तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 4 July 2020

परळीत तोंडाला मास्क न लावता फिरणा-या 59 जणांनवर दंडात्मक कार्यवाही, संभाजी नगर व शहर पोलिसांची संयुक्त कार्यवाहीपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  बीड जिल्हयाचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशाचे उल्लंघन करुन तोंडाला मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी फिरणा-या 59 लोकांवर पोलीसांची कार्यवाही करण्यात आली आहे.

सध्या महाराष्ट्र राज्यात कोरोना संसर्गजन्य विषाणु (कोव्हीड 19) प्रादुर्भाव वाढत असतांना महाराष्ट्र शासनाने अधिक कटोर उपाययोजना केलेल्या आहेत. त्याअनुषंगाने मा.जिल्हाधिकारी बीड यांनी कोरोना संसर्गजन्य विषाणु प्रसार रोकण्याचे दृष्टीने सार्वजनिक ठिकाणी फिरतांना तोंडावर मास्क लावणे, एका मोटार सायकलवर एकच व्यक्ती फिरणे, एका टैक्सी/कार मध्ये 01 + 02 व्यक्ती, एका अँटो मध्ये 01 + 02 व्यक्ती प्रवास करतील असे आदेश केलेले असतांना देखील “परळी शहरामध्ये काही नागरीक अशा आदेशाचे उल्लंघन करीत असतांना दिसुन आल्याने आज रोजी विशेष मोहीम राबवुन सार्वजनिक ठिकाणी तोंडास मास्क न लावणा या व दुचाकीवर एका पेक्षा अधिक व्यक्ती प्रवास करणा-या अशा एकुण 59 लोकांवर पोलीस स्टेशन परळी शहर व पोलीस स्टेशन संभाजीनगर परळी यांनी सयुक्तपणे कार्यवाह्या करुन गुन्हे नोंद करण्यात आले आहेत यानंतर देखील नियमांचे उल्लंघन करणा-या व्यक्तीवर कायदेशिर कार्यवाह्या करण्यात येतील, याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन संभाजी नगरचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब पवार व शहर पोलिस ठाण्याचे पोनि.हेमंत कदम यांनी केले आहे.

No comments:

Post a comment