य आहेत. हिंगोली येथे हळद संशोधन केंद्र स्थापन करण्याच्या त्यांनी केलेल्या मागणीला राज्य शासनाने दिली आहे. शेतकऱ्यांच्या शेतमाल व अन्नधान्याला न्याय मिळवून देण्यासाठी  खा. पाटील यांचा केंद्र आणि  राज्यसरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. हिंगोली येथील रेल्वेच्या मोकळ्या जागेची चाचपणी वखार महामंडळाने केली असून या ठिकाणी लवकरच ५० लाख मेट्रीक टन साठवणूक क्षमतेचे गोदाम उभारण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. हिंगोलीसह नांदेड, वाशिम, परभणी व यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या गोदामाचा मोठा फायदा होणार आहे. रेल्वेमार्गांनी येणारे खत, बियाणे, सिमेंट किंवा पाठवला जाणारा कच्चा माल साठविण्यासाठी हे गोदाम उपयोगी पडणार आहे. 
नांदेड विभागीय रेल्वेच्या कार्यक्षेत्रात असे एकही गोदाम नव्हते ते आता उपलब्ध होत आहे.

तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

सेलूत यंदा ऑनलाईन गणेशोत्सव व्याख्यानमाला


व्याख्यान, परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

व्याख्यानमालेचे ५९ वे वर्ष

सेलू, दि.३१ ( प्रतिनिधी ) : कोविड-१९ मुळे यावर्षी येथील गणेशोत्सव व्याख्यानमालेचे
२८ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत ऑनलाईन आयोजन करण्यात येणार आहे. अशी माहिती चिटणीस गिरीश लोडाया यांनी दिली.

चार दिवस चालणाऱ्या व्याख्यानमालेचे हे ५९ वे वर्ष आहे. गणेशोत्सव काळात ज्वलंत सामाजिक विषयांवर लोकप्रबोधन व्हावे, या हेतूने दरवर्षी व्याख्यानमालेत परिसंवाद, व्याख्यान, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

व्याख्यानमालेत खंड पडू नये या करिता व्याख्यानमाला ऑनलाईन आयोजित करण्याबाबत बुधवारी (२९ जुलै ) प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर यांच्या अध्यक्षतेखाली
पदाधिकारी व निवडक सदस्यांची बैठक झाली. बैठकीत झालेल्या चर्चेत २८ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत दोन व्याख्याने, एक परिसंवाद व स्थानिक कलाकार सांस्कृतिक कार्यक्रम अशी चार पुष्प आयोजित करण्याचे ठरले. प्रामुख्याने कोविड-१९, लोकमान्य टिळक स्मृती शताब्दी वर्ष, ऑनलाइन शिक्षण-मुलांचे भविष्य आदी विषयांचा व्याख्यानमालेत समावेश असेल.

ऑनलाइन व्याख्यानमालेचे संयोजक म्हणून गंगाधर कान्हेकर निवड करण्यात आली, तर प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, रवी मुळावेकर, संतोष कुलकर्णी, अजित मंडलिक, प्रणिता सोलापूरे हे , तर या वर्षीच्या व्याख्यानमाला कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्य गतवर्षीचेच असतील.
यावेळी प्राचार्य कुलकर्णी, व्याख्यानमालेचे अध्यक्ष अनिल केंधळीकर यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक व अहवाल चिटणीस गिरीश लोडाया यांनी सादर केला.अजित मंडलिक यांनी आभार मानले.

वार्तांकन : बाबासाहेब हेलसकर

पूर्ण...

Thursday, 30 July 2020

गेवराईत कडक संचारबंदी घाबरू नका, संपर्क करा - डाॅ. संजय कदमसुभाष मुळे 
---------------
गेवराई, दि. ३१ _ कोरोनाचा विळखा वाढत असून, शहरातील विविध भागात ४४ रुग्ण आढळून आल्यानंतर संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी ८ ऑगस्टपर्यंत शहर बंद करण्याचा निर्णय घेतला. संचारबंदीला गुरूवारी कडकडीत बंदला सुरूवात झाली असून प्राथमिक लक्षणे आढळतील, अशा लोकांनी न घाबरता आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी संजय कदम यांनी केले आहे. दरम्यान पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दुपारी शहरात दाखल होऊन आढावा घेतला आहे. 
    ६ ऑगस्टपर्यंत गेवराई शहर बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकार्‍यांनी घेतल्यानंतर आज सकाळपासून शहर कडकडीत बंद आहे. अत्यावश्यक सेवांची सहा शासकीय कार्यालये वगळता महसूल, पोलिस, ग्रामविकास, नगरविकास, कृषि व आरोग्य, गेवराई शहरातील सर्व शासकीय व खासगी आस्थापना बंद राहतील. वरील सहा विभागांचे कर्मचारी कार्यालयीन ओळखपत्राद्वारे शहराअंतर्गत प्रवास करू शकतील. गेवराई शहरातील नागरिकांना इतर जिल्ह्यात व राज्यात जाण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन पास मिळणार नाहीत. परंतु अत्यावश्यक वैद्यकीय पाससाठी  शहरातील नागरिकांना संकेत स्थळावर पास प्राप्त करता येईल. आज शहरात कडकडीत बंद होते. ज्या नागरिकांना प्राथमिक लक्षणे आढळून येतील त्या नागरिकांनी घाबरून न जाता आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम यांनी केले असल्याची माहिती आमचे पत्रकार सुभाष मुळे यांनी दिली आहे. 
       यावेळी तहसीलदार प्रशांत जाधवर, पोलिस उपविभागीय अधिकारी स्वप्नील राठोड, पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम चोबे, ता.आरोग्य अधिकारी डॉ.संजय कदम, उपजिल्हा रुग्णालयात अधीक्षक राजेश शिंदे यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. दरम्यान पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरात ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता.

╭══════════
  सुभाष मुळे 🖋 पत्रकार
   !! _मो. 94 2224 3787_ !!
══════════════╯

गेवराई तालुक्यातील गोळेगावचे माणिकराव काळे यांचे निधन🖋 सुभाष मुळे
   /═══///═══╯
गेवराई, दि. ३० _ तालुक्यातील गोळेगाव येथील गणपतराव काळे यांचे वडील माणिकराव विश्वनाथराव काळे यांचे बुधवार, दि. २९ रोजी सकाळी ११ वाजून १८ मि. वाजण्याच्या दरम्यान निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ८० होते.
         गेवराई तालुक्यातील गोळेगावसह पंचक्रोशीतील सर्वांना सुपरिचित असलेले व मनमिळावू स्वभावाचे आणि अगदी आपलेसे वाटणारे माणिकराव विश्वनाथराव काळे हे अनेक दिवसांपासून मुळव्याध या आजाराने त्रस्त होते. विलाज करूनही वयाच्या स्थितीत शरीर साथ देत नव्हते. बुधवार, दि. २९ रोजी सकाळी ११ वाजून १८ मि. वाजण्याच्या दरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, सदाशिव, संपत्ति, गणपत या मुलांसह २  मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

╭══════════
  सुभाष मुळे 🖋 पत्रकार
   !! _मो. 94 2224 3787_ !!
══════════════╯

इंदिरा गांधी इंग्लिश स्कूलने राखली १०० टक्के निकालाची परंपरा कायम


 🖋 सुभाष मुळे 
   /═══///═══╯
गेवराई, दि. ३० _  माऊली शिक्षण प्रसारक मंडळ संचलित इंदिरा गांधी स्कूलने या वर्षीही दहावीच्या परीक्षेत १०० टक्के निकालाची यशस्वी परंपरा कायम राखत गगन भरारी घेतली आहे. दहावीच्या परीक्षेत विद्यार्थी यश लोया याने ९५.४० टक्के तर सानिका निकम ९५ टक्के व प्रथमेश राठोड ९४.४० घेऊन शाळेतून अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय येण्याचा मान मिळवला आहे.  
       इंदिरा गांधी इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादित केले आहे. यात विद्यालयाने सतत आठ वर्ष १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. शाळेच्या ५२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. पैकी १४  विद्यार्थी ९० टक्के पेक्षा जास्त गुण घेऊन तर २७ विद्यार्थी ८० ते ९० टक्के पर्यंत गुण मिळवून उत्तीर्ण झाले. शाळेची ही आठवी बँच आहे. 
       शाळेच्या या यशाबद्दल माऊली शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री डॉ.डी व्ही बांगर , शाळेच्या  प्राचार्या सौ भारती बांगर, प्रशासक श्री पठाण सर, आमचे पत्रकार सुभाष मुळे यांनी सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून सर्व यशस्वी विद्यार्थ्याना शुभेच्छा दिल्या आहेत.

╭══════════
  सुभाष मुळे 🖋 पत्रकार
   !! _मो. 94 2224 3787_ !!
══════════════╯

उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या 'जन्मेजय' ने मिळवले ९५.८० टक्के गुण


🖋 सुभाष मुळे 
   /═══///═══╯
गेवराई, दि. ३०  शैक्षणिक पटलावर नेहमीच  उल्लेखनीय कामगिरीत राहिलेल्या जिनिअस क्लासेस ने इयत्ता दहावीच्या परीक्षेत अतुलनीय यश संपादित केले आहे. गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन ( शनिचे ) येथील प्रविणकुमार काळम पाटील हे शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या हुद्द्यावर आहेत. अर्थातच शिक्षणाधिकारी असून यांच्या जन्मेजय या मुलाने ९५.८० टक्के गुण घेऊन यश मिळवल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.
        गेवराई येथील जिनिअस क्लासेसने सतत अकरा वर्ष १०० % निकालाची परंपरा कायम राखली आहे. क्लासेसचे संस्थापक संचालक श्री. सुनिल रामकिसनराव चाळक सर , कार्यकारी संचालक श्री. नारायण चाळक सर, श्री. गणेश सारूक सर, श्रीमती प्राची बोर्डे, राज गायकवाड सर, आरती अवचर आणि कांचन काळे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. क्लासेसचा १०० % निकाल लागला असून, इंग्रजी माध्यमाचा जन्मेजय प्रविणकुमार काळम पाटील याने ९५.८० टक्के गुण घेत क्लासेस मधून प्रथम व आरती सिधुप्पा परळकर ९५.२० टक्के घेऊन व्दितीय व विद्या रखमाजी चौधरी ९४.५० टक्के घेऊन तृतीय येण्याचा मान यांनी मिळवला आहे. क्लासेसच्या ६७ मुलांनी परीक्षा दिली होती. पैकी २६ विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा जास्त गुण घेतले , तर ३७ विद्यार्थ्यांनी ७५ टक्के ते ८९ टक्के च्या  दरम्यान गुण मिळवून उत्तीर्ण झाले. गणित विषयामध्ये ९० पेक्षा जास्त, विज्ञान विषयामध्ये ८५ पेक्षा जास्त, व इंग्रजी विषयामध्ये ८० पेक्षा जास्त गुण संपादित करणारे तब्बल ४३ विद्यार्थी असून क्लासेस मधे शिकवल्या जाणाऱ्या इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यम मध्ये विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या यशाबद्दल आमचे पत्रकार सुभाष मुळे तसेच पालकांसह सर्वच स्तरातून क्लासेसच्या शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.

