तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 28 July 2020

राजश्री पाटील यांच्या हस्ते टोकाईगड येथे सहयाद्री देवराई अंतर्गत वृक्षारोपण



हिंगोली प्रतिनिधी 

हिंगोली : वसमत तालुक्यातील कुरुंदा  परिसरातील ऐतिहासिक परंपरा व अद्वितीय भुमितीय स्थान लाभलेल्या   टोकाईगडाला गोदावरी अर्बन बँकेच्या अध्यक्ष  राजश्री पाटील यांनी भेट दिली.यावेळी त्यांच्या हस्ते गडावर वृक्षारोपण  करण्यात आले . 
  सह्याद्री देवराई उपक्रमांतर्गत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ओसाड माळरानावर वृक्षाचे नंदनवन फुलविण्यासाठी वृक्षारोपण करण्यात येत आहे .याच अनुषंगाने कुरुंदा जवळील टोकाईगड येथे वृक्षारोपण करण्यात आले प्रमुख उपस्थिती राजश्री  पाटील यांच्या  हस्ते वड , पिंपळ , करंज , कडूनिंब यासारखी बहुवर्गीय  , बहुगुणी झाडे लावण्यात आली. तसेच सह्याद्री देवराईच्या युवकांनी  विकसीत केलेल्या दहा गुंठ्यावरील घनवनाची पाहणी देखील  केली,राजश्री पाटील यांनी केली . यात वेलवर्गीय , औषधी , घन , बहुवर्षीय अशा सुमारे तीन हजार झाडांची लागवड केलेली आहे. टोकाई गडाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.शहाजीराजांचे वास्तव्य असताना   बांधलेली बारव व पावसाळी छावणीच्या इतिहास कालखंडातील वैभवशाली परंपरा जोपासत ही सह्याद्री देवराई परिसरातील जैवविविधतेचे वैभव वाढवणारी आहे.याप्रसंगी सरपंच सौ. प्रीतीताई दळवी व डॉ. प्रभाकर दळवी यांनी राजश्रीताई व मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले.  टोकाई गडाचे गौरवशाली वैभव जोपासणाऱ्या सह्याद्री देवराई प्रकल्प व ग्रामस्थांच्या कार्यात सहभाग नोंदवून राजश्री पाटील यांनी सर्वांना प्रोत्साहन दिले. याप्रसंगी त्यांच्या पुढाकारातून गडाच्या परिसरात झाडे लावण्यासाठी हिंगोली जिल्हा युवासेना प्रमुख  बाजीराव सवंडकर यांनी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे  सह्याद्री देवराई साठी अभिवचन दिले.शिवसेना जिल्हा उपप्रमुख सुनिलभाऊ काळे , नगराध्यक्ष श्रीनिवास पोरजवार , वसमत तालुका प्रमुख बालाजीराव तांभाळे , शहर प्रमुख काशिनाथ भोसले , हिंगोली युवासेना जिल्हाप्रमुख तथा अध्यक्ष खादी ग्रामोद्योग बाजीराव सवंडकर , नगरसेवक धनंजय गोरे , नगरसेवक दिलिप भोसले , माजी सरपंच दत्तमराम इंगोले , माजी जि. प. सभापती रंगराव इंगोले , दत्ता नवले  , प्रा. नामदेव दळवी , सौ. मिनाताई दळवी , धनंजय पवार , वसमत विधानसभा जनसंपर्क अधिकारी राजा कदम , सह्याद्री देवराई कुरूंदाचे सर्व स्वयंसेवक तसेच ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.


तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment