तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 1 July 2020

परळी संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष राजेभाऊ पौळ यांचा सिरसाळा येथे सत्कारपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- संजय गांधी निराधार परळी तालुका अध्यक्ष राजेभाऊ चाचा पौळ यांची नुकतीच निवड झाली होती. याच पार्श्वभूमीवर सिरसाळा ग्रामपंचायत वतीने सत्कार करतांना सरपंच रामदादा किरवले  यांच्या हस्ते पुष्पहार घालून यथोचित सत्कार करण्यात आला. सत्कार प्रसंगी सिरसाळा ग्रामपंचायतचे सदस्य संतोषराव पांडे निहाल मणियार नदीम शेख ग्रामसेवक शेख सर हे उपस्थित होते. यावेळी तालुका अध्यक्ष लक्ष्मनतात्या पौळ माधवराव नायबळ श्री चंद्रकांत कराड व इतर उपस्थित होते. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली परळी तालुक्यातील सर्व निराधारांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे ग्वाही नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष राजेभाऊ पौळ यांनी दिली.

No comments:

Post a comment