तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 26 July 2020

वीरगाव पोलिसानां कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित ....


गोरख पवार वैजापूर औरंगाबाद

 वैजापुर तालुक्यातील वीरगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 43 गावात दिवस रात्र परिसरात गस्तीवर असणारे वीरगाव पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांचा नुकताच कोरोना योध्दा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. परिसरातील गावोगांव कोरोना च्या पार्श्वभूमीवर वीरगाव पोलिसांनी चेकपोस्टसह गावोगावी  कडेकोट बंदोबस्त ठेवल्याने पोलिस ठाण्याअंतर्गत 43 गावात अद्याप एकही कोरोना रूग्ण आढळलेला नाही त्यामुळे शनिवारी महाराष्ट्र संपादक व पत्रकार संघटना - प्रदेश सह सचिव दैनिक प्रतिवीर समुहातर्फे उपसंपादक विलास म्हस्के यांनी वीरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांना कोरोना योध्दा पुरस्कार प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार संतोष गायकवाड व पोलिस ठाण्यातील कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a comment