╭══════════
  सुभाष मुळे 🖋 पत्रकार
   !! _मो. 94 2224 3787_ !!
══════════════╯

रामेश्वर विद्यालय सिंदखेड दहावीचा निकाल 95 टक्के

🖋 सुभाष मुळे
   /═══///═══╯
गेवराई, दि. २९ _ महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ,औरंगाबाद विभागाच्या वतीने मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून प.पु.गुरू गणपत बाबा शिक्षण प्रसारक मंडळ,संचलित रामेश्वर विद्यालय,सिंदखेड चा निकाल ९५ % इतका लागला असून विद्यालयाने दर वर्षी प्रमाणे या वर्षी ही निकालाची यशस्वी परंपरा कायम ठेवली आहे.
     विद्यालयामधून कु.जाधव प्रतीक्षा छगन  ८१.६० % प्रथम, चि. मोहिते कृष्णा सुरेश ८०.४० % दृतीय, कु.दरेकर वैष्णवी चंद्रकांत  ७७.४० % तृतीय, कु.बांगर आकांशा राधकीसन ७७.४०  % तृतीय आले आहे. आमचे पत्रकार सुभाष मुळे, शाळेचे सचिव/मुख्याध्यापक श्री.संभाजी करांडे सर व सर्व शिक्षकांनी उत्तीर्ण विद्यार्थाचे अभिनंदन करून त्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

╭══════════
  सुभाष मुळे 🖋 पत्रकार
   !! _मो. 94 2224 3787_ !!
══════════════╯

पत्रकारांच्या आर्थिक परिस्थितीवर रडु येते आता तरी एक व्हा..संघटित व्हा...संघटना खुप झाल्या व होतील पण पत्रकारांच्या हितासाठी लढतय कोन


हिंगोली प्रतिनिधी

कोरोना उपचारासाठी 75 हजार रुपये नसल्यामुळे लातूरच्या पत्रकाराचा मृत्यू !!

काळजाला धक्का देणारी बातमी आज फेसबुकवर कळली.  खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दररोज पाच हजार रुपये जमा करण्यासाठी तेवढी रक्कम  नसल्यामुळे पत्रकाराचा मृत्यू झाला. पत्रकारांची आर्थिक स्थिती यानिमित्ताने जनतेसमोर आली.  सर्वसामान्यपणे पत्रकारांकडे नकारात्मक दृष्टीने पाहण्याची नजर आतातरी बदलली पाहिजे. एखाद्या पत्रकाराला जेव्हा एखादी जाहिरात मिळते, त्या रकमेतील 15 तर काही ठिकाणी 20 टक्केच रक्कम त्याला देण्यात येते. बाकीची 85 किंवा 80 टक्के रक्कम ही वृत्तपत्राच्या मालकाकडे जाते. बातमीदारांना पगार नसतो, हे अनेकांना माहित नाही. संपादकीय मंडळातील संपादक, कार्यकारी संपादक,वृत्तसंपादक, उपसंपादक यांना पगार मिळतो, पण त्यांची जर नोकरी काही कारणाने गेली,तर चार-पाच महिन्यांनंतर रस्त्यावर येऊन भीकसुद्धा मागू शकतात, एवढी बिकट परिस्थिती आहे. एकदा नोकरी गेली, की कोणी ओळखतसुद्धा नाही. असे अनेकांचे अनुभव आहेत. ते कोरोना परिस्थितीच्या दरम्यान अनेकांनी व्यक्त केले. दुसरी महत्त्वाची बाब अशी की काही पत्रकारांना विनाकारणच राजकारणी म्हणून बघितल्या जाते. एकतर पत्रकारिता करा किंवा राजकारणी व्हा, असे उपहासाने म्हटल्या जाते. का बरं, बाकी सर्व क्षेत्रातील मंडळी राजकारणामध्ये आहेत किंवा त्यामध्ये लुडबूड करतात, मग पत्रकारांनाच का बरं बंधन? कुठे  अपघात घडला, तर फक्त पत्रकारामुळेच त्या व्यक्तीला लवकर मदत मिळू शकते. इतरही अनेक सकारात्मक बाबी पत्रकारामुळेच घडतात. मित्रांनो, एखादी स्टोरी बनवायची असेल, तर अख्खा जीव त्या स्टोरीमध्ये-बातमीमध्ये ओतावा लागतो, हे अनेकांना समजण्यापलिकडे आहे. सर्वच पक्षातील राजकारण्यांशी व इतरही घटकांशी संबंध ठेवताना पत्रकारांना तारेवरची कसरत करावी लागते. काही लोकांना तर नेहमीसाठी त्यांच्याशी संबंधित सकारात्मक बातम्या पाहिजेत, पण वर्षातून दोन जाहिराती द्यायलाही जिवावर येते. मित्रांनो, निवडणूकीचे पॅकेज हे पेपरच्या मालकांना भेटत असते. पत्रकारांना नाही. कोरोनाच्या काळात अनेक लोकांनी पत्रकारांच्या जाहिरातीचे पैसे बुडविले आहेत. त्या लोकांना आयुष्यातही जवळ करू नका. पत्रकार मित्रांनो, ज्यांना पत्रकारांच्या भयावह परिस्थितीची जाण आहे, त्यांना काळजात ठेवा. पत्रकारितेसोबत इतरही व्यवसाय करा. उद्योग करा. उघड उघड राजकारणही करा. काही विविध निवडणूक लढवा. पण, लातूरच्या पत्रकारासारखी परिस्थिती उदभवू  देऊ नका!
(मित्रांनो, माझे वैयक्तिक अनुभव चांगले आहेत. माझी पत्रकारिताही नवसंकल्पनायुक्त आहे.  आर्थिक मंदी ओढवून घेणारी तर नक्कीच नाही. इतर पत्रकारांनीही भान ठेवत जगणे गरजेचे आहे. त्या सर्वांना विनंती आहे, की लेबलयुक्त म्हणजे विविध वृत्तपत्रांच्या नावाखाली पत्रकारितेत गुरफटून जाऊ नका.काही छोटा-मोठा व्यवसाय करुनच पत्रकारिता करा

