तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 25 July 2020

त्या दुचाकी अपघात प्रकरणी कंत्राटदारावर गुन्हयात एक कलम वाढविली
मंगरुळपीर- रस्ता कामात सुचनाफलक व इतर खबरदारी म्हणून कोणत्याही प्रकारचे फलक न  लावल्याने झालेल्या दुचाकी अपघातामुळे वाहनाचे प्रचंड नुकसान होऊन फिर्यादी गंभीर जख्मी झाल्याने पोलिसांनी सदर बेजबाबदार कंत्राटदारावर ता २४ रोजी गुन्हा दाखल केला परंतु ता २५ रोजी घटनास्थळाचा पंचनामा केल्यावर  पोलिसांनी अजून एक कलम वाढविली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी शरद येवले रा शहापूर यांनी पोलिसांत तक्रार दिली की,ता २१ रोजी रात्री दहा वाजताचे सुमारास फिर्यादी हे मेडिकल स्टोअर्स मधून औषधी घेऊन घरी जात असतांना सुधाकर देशमुख रोहणेकर यांचे घरासमोरील रस्त्याचा खड्डा न दिसल्याने फिर्यादी हे दुचाकी क्र एम एच ३७ वाय ७४४९ सह खड्ड्यात पडले त्यामुळे स्वतः गंभीर जख्मी होऊन वाहनाचे नुकसान झाले. सदर रस्त्याच्या कंत्राटदाराने याठिकाणी सुचनाफलक,किंवा इंडिकेटर व रिफ्लेकटर न लावल्याने हा अपघात झाला.अशा तक्रारीवरून पोलिसांनी स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन चे कंत्राटदार भास्करराव माने यांचेवर कलम ३३७,३३८ भादवी नुसार गुन्हा दाखल केला होता. परंतु ता २५ रोजी पोलिसांनी याप्रकरणी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असता या प्रकरणात अजून ४२७ कलम वाढविली असून या प्रकरणाचा तपास ठाणेदार धनंजय जगदाळे यांचे मार्गदर्शनात पीएसआय मंजुषा मोरे,हेकॉ अरविंद सोनोने,महादेव सोलंके व धम्मपाल धम्मकीर्ती करीत आहेत.

फुलचंद भगत,वाशिम

No comments:

Post a comment