तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 24 July 2020

24 ते 30 तारखेपर्यंत वैजापूर कडकडीत बंद...


गोरख पवार वैजापूर औरंगाबाद


वैजापूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना संक्रमण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने शुक्रवार दि 24 ते 30 जुलैपर्यंत शहरासह तालुक्यात टाळेबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यात तब्बल सात दिवस कडकडीत टाळेबंदी राहणार आहे.
  
गेल्या काही दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचे थैमान सुरू असून मोठ्या प्रमाणावर बाधित रुग्ण आढळून येत आहे. याबाबत 22 जूलै रोजी पंचायत समितीच्या सभागृहात लोकप्रतिनिधींसह अधिकारी व नागरिकांच्या बैठकीत 24 ते 30 जुलैपर्यंत शहरासह तालुक्यात कडकडीत टाळेबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात निमशासकीय व शासकीय कार्यालये बंद राहणार आहे.याशिवाय राज्य परिवहन महामंडळाची बससेवा, खासगी वाहतूक सेवा, ऑटोरिक्षा आदी सेवाही बंद राहणार आहे. यातून दवाखाने व औषधालये या अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असून या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सहकार्य करावे.असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

No comments:

Post a comment