आपलाच मित्र पत्रकार शिवशंकर निरगुडे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना प्रसिद्धी प्रमुख सेनगाव .जिल्हा हिंगोली

आनंदवन विद्यालय ची क्रीडाक्षेत्रासह गुणवत्तेमध्येही गरूड भरारी..प्रतिनिधी
परभणी- गंगाखेड तालुक्यातील क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्रात गाजलेली शाळा म्हणजे आनंदवन विद्यालय
कबड्डी मध्ये आणि इतर खेळातही आनंदवन चे खेळाडू राष्ट्रीय पातळीवर गेले आहेत.सतत आनंदवन विद्यालय चे सर्व कर्मचारी वर्ग व अध्यक्ष राजेशजी राठोड व प्रशालेचे मुख्याध्यापक श्री विलासराव राठोड सर खेळासाठी व गुणवत्तेसाठी पाठपुरावा करत असतात. 
परभणी जिल्ह्यालाच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राला आनंदवन विद्यालयाने दाखवुन दिले की, गुणवत्ते बरोबर खेळही महत्त्वाचा आहे..तरच विद्यार्थी हा सर्वगुणसंपन्न होतो.
खेळाडू हा सर्वगुणसंपन्न असतो हे आजच्या दहावी च्या निकालावरून आनंदवन विद्यालय ने दाखवुन दिले आहे.
आनंदवन विद्यालय चे गुणवत्ता धारक विद्यार्थी...
कु.सोनल भेंडेकर-99.60%(तालुक्यात द्वितीय, राज्य खेळाडु वुशु)कु.यशश्री नरवाडे-96.07%(राज्य खेळाडू कबड्डी, वुशू) अजिंक्य मादाळे-90.40% (राष्ट्रीय कबड्डी खेळाडू ), कु.सुमन चव्हाण-89.60%(राज्यस्तरीय कबड्डी खेळाडू ), श्रीहरीहोरगुळे -88.60%(राष्ट्रीय कबड्डी खेळाडू ) गणेश बोबडे-86.80%  (राष्ट्रीय कबड्डी खेळाडू कु.चैतन्या जाधव- 85.40%(राज्य कबड्डी खेळाडू )
कु.श्रेया डाकवे-85.40%(राष्ट्रीय कबड्डी खेळाडू) कु.आरती चव्हाण-80.00% (राष्ट्रीय कबड्डी खेळाडू ),बालाजी तारे- 79.60%(राज्यस्तरीय कबड्डी खेळाडू ),महेश डुकरे-79.60(राज्यस्तरीय कबड्डी खेळाडू ),कृष्णा पवार-75.40%(राज्यस्तरीय कबड्डी खेळाडू ),कु.निकीता लंगोटे-74.00% (राष्ट्रीय कबड्डी खेळाडू ),कु.ज्योती राठोड-73.00,(राज्यस्तरीय कबड्डी खेळाडू ),युवराज भोसले- 72.60(राज्यस्तरीय कबड्डी खेळाडू)
15.कु.कावेरी आडे -70.00% (राष्ट्रीय कबड्डी खेळाडू ),कु.पुनम चव्हाण-68.60%(राष्ट्रीय कबड्डी खेळाडू ),कृष्णा कदम-68.60% (राज्यस्तरीय कबड्डी खेळाडू ),कु.सोनाली पोले-68.00%(राज्यस्तरीय कबड्डी खेळाडू ),वरील सर्व खेळाडू हे गुणवंत तर आहेतच पण अभ्यासात सुध्दा गुणवत्ता धारक विद्यार्थी बनले आहेत. हे सगळं श्रेय जातय आनंदवन विद्यालय च्या सर्व कर्मचारी वर्गांना. 
"प्रत्येक पालकांना वाटते की ,खेळ नको फक्त आणि फक्त अभ्यास व टिवीशन तरच आमचा पाल्य घडतो पण प्रत्यक्षात तस होत नाही त्याला जोड खेळाची द्यावीच लागते तरच विद्यार्थी घडत असतो.खेळाडूच हा गुणवत्ता धारक विद्यार्थी होऊ शकतो हे आनंदवन विद्यालयाने परभणी जिल्ह्यातील शाळांना दाखवून दिले आहे".
आनंदवन विद्यालय गंगाखेड प्रशालेचा निकाल 100% लागला...!
आनंदवन विद्यालय गंगाखेड च्या सर्व टिमचे सर्वत्र अभिनंदन होत आहे हे क्रीडा क्षेत्रातील अभिमानाची बाब आहे.

