तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 4 July 2020

परळीत बोगस सोयबीन बियाणे प्रकरणी या दोन कंपनीवर गुन्हा दाखलपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  सोयाबीनच्या बोगस बियाणे प्रकरणी ग्रीन गोल्ड सीड्स प्रायव्हेट लिमिटेड (औरंगाबाद) व वसंत अँग्रो अकोला या कंपनीविरोधात येथील तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवणे यांच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

अनेक वर्षांनंतर यंदा मृग नक्षत्रामध्ये चांगला पाऊस पडल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीनसह इतर पिकांची पेरणी केली; मात्र बाजारात बोगस बियाणे आल्याने पेरणी केलेले सोयाबीन उगवले नाही. यासंदर्भात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्यानंतर शासनाने कृषी विभागाकडून पंचनामे केले; तसेच याची दखल उच्च न्यायालयाने घेतली व बोगस बियाणे कंपन्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

तालुक्यात हजारावर शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार पंचनामे करण्यात आले होते. पंचनाम्यात ग्रीन गोल्ड सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने सोयाबीन बियाणे वाण जी ३३४४, जे ३५५३, जी ३०६ व जीएस ३५५, s१२०८  इतर बियाणांचा पेरा पेरणी झालेल्या ठिकाणी पाहिला असता हे निकृष्ट दर्जाचे असल्याचे तालुका तक्रार निवारण समितीच्या पाहणीत स्पष्ट झाले.

त्यामुळे तालुका कृषी अधिकारी श्री.सोनवणे यांनी येथील पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. दोन) व शुक्रवार दि.03 जुलै रोजी तक्रार दाखल केल्यानंतर कंपनी व व्यवस्थापक संदीप बावस्कर (गंगापूर, औरंगाबाद) व वसंत अँग्रोटेक अकोला व्यवस्थापक गजानन किशनराव काळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a comment