तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 28 July 2020

परळी तालुक्यातील ३ ठिकाणी कंटेनमेंट झोन शिथिल


बीड,(प्रतिनिधी) दि.28:- परळी तालुक्यातील नंदागोळ, ब्रह्मवाडी, नाथरा   या ३ गावातील प्रतिबंध शिथील करण्यात येत असून परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे असे आदेश अप्पर  जिल्हादंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिले आहेत.

या ठिकाणी प्रतिबंधात्मक कार्यक्षेत्रामध्ये मागील १४ दिवसात एकही कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आला नाही असे  जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद,बीड यांनी कळविले आहे.

परळी तालुक्यातील नंदागोळ, ब्रह्मवाडी, नाथरा   या गावात संबंधित परिसरातील  कन्टेनमेंट झोन (Containment zone) शिथील करण्यात आले आहे

या भागात संबंधित परिसरातील परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे असे आदेश दिले आहेत.

बीड जिल्हयात फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम १४४(१) (३) अन्वये दिनांक ३१ जुलै २०२० रोजीचे रात्री १२.०० वा. पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत, सदर आदेश या आदेशासह अंमलात राहतील.

No comments:

Post a comment