सेलू तालुका क्रीडा संकुलास वाढीव निधीही देऊ : आमदार मेघना साकोरे (बोर्डीकर)पाच कोटी रुपयांच्या  बांधकामास शासनाची मंजुरी                                                      

सेलू, दि.३० ( प्रतिनिधी ) : सेलू ( जि.परभणी ) येथील तालुका क्रीडा संकुल समितीची २८ जुलै रोजी न.प.सेलू येथे तालुका क्रीडा संकुल समितीचे अध्यक्षा आमदार मेघना साकोरे (बोर्डीकर) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी नगर परीषद सेलू वतीने सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अशोक कासार यांनी केले.                 यावेळी आमदार बोर्डीकर म्हणाल्या, सेलू तालुका  सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असून आता क्रीडा क्षेत्रात पुढे जाणार आहे.या करीता क्रीडा संकुलातील सुविधा निर्माण करून देऊ, यास लागणारा  वाढीव निधी शासनाच्या वतीने उपलब्ध करून दिला जाईल, आता लवकरच सेलू तालुक्यातील खेळाडूंना सुसज्ज क्रीडा संकुल खेळण्यासाठी मिळणार, या सोबतच जलतरणपटूस जलतरणीका उभारण्यात यावी असे सांगितले.                                       सेलू तालुका क्रीडा समितीचे कार्याध्यक्ष तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी  बैठकीत राज्य क्रीडा विकास समितीच्या वतीने एक कोटी चा निधी मंजुरी झाला आहे ,यात लोकप्रिय खेळ कबड्डी, खो-खो,व्हॉलीबॉल, या साठी २२ लक्ष निधी तर विविध खेळाच्या सरावासाठी इनडोअर हॉल चा डोंम तयार कराण्यासाठी ५८ लक्ष , व तालुका क्रीडा संकुलास संरक्षण भिती साठी २०.५०  लक्ष अंदाजे उपलब्ध झाला आहे. वरील काम हाती घेण्यासाठी सर्वानुमते ठराव घेण्यात आला.                     तालुका क्रीडा समितीचे सचिव ,तालुका क्रीडाधिकारी शैलेंद्रसिंग गौतम यांनी बैठकीचे प्रस्ताविकात महाराष्ट्र शासनाच्या वतीने  सेलू तालुका क्रीडा संकुलास पाच कोटी निधीचे अंदाजपत्रक व बाधंकामास महाराष्ट्र शासनाची मंजुरी मिळाली असुन उपलब्ध निधीच्या अनुषंगाने एक कोटी रूपयांची कामे सुरू करण्याची मान्यता मिळाली आहे.                                    

उर्वरित चार कोटीचा निधी उपलब्ध  झाल्यावर , मैदानी क्रीडा स्पर्धा साठी २०० मी धावनपथ, अत्याधुनिक सुविधात बँडमिटंन, टेबल टेनिस , योगा बहुउद्देशिय हॉल , तालुका क्रीडा अधिकारी कार्यालयाची इमारत,  मैदानावर सौरऊर्जा  व सोलार सिस्टीम, अद्ययावत क्रीडा साहित्य याबाबींवर खर्च होतील.                   
सेलू नगर परिषदेची सर्वे नंबर २५६/२५७ मधील दोन एकर तेरा गुंठे जागेवर सेलू तालुका क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे.                                      याप्रसंगी नगराध्यक्ष विनोद बोराडे म्हणाले सेलू शहरात सांस्कृतिक ,शैक्षणिक विकास सोबत क्रीडा क्षेत्रात विकास व्हावा उद्देशाने नगर परिषद सेलू वतीने जागा उपलब्ध करून दिली आहे. शासनाच्या निधीतून क्रीडा विकास व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.            

