तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 1 July 2020

परळीत आषाढीनिमीत्त वारकरी वैद्यनाथ, जगमित्र मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी नतमस्तकपरळी (प्रतिनिधी)
 आषाढी एकादशी निमीत्त परळी व परिसरातील वारकर्यांनी प्रभु वैद्यनाथ व संत जगमित्र मंदिराच्या प्रवेशद्वारवर नतमस्तक होवुन दर्शन घेतले.परळी शहर व परिसरातुन टाळ-मृदंगाच्या गजरात दिंड्या दाखल झाल्या होत्या.
 आषाढी एकादशी निमीत्त बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या वैद्यनाथ व संत जगमित्र मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते.आषाढी एकादशी निमीत्त भाविकांची सकाळपासूनच गर्दी होत होती.संत जगमित्र मंदिरात आषाढी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी लॉकडाऊनमध्ये मंदिरे बंद असल्याने भाविकांनी वैद्यनाथ मंदिराच्या उत्तरघाटावरील पायर्या व संत जगमित्र मंदिराच्या प्रवेशद्वाराचे दर्शन घेतले.सोशल डिस्टन्स चे नियम पाळत छोट्या दिंड्याद्वारे भाविकांनी दर्शन घेतले.

No comments:

Post a comment