तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 20 July 2020

1आॕगष्टला रासपाचे राज्यव्यापी दुध एल्गार आंदोलन-प्रदेशाध्यक्ष राजेभाऊ फडपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संकटात दिवसेंदिवस भर पडत आहे.बॕंके कडून सतत नाकारल्या जाणारा कर्ज पुरवठा, नकली सोयाबीन अभियानामुळे करावा करावी लागलेली दुबार पेरणी युरिया खताचा तुटवडा व काळा बाजार कोकणातील शेतकऱ्यांचे वादळामुळे झालेले नुकसान अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकाचे झालेले नुकसान या विविध संकटांमध्ये शासनाकडून शेतकऱ्यांना कोणताही दिलासा प्राप्त झाला नाही या संकटाच्या माळेमध्ये दुधाचे भाव कमी झाल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे.म्हणुन या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या गाईच्या दुधाला प्रति लिटर दहा रुपये अनुदान,दूध भुकटी करिता प्रति किलो 50 रुपये अनुदान,शासनाकडून 30 रुपये प्रति लिटर दुधाची खरेदी या न्याय मागणीकरिता राष्ट्रीय समाज पक्षाकडून सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन एक ऑगस्ट रोजी रासपाचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब जानकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा रासपाचे युवक प्रदेशाध्यक्ष राजेभाऊ फड यांनी दिला आहे.
आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने परळी येथे तहसील कार्यालयामार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदन देण्यात आले आहे.
या 1 आॕगस्ट रोजी पुकारलेल्या राज्यव्यापी दुध एल्गार आंदोलनात भाजपा,रयतक्रांती संघटना,शिवसंग्राम रिपाई आठवले गट महायुतीचे सर्व घटक पक्ष सहभागी होणार आहेत

No comments:

Post a comment