तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 29 July 2020

तुलसी इंग्लिश स्कूल चा 100% निकाल


बीड (प्रतिनिधी)     देवगिरी प्रतिष्ठान संचलित,तुलसी इंग्लिश स्कूल, संत ज्ञानेश्वर नगर, बीड  इयत्ता १० वी चा १०० %  निकाल लागला असून  शाळेतील सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. शाळेतील एकूण विद्यार्थ्यांपैकी 75 टक्के विद्यार्थी ८० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. 92.20 % गुण मिळवून शाळेतून प्रथम येण्याचा मान कुमारी सायली अशोक उगले या विद्यार्थिनीने मिळविला तर द्वितीय सागर कैलास वाघमारे 88.80 %,तृतीय कुमारी हर्षदा हरिहर बुगदे 88.40 %या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे मान मिळविला. राजवीर संजय वाघमारे, ईश्वर परमेश्वर धायगुडे, अजय परमात्मा धायगुडे, कुमारी मृणाल प्रशांत वासनिक, सय्यद नुमान जावेद, विवेक बंडू अडसूळ, कुमारी अस्मिता रावसाहेब कांबळे, आशिष जयवंतराव बिडकर या विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण गुण मिळवून यश संपादन केले 
      शहरातील नामांकित शाळांपैकी तुलसी  इंग्लिश स्कूल बीड ही शाळा असून 100 % निकालाची परंपरा शाळेने याहीवर्षी कायम राखली आहे
   देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.प्रा. प्रदिप रोडे व तुलसी इंग्लिश स्कूल बीड च्या प्राचार्या उमा जगतकर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या व शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनीही गुणवंत विद्यार्थ्यांचे चे अभिनंदन केले.

No comments:

Post a comment