तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 3 July 2020

संगणकपरिचालकांना दगडाने मारण्याची भाषा करणार्‍या धारूरच्या बीडीओना निलंबित करा – सिद्धेश्वर मुंडे


ग्रामविकासमंत्री ना.हसन मुश्रीफ,पालकमंत्री ना.धंनजय मुंडे यांना संघटनेने दिले निवेदन

संगणकपरिचालकांना जनावर समजता का? राज्यभरात संतापाची लाट !

बीड/परळी(प्रतींनिधी) :-धारूर तालुक्यातील संगणक परिचालकांना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले यांनी सुनावणी घेत असताना कार्यालयात दगड आणून दगडाने मारण्याची भाषा केली असून,अशा प्रकारे हुकुमशाही करून जानवरा प्रमाणे दगडाने मारण्याची भाषा करणार्‍या धारूरच्या गटविकास अधिकारी यांना निलंबित करून प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी राज्याचे ग्रामविकासमंत्री ना.हसन मुश्रीफ,पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्यासह बीडचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे केल्याचे महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी सांगितले.

      याबाबत सविस्तर वृत्त की, राज्यातील आपले सरकार सेवा केंद्रातील संगणकपरिचालक हे csc –spv कंपनी कडून  नियुक्त करण्यात आलेले असून,ग्रामविकास विभागाच्या ११ ऑगस्ट २०१६ च्या शासन निर्णयानुसार असलेले कामे संगणकपरिचालकाने करणे आवश्यक आहे.तसेच संगणकपरिचालक हे शासकीय,निंशासकीय,कंत्राटी स्वरूपाचे किंवा ग्रामपंचायत,पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेचे कर्मचारी नाहीत.त्यामुळे संगणकपरिचालकांना ग्रामपंचायत कार्यालयात कार्यालयीन वेळेत दिवसभर बसून राहून काम करणे सुद्धा बंधनकारक नाही,तरीही आवश्यकता असेल तेव्हा संगणकपरिचालक काम करतात,कोरोंनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत स्तरावर स्वयंस्फूर्तीने संगणकपरिचालक काम करत आहेत. ग्रामपंचायत संगणकपरिचालकांना एक तर वर्ष वर्ष मानधन मिळत नाही त्यात कोरोंनाच्या मोहिमेत गावपातळीवर सक्रिय सहभाग असताना सुद्धा प्रोत्साहनपर भत्ता सुद्धा शासनाने दिलेला नाही.तरीही ग्रामपंचायत स्तरावर असलेले काम संगणकपरिचालक करत आहेतच. संगणकपरिचालकांना आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पा व्यतिरिक्त इत्तर कोणतेही किंवा कोणत्याही विभागाचे काम ग्रामविकास विभागाच्या परवानगी शिवाय कोणीही करायला सांगू शकत नाही,तरीही धारूर जि.बीड येथील संगणकपरिचालकानी तेथील मा.गटविकास अधिकारी अकेले यांचा मान ठेऊन आरोग्य विभागात डाटा एंट्रीचे काम केले.वास्तविका तालुका स्तरावर डाटा एंट्रीसाठी आरोग्य विभाग किंवा पंचायत समितीने इत्तर व्यक्तींची नेमणूक करणे आवश्यक आहे.असे असताना धारूर तालुक्यातील संगणकपरिचालक १)अण्णासाहेब तिडके २)अकबर पठाण ३)गोपीनाथ तिडके ४)गोविंद तिडके व ५)सद्दाम सय्यद यांची नियुक्ती आरोग्य विभागात डेटा एंट्री करण्यासाठी केली,त्यांना मागील ६ महिन्यापासून मानधन सुद्धा मिळालेले नसताना ते काम करत होते.परंतु गावातील कामसह या कामाचा लोड वाढल्यामुळे आणि वरुन मानधन नसल्यामुळे हे संगणकपरिचालक आरोग्य विभागात काम करण्यास गेले नसतील तर धारूर येथील गटविकास अधिकारी श्री सोपान अकेले यांनी त्यांना नोटिस काढली आणि संगणकपरिचालकांना तेथे बोलावून घेऊन याबाबत विचारणा केली विचारणा करत असतानाच गटविकास अधिकारी यांनी कार्यालयातील शिपाई यांना बाहेरून दगड आणण्यास सांगितले व दगड आणले सुद्धा आणि ते संगणकपरिचालकांना मारणार सुद्धा होते परंतु त्याठिकाणी असलेले पंचायत समितीचे पदाधिकारी असल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

         असा प्रकार महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडला असून एखाद्या कर्मचार्‍याला कार्यालयात दगडाने मारण्याची भाषा करणारा अधिकारी स्वतःला हुकूमशहा समजतो का? की संगणकपरिचालकांना जनावर समजतो.त्यामुळे राज्यभरात या घटनेचा निषेध करण्यात येत आहे.अशी मनमानी व मग्रूरपणा करणार्‍या धारूरच्या गटविकास अधिकार्‍यावर तत्काळ कारवाई करावी अन्यथा राज्य संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी सांगितले.

कर्तव्यदक्ष सीईओ,कलेक्टर साहेब अशा बीडीओ वर कारवाई करणार का?

     अशा प्रकारे कार्यालयात शिपाया मार्फत दगड आणून जानवराप्रमाणे ग्रामपंचायत स्तरावर काम करणार्‍या संगणकपरिचालकांना वागणूक देणार्‍या धारूरचे गटविकास अधिकारी सोपान अकेले यांना निलंबित करून त्यांच्यावर बीडचे कर्तव्यदक्ष सीईओ,कलेक्टर साहेब कारवाई करणार का? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a comment