तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 17 July 2020

ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्ताने 11 हजार रुपये आर्थिक मदत ; ग्रा.पं.सदस्य गणेश मुंडे यांचा आदर्श उपक्रमपरळी वैछनाथ (प्रतिनिधी) :- 
सामाजिक न्याय मंञी तथा बीड जिल्ह्याचे पालकमंञी ना.धनंजय मुंडे साहेब यांच्या वाढ दिवसा निमित्ताने टोकवाडी येथील गरीब कुटूंबाला आर्थिक मदत करून ग्रा.पं.सदस्य गणेश दशरथ मुंडे यांनी एका स्तुत्य उपक्रमाने वाढदिवस साजरा केला.

टोकवाडी येथील मिराबाई मुंडे यांचे पती आजारी आहेत त्यांच्यावर उपचार चालू असल्याने पत्नी मिराबाईं यांना आर्थिक मदतीची आवश्यकता होती. बीड जिल्ह्याचे पालकमंञी ना.धनंजय मुंडे यांच्या वाढ दिवसाच्या निमित्ताने टोकवडी ग्रा.पं.सदस्य गणेश मुंडे यांनी मिराबाई मुंडे यांच्याकडे रोख रक्कम 11 हजार रुपये सुपुर्द करून एका स्तूत्य उपक्रमाने वाढदिवस साजार करून एक आदर्श निर्माण केला.

यावेळी माजी सरपंच दशरथ आबा मुंडे , उपसरपंच डाँ.संदिपान काळे , महादेव मुंडे , पाटील गित्ते, संतोष मुंडे, ग्रा.पं.सदस्य भिमराव रोडे, भैय्या रोडे , अमर रोडे उपस्थित होते.

No comments:

Post a comment