तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 5 July 2020

परळी शहरात आजपासून 8 दिवस संपूर्ण संचारबंदीपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  शहर आजपासून 8 दिवस म्हणजेच दि.12 जुलै रात्री 12 वाजेपर्यंत पुर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे आदेश मध्यरात्री काढण्यात आले.
शहरातील स्टेट बैंक ऑफ इंडिया येथील पाच अधिकारी/कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी याबाबतचे आदेश मध्यरात्री काढण्यात आले. 

परळी शहरातून इतर भागामध्ये विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून परळी शहरात ०८ दिवसांसाठी (१२ जुलै राजी रात्री १२.०० या पयंता संपूर्ण संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. कुणालाही घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे व खालील प्रमाणे निर्दश देण्यात आले आहेत.

वैद्यकीय सेवा, वर्तमानपत्रे व माध्यमांविषयक सेवा २४ तास सुरु राहतील.

• परळी शहरात विशेष परवानगी शिवाय कोणालाही या कालावधीत प्रवेश करता येणार नाही व शहराबाहेरही जाता येणार नाही. तसेच शहराबाहेर जाणेसाठी बाहेरुन शहरात येण्यासाठी

काढण्यात आलेले सर्व पास रद्द करण्यात येत आहेत.

अत्यावश्यक सेवांची शासकीय कार्यालये वगळता सर्व आस्थापना, शासकीय व खाजगी आस्थापना बंद राहतील. वरील विभागांचे कर्मचारी कार्यालये ओळखपत्राद्वारे शहराअंतर्गत प्रवास करू शकतील.


परळी शहरातील नागरिकांना इतर जिल्ह्यात व राज्यात जाण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन पास मिळणार नाही. परंतु मेडीकल Emergence मधील पाससाठी परळी शहरातील नागरिकांनी ऑनलाईन वेबसाईटवर अर्ज करून पास प्राप्त करून घ्यावा.

* परळी शहरात फक्त फिरते दूध विक्रेते यांना परवानगी राहील.

कोणत्याही दुकानदारा मार्फत दूध विक्री केली जाणार नाही अथवा दुकान उघडणार नाही. त्यांनी दूधाची पाकीटाची होम डिलेवरी करावी व ती करत असतांना कोविड-१९ च्या अनुषगाने सामाजिक अंतराचे पालन करावे.

परवानाधारक भाजी न फळ विक्रेते यांना पूर्वी प्रमाणे परवानगी राहील, परतु त्यांनी घरोघरी जावूनच विक्री करावी.

घरगुती गॅस घरपोच सेवा देण्यास परवानगी असेल.

वैद्यकीय कर्मचारी व औषधी विक्रेते यांनी दवाखान्याचे

ओळखपत्र अथवा ऑनलाईन पास द्वारे परळी शहरांतर्गत प्रवासास परवानगी देण्यात येत आहे.

जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करणेबाबतचे आदेश स्वतंत्र काढण्यात येतील.

पोस्ट ऑफिस व बैंक कर्मचारी यांनी स्वत:चे ओळखपत्र वापरून प्रवास करावा. तसेच टॉवर जवळील स्टेट बैंक ऑफ इंडिया शाखा परळी ग्राम (कोड ३४०६) बैंक संपूर्णपणे बंद राहील,

अंत्यविधी साठी शासनाचे पत्रकात नमूद केलेनुसार नियमानुसार परवानगी असेल

परळी औष्णिक विद्युत केंद्र चालू राहील यथील कर्मचारी यांनी ओळखपत्र वापरुन कामकाज करावे.

• धर्मापूरी रोडवरील परळी येथील सिमेंट फैक्टरी रेल्वे फाटक जवळ मधील कमीत-कमी कर्मचारी/कामगार यांना उपविभागीय अधिकारी, परळी यांचे शिफारशी प्रमाणे परवानगी असेल.

सर्व प्रकारची मालवाहतूक, रेल्वेची मालवाहतूक अनुषगाने परळी शहराच्या हद्दीतील गोदाम चालवण्यास परवानगी देण्यात येत आहे. सदर कामकाज करणारे कर्मचारी/हमाल त्यांचे ओळखपत्र वापरुन कामकाज करतील.

सदर आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी.

No comments:

Post a comment