तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 28 July 2020

महालगाव मध्ये आज 12 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह...


गोरख पवार वैजापूर औरंगाबाद

वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे आज सुमारे 225 जणांचे स्वॅब घेण्यात आले यात हाॅटेल चालकाच्या एकाच कुटुंबातील 6 व आणखी एका मोबाईल शाॅपी चालकाच्या कुटुंबातील लहान मुलांसह 6 लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुर्ण गांव निर्जंतुकीकरण करुन तीन दिवस दवाखाना व मेडिकल वगळता कडकडीत बंद करण्यात आले आहे.आणखी बऱ्याच लोकांची तपासणी बाकी असून किट शिल्लक नसल्याने बर्‍याच लोकांना वापस जावे लागले आहे.

कोरोना रुग्णांचे निदान तात्काळ व्हावे या उद्देशाने शासनाने रॅपिड अँटीजन चाचणी सुरू केली आहे. वैजापूर तालुक्यात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या सुमारे 467 वर पोहचली आहे.सुरुवातीच्या काळात बाधित रुग्णांच्या लाळेचे नमुने घेऊन औरंगाबाद येथे पाठविल्यानंतर अचूक निदान करण्यात येत होते. मात्र या चाचणीसाठी होणार विलंब पाहता शासनाने रॅपिड अँटीजन चाचणी सुरु केली,कोरोनाचा वाढता संसर्ग व तात्काळ निदान होऊन रुग्णसंख्या कमी होऊन साखळी तुटावी या उद्देशाने रॅपिड अँटीजन चाचण्या शहरात विविध ठिकाणी सुरु केल्या आहेत.

यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश गलांडे, माजी पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब झिंजुर्डे, बाजार समिती डाॅ. प्रकाश शेळके,  संचालक सुरेश आल्हाट, पोलिस पाटील सुधाकर शेळके, ग्रामरक्षक समितीचे अध्यक्ष नानासाहेब काळे, उपाध्यक्ष नवनाथ गायकवाड, ग्रामविस्तार अधिकारी आर. आर. शिनगारे, कोतवाल अब्दुल शेख, गाढेपिंपळगांव प्राथमिक आरौग्य केद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. कुलदिप कठाळे, डाॅ. राजहंस मोरे, साहाय्यक आर. ए. शिंदे, डब्लु. जी. पठाडे, भिंगार दिवे, आरोग्य सेवक डी. के. पोफळे, एस के. सोमवंशी, एम. एम. मापारी, सी.जी. आगळे, आरोग्य सेविका जे. के. दोडे, व्हि. पी. गोबाडे, एल. डी. चव्हाण, सविता शिनगारे,  गट प्रवर्तक वर्षा भवर, दिपाली देवकर, भाऊसाहेब खामकर, आशासेविका सरला रासने, संगिता जोशी, रमा पठारे.

No comments:

Post a comment