तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 23 July 2020

ऑनलाईन निबंध स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद



पियुष दवंडे व प्रा.महेश कुलकर्णी प्रथम

सेलू, दि.२३ ( प्रतिनिधी )  : येथील दलित मित्र कै. श्रीरामजी भांगडीया यांचा स्मृतिदिन आणि नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या ८१ व्या वर्धापन दिना निमित्त कोव्हीड - १९ च्या पार्श्वभूमीवर जन जागृतीच्या दृष्टीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धचा निकाल गुरूवारी (२३ जुलै ) जाहीर झाला. जिल्हास्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धेत नववी ते बारावी गटात ज्ञानोपासक महाविद्यालय परभणीचा पियुष आसाराम दवंडे प्रथम , नूतन कन्या प्रशाला सेलूची विद्यार्थीनी साक्षी सुरेश राऊत द्वितीय तर ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी येथील नंदिनी सुनील कुलथेने तिसरा क्रमांक मिळवला. शिक्षक प्राध्यापक गटात प्रा.महेश कुलकर्णी प्रथम, अतुल पाटील , श्रीकांत नेवरेकर विभागून द्वितीय , किर्ती राउत , प्रणिता सोलापुरे विभागून तृतिय , काशिनाथ पल्लेवाड उत्तेजनार्थ तर किरण देशपांडे , प्रा.हनुमान व्हरगुळे प्रोत्साहनपर पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयातील डाॅ.अशोक पाठक आणि कवी शरद ठाकर हे निबंधाचे  परीक्षक होते. निबंध स्पर्धा यशस्वीतेसाठी  पर्यवेक्षक प्रा.नागेश कान्हेकर , सुरेश हिवाळे , अशोक लिंबेकर , सुरेखा आगळे यांनी परिश्रम घेतले. सर्व यशस्वी स्पर्धकांचे नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डाॅ.एस.एम.लोया , सचिव डी.के.देशपांडे , सहसचिव प्राचार्य  डॉ. विनायकराव कोठेकर , जयप्रकाश बिहाणी , प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी , एन.पी.पाटील, मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी ,संगीता खराबे , रेवती देशपांडे , उपमुख्याध्यापक अशोक वानरे, डी.बी.घोगरे , पर्यवेक्षक रामकीशन मखमले , आर.एन.सोन्नेकर यांनी अभिनंदन केले आहे.

...

No comments:

Post a comment