बैठकीत कार्यकारी सदस्य मुख्याधिकारी जयवंत सोनवणे, गटशिक्षणाधिकारी गणराज यरमळ, बांधकाम विभागाचे अभियंता विनोद देशमुख व दिपक कुपटेकर, उपमुख्याधिकारी अक्षय पल्लेवाड, सेलू तालुका क्रीडा संयोजक गणेश माळवे आदी उपस्थित होते.

पूर्ण...

महाबीजचे बियाणे उगवलेच नसल्याची आता चिंता नको; बियाण्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात करणार जमा


अकोला :30 ( जमील पठाण)

 राज्यभरातून महाबीजचे बियाणे उगवलेच नसल्याच्या शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. त्यांचेपैकी काही शेतकऱ्यांना बियाणे बदलून देण्यात आले आहे तर, ज्यांनी बियाणे घेण्यास नकार दिला, त्यांच्या बँक खात्यात बियाण्याच्या किमतीची रक्कम जमा करण्यात येत असल्याची माहिती महाबीजकडून देण्यात आली आहे.खरीप २०२० करीता राज्यभरातील शेतकऱ्यांनी यंदाही महाबीजच्या सोयाबीन बियाणे पेरण्यासाठी पसंती दर्शविली होती. परंतु, बहुतांश भागातून बियाणे उगवलेच नाही, कमी भरले, निकृष्ट निघाले, शेतकऱ्यांकडून अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
त्यामुळे महामंडळामार्फत अशा शेतकऱ्यांना ३२५०.१० क्विंटल बियाणे पुनरपेरणीकरिता उपलब्ध करून देण्यात आले असून, त्यापैकी आजपर्यंत ६१० शेतकऱ्यांनी ५८ लाख रुपयांची ७७९.९० क्विंटल बियाण्याची उचल केल्याची माहिती महाबीजने दिली आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी बियाणे घेण्यास नकार दिला, अशा शेतकऱ्यांना तालुकास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीचे अहवाल तसेच बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्याची माहिती घेवून, बियाणे किमतीची रक्कम त्यांचे खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची आल्याचे व आजपर्यंत १९.१२ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याचे महाबीज प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

सेनगाव तालुक्यात तालुका आरोग्य अधिकारी मार्फत स्वाईन फ्ल्यू लसीचे लसीकरणसेनगाव प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 


सेनगाव तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात दि 27/07/2020 रोजी साखरा कापडशिंगि कवठा गोरेगाव येथें मा .तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश रूणवाल सर व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी याच्या मार्गदर्शनाखाली स्वाईन फ्य्लू चे लसीकरण सर्व वैद्यकीय अधिकारी आरोग्य सेविका आरोग्य सेवक व गट प्रवतर्क यांना स्वाईन फ्ल्यू चे लसीकरण करण्यात आले यामुळे सर्व कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले मा .तालुका आरोग्य  अधिकारी डॉक्टर सतीश रूणवाल सर व वैद्यकीय अधिकारी यांचे आभार मानले तसेंच प्राथमिक आरोग्य केंद्र कापडशिंगि येथें मा .तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर रूणवाल सर यांनी कोव्हिड व नॉन कोव्हिड या विषयी मार्गदर्शन करून समुदाय आरोग्य अधिकारी याना टैब चे वाटप करण्यात आले आणि विविध विषयावर jsy बुडित मजुरी पंतप्रधान मातृतव वंदना 100% गरोदर माता नोंदणी व तपासणी व बालकांचे लसीकरण साथरोग या कामा विषयी मार्गदर्शन केले या वेळी उपस्थितीत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जगन्नाथ काकडे सर तालुका सुपर वायजर अशोक जोशी सर सि .एच .ओ .व सर्व कर्मचारी वर्ग उपस्थितीत होता 

तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

मिलिंद शाळेचा निकाल ९१.६६ %


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) -:  दि.२९ जुलै २०२० रोजी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२० चा निकाल घोषित करण्यात आला. प्रती वर्षा प्रमाणे याही वर्षी प्रज्ञा एज्युकेशन सोसायटी संचलित मिलिंद माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. शाळेचा निकाल ९१.६६ % लागला असून यामध्ये विशेष प्राविण्यासह १७ विद्यार्थींनी उत्तीर्ण झाले. तसेच प्रथम श्रेणीतून २९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  शाळेतून एकूण ९६ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले होते, त्यांपैकी एकूण ८८ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. शाळेतून सर्व प्रथम कु. यशश्री सिद्धेश्वर रनखांबे ९३.६० गुण घेवून प्रथम आली आहे. द्वितीय कु. वैष्णवी परशुराम गित्ते ९१.२० तर शाळेतून तृतीय येण्याचा मान कु. विशाखा विश्वास रोडे या विद्यार्थीनीस मिळाला.

