तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 26 July 2020

पि.राजा नंतर डोणगांव पोलीस स्टेशनवर कोरोनाचे संकट,कारभार चालणार मेहकर ठाण्यातून.डोणगांव पोलीस ठाण्यातील ४ कर्मचारी पोजिटिव्ह

बुलडाणा - 25 जुलै (जमील पठाण ) 

बुलडाणा जिल्ह्यातील पिंपळगांव राजा येथील ठाणेदार व काही कर्मचारी यांचा कोरोना अहवाल पोजिटिव्ह आल्यानंतर तेथील ठाण्याला कंटेन्मेंट झोन घोषित करुण तिथला कामकाज शिवाजी नगर खामगांव ठाण्याला अटैच करण्यात आला असून आता मेहकर तालुक्यातील डोणगांव पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत एक पोलीस कर्मचारी आज 25 जुलै रोजी कोरोना पोजेटीव्ह निघाल्याने सुरक्षिततेची उपाय योजना म्हणून या पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी हे होम क्वान्टाईन केले व येथील पोलीस स्टेशनचे कारभार मेहकर ठाण्याला अटैच करण्यात आले आहे.

       डोणगांव पोलीस स्टेशन मध्ये एकूण 36 पोलीस अधिकारी व कर्मचारी असून त्यात 2 अधिकारी व 34 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.या ठाण्यात कार्यरत एक पोलीस कर्मचारीची तब्यत बिघडल्याने व त्याचे लक्षण कोरोना सारखे दिसल्याने त्याची कोरोना तपासणी केली असता आज 25 जुलै रोजी अहवाल कोरोना पोजेटीव्ह मिळून आल्याने येथील  पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी यांना तातडीने मेहकर येथील क्वारन्टाईन सेंटर मध्ये आनले असून त्यांची कोरोना तपासनी केली   व त्या टेस्ट मध्ये पुन्हा ३ पॉझिटीव्ह असल्याची माहिती प्राप्त झाली असुन आता ४ पोलीस कर्मचारी पॉझिटीव्ह निघाले त्यामुळे डोणगांव पोलीस स्टेशनचा कारभार हा मेहकर ठाण्यातुन चालणार असल्याची माहिती मेहकर विभागीय पोलीस अधिकारी डी. बी.तडवी यांनी दिली आहे.सद्या जिल्ह्यातील 2 पोलीस स्टेशन कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले आहे.

No comments:

Post a comment