विशेष प्राविण्यासह ९६ पैकी १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 
सय्यद उमर अहेमद ताज मोहम्मद ८६.८०, श्रेयस संजय शेप ८६.२०, अंजली सुभाष कसबे ८५.६०, रोहीनी नवनाथ तांदळे ८५.२०, आकांक्षा युवराज जगतकर ८३ , प्रेरणा संजय जोगदंड ८२.२० , प्रियंका महादेव घोडके ८१.४० या विद्यार्थ्यांनी ८० % पेक्षा अधिक गुण मिळवले. 
 प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शाळेने उत्कृष्ठ निकालाची परपंरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल प्रज्ञा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय अॅड.अनंतरावजी जगतकर साहेब यांनी विद्यार्थी, पालक व शाळेतील  सर्व शिक्षकवृदांचे अभिनंदन केले विद्यार्थ्यांना पुढिल शैक्षणिक वाटचालीसाठी  शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक श्री.पवार के.एन., पर्यवेक्षक श्री.कोम्मावार आर.जी. शाळेतील सर्व  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील शौक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

नूतन विद्यालयाने राखली यशाची उज्ज्वल परंपरा
शाळेचा निकाल ८८.७० टक्के

५३ विद्यार्थ्यांनी मिळविले ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण

सेलू, दि.३० ( प्रतिनिधी ) : सेलू (जि.परभणी ) येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित नूतन विद्यालयाने मार्च २०२० मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत निकालाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवली असून शाळेचा निकाल ८८.७० टक्के एवढा लागला आहे.
दहावीच्या परीक्षेत शाळेतून एकूण ४८७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ४३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात प्रावीण्य प्राप्त श्रेणीत १६५, प्रथम श्रेणीत १३९, व्दितीय श्रेणीत ८८, तर तृतीय श्रेणीत ४० उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ५३ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले असून आदित्य श्रीकिशन कोल्हे याने पाचशे पैकी ४९६ ( ९९.२० टक्के ) मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. ओवी उदय दडके हीने ४९२ ( ९८.४० टक्के ) गुण घेत व्दितीय, तर अपूर्व यशवंत कुलकर्णी याने ४९१ ( ९८.२० टक्के ) गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकाविला आहे. आदित्य कोल्हे या विद्यार्थ्यांने परभणी जिल्हा गुणवत्ता यादीत पहिल्या पाचमध्ये स्थान मिळविले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, चिटणीस डी.के.देशपांडे, सहचिटणीस डॉ.विनायकराव कोठेकर, जयप्रकाश बिहाणी, शालेय समितीचे अध्यक्ष सीताराम मंत्री, नंदकिशोर बाहेती, मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी, उपमुख्याध्यापक अशोककुमार वानरे, पर्यवेक्षक रामकिशन मखमले, रघुनाथ सोन्नेकर, संस्था पदाधिकारी, सदस्य व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

फोटो ओळी :
आदित्य कोल्हे ( ९९.२० %)
ओवी दडके ( ९८.४० % )
अपूर्व कुलकर्णी ( ९८.२० %)

पूर्ण...

साखरा ते रिसोड राज्य मार्गावरील पुल बनला धोकादायक पुलाची पडझड झाली सुरूसाखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 


सेनगाव तालुक्यातील साखरा ते रिसोड राज्य मार्गावरील वरील फुल पूर्ण पणे मोडकळीस आला आहें हा फुल साखरा गावच्या बाजूला आहें ह्या फुलाचे बांधकाम दगडी आहें साखरा ते रिसोड रस्त्यावरील साखरा गावाजवळ असलेल्या ओढ्यावरील पुलाचे बांधकाम दगडी आहें या पूलावरील लोखंडी  गजाळीसह छत टाकले आहें अंदाजे  40 वर्षा पासून या पुलावरून वाहतुकीची वर्दळ असते मात्र आत्ता हा फुल मोडकळीस आला आहें त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोक्याची घंटा बनत आहें तसेंच सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने मोठा पाऊस जाला की पूराचे पाणी पुलावरून जात आहें  आणि हा पूल पुराच्या पाण्यामुळे पूर्ण पणे खालून खचून गेला आहें पूर्ण दगडी बांधकाम उखलुण केले आहें तरी सार्वजनिक बांधकाम विभागाणे या ठिकाणी नवीन पुलाची मागणी परिसरातील प्रवाशी वर्गातून केली जात आहें तरी संबधित विभागाने तातडीने लक्ष देऊन नवीन पूल करण्यात यावा 


तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

कु.साक्षी ठाकरेचे दैदिप्यमान यश.......
मंगरुळपीर तालुक्यातुन दहावित प्रथम येन्याचा मीळवला मान

आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवर्‍या साक्षिचे सुयश

फुलचंद भगत
मंगरुळपीर-लहानपणापासुनच जिद्दी असलेली आणी चिकाटी व सातत्याने अभ्यासामध्ये प्रगती करणारी सामान्य कुटुंबातल्या साक्षीने नुकत्याच लागलेल्या दहाविच्या परिक्षा निकालामध्ये ९८.८०% गुण मिळवुन आपल्या दैदित्यमान यशाने मंगरुळपीर तालुक्यातुन प्रथम येन्याचा साक्षिने सन्मान राखुन मानाचा तुरा खोवला आहे.
              मुलीला दुय्यम दर्जा देणार्‍या समाजात मुलीच कशा शिक्षणामध्ये अव्वल आहेत हे प्रेरणादायी ऊदाहरण वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर या ठिकाणी पाहावयास मिळत आहे.नुकत्याच लागलेल्या दहावी बोर्डाच्या परिक्षेच्या निकालामध्ये नाथ विद्यालयाची विद्यार्थीनी कु.साक्षी भाष्करराव ठाकरे हिने ९८.८०% गुण मिळवुन नेञदिपक यश संपादन केले आहे त्यामुळे तालुक्यातुन प्रथम येन्याचा मानही साक्षीलाच जात आहे.
         शिक्षणात ध्येयवेडी असलेली साक्षी बालवयापासुनच आपल्या आईवडीलांच्या कष्टाची जाण ठेवुन शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये हिररीने सहभाग घेवुन यश खेचुन आणत होती.शिक्षणच माणसाला तारु शकते ही खुनगाठ मनाशी बांधुन समाजाप्रती जे देनं लागते या सामाजीक भावनेने प्रेरीत झालेली साक्षी मोठ्या पदावर आरुढ होवुन सेवाभावी कार्य करन्याचे स्वप्न ऊराशी बाळगुन अभ्यास करत होती.या तिच्या जिद्द व चिकाटीला अखेर यश येवुन नुकत्याच लागलेल्या दहावीच्या परिक्षेमध्ये ९८.८०% गुण मिळवुन तालुक्यातुन प्रथम येन्याचा मान मिळवला आहे.वाचन,वकृत्व तसेच कविता लिहिन्याचा छंद जोपासणार्‍या साक्षीच्या या यशाने तिच्या आईवडील आणी भावडांचा आनंद गगनात मावेनासा झाला. मुलाप्रमाणेच मुलीला मानुन ठाकरे कुटुंबाने आपल्या दोनही मुलींना ऊच्चशिक्षित बनविले असल्याने साक्षीला देखील मोठ्या पदावर आरुढ होन्याचं स्वप्न असल्याचे साक्षिच्या आईवडीलांनी सांगीतले.मनमिळावु स्वभाव आणी शिक्षणातली गोडी बघुन बहिणीही नेहमी प्रेरणा देतात असे सांगुन आपल्या यशाचे खरे श्रेय हे प्रथमतः आईवडीलांनाच देईल आणी नेहमी शिक्षणात गोडी निर्माण  करणार्‍या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे यश मिळू शकले असे साक्षिने सांगीतले.ईतरांनीही या ठाकरे कुटुंबियांची प्रेरणा घेवुन मुलींना शिकवुन मोठ्या पदावर पोहचवुन स्वबळावर ऊभे राहन्याची प्रेरणा घ्यावी हेच यानिमीत्ताने अधोरेखित होत आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206
     9763007835

सेलू येथील ज्ञानतीर्थ विद्यालयाची १०० टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा

दहावीच्या शंभर टक्के निकालाचे सलग सहावे वर्ष

सेलू, दि.३० ( प्रतिनिधी ) :  सेलू ( जि.परभणी ) येथील श्रीराम प्रतिष्ठान संचालित ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयाचा मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून शाळेने सलग सहा वर्षांपासून १००% निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. हे विशेष उल्लेखनीय आहे.

शाळेतून ओंकार बोराडे ( ९६.८० % ) याने प्रथम, 
प्राची आकात (९५.२०%) द्वितीय, तर आदित्य उफाड (९५.००%) व  महेश तांबे (९५.००% ) या विद्यार्थ्यांनी 
तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
पंकज मानवतकर( ९३.८०%), रितेश गिराम (९३.२०%), सलोनी डख (९२.८०%), तनुश्री सुरवसे (९२.२०%), स्नेहल जाधव (९१.२० %), सोरभ मगर (९०.६०%), संदेश कोटलवार (९०.६०%) या विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्यासह यश संपादन केले आहे.  प्रथम श्रेणीत  अभिजित वाघ (८९.४०%), अंजली कावळे (८८.००%), सुदर्शन मानवतकर (८८.००%), प्राजक्ता काव्हळे (८७.६०% ), निधी तोष्णीवाल (८६.८०%), ऋषिकेश घुगे (८५.८०% ), आदित्य सोनावणे (८५.६०% ), सुमित रोडगे( ८५.४० % ), भाऊसाहेब रोडगे (८५.००%), समीक्षा वाटोरे (८४.२०%), तुकाराम मगर (८३.२०%), सिद्धांत मोगल (८२.६०%), ओम शिवपूरे (८२.४०%), अंकिता ढेपे (८१.००%), आदित्य महाजन (८०.२०%), आदित्य केकाण( ८०.००%) स्थान मिळविले आहे. यासोबतच एकूण सहा विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, तर २१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, सचिव डॉ.सविता रोडगे, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे,  मुख्याध्यापिका शालिनी शेळके, माध्यमिक विभागाचे  मुख्याध्यापक विठ्ठल सरकटे,  हरिभाऊ कांबळे , स्वाती कदम, करणसिंग चव्हाण, पुष्पा पवार, इंद्रजीत मोरे, शशिकांत बिहाडे, पाठक, गणेश येवले, नाना मोगल आदींसह संस्था पदाधिकारी, सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन, कौतुक केले.

फोटो ओळी : 

ओंकार बोराडे ( ९६.८० % ) 
प्राची आकात (९५.२०%) आदित्य उफाड (९५.००%)  महेश तांबे (९५.००% ) 


वार्तांकन : बाबासाहेब हेलसकर

पूर्ण...