तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 19 July 2020

युवाशक्तीला वाव देणारे कणखर नेतृत्व ना.धनंजयजी मुंडे साहेब.


   देशाच्या जडणघडणीत युवाशक्तीचे महत्व सर्वाधिक असते अनेक महापुरुषांनी युवाशक्तीचे महत्व सांगीतले आहे.आजच्या आधुनिक भारतात अनेक राजकिय नेते युवकांच्या पाठबळावर घडले आहेत,घडत आहेत ज्यांच्याकडे युवाशक्ती विधायक कार्याकडे वळवण्याची क्षमता आहे ते नेते प्रभावी ठरतात.बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजीक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे साहेब हे नेतृत्व तर कायम युवकांचे आयकॉन राहिलेले आहेत.या युवाशक्तीबरोबरच समाजातील सर्व घटकांना सोबत घेवुन चालणारा नेता म्हणुन ना.धनंजय मुंडे साहेबांची ओळख आहे.अशा या नेतृत्वाचा आज वाढदिवस... आमच्या या नेतृत्वास वाढदिवसाच्या शुभेच्छा.
 शेतकरी,कष्टकरी समाजबांधवांचे कैवारी स्व.पंडीतअण्णा मुंडे यांच्या संस्कारात व लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या राजकिय छत्रछायेखाली राजकिय जीवनात पाऊल ठेवणार्या ना.धनंजय मुंडे साहेबांचा आजपर्यंतचा राजकिय प्रवास आम्हासारख्या लाखो युवकांना प्रेरणा देणारा आहे.बालपणापासुनच मित्रांच्या गराड्यात राहण्याच्या मुळ स्वभावामुळे त्याच्याकडे युवावर्ग आकर्षित होत गेला.ना.धनंजय मुंडे साहेबांच्या जिल्हा परिषद सदस्य ते राज्याचे कॅबिनेट मंत्रीपदापर्यंतचा प्रवास युवाशक्तीच्या पाठबळावरच झाला आहे.आज ते राज्य सरकारमधील प्रभावी काम करणारे मंत्री म्हणुन ओळखले जात आहेत.देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी ना.धनंजय मुंडे साहेबांवर सोपविल्यानंतर त्यांच्यातील नेतृत्वगुणांची क्षमता महाराष्ट्राला कळली.सरकारच्या चुकीच्या धेय धोरणांना कडाडून विरोध करणार्या ना.धनंजय मुंडे साहेबांच्या अभ्यासू भाषणात स्व.प्रमोदजी महाजन यांच्या भाषणाची छबी दिसत असल्याने त्यांच्याकडे समाज मोठ्या प्रमाणात आकर्षीत झाला.समाजातील सर्व स्तरातील नागरीकांना सहकार्य करण्यासाठी सदैव तत्पर असलेले ना.धनंजय मुंडे यांनी जनसामांन्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सक्षम फळी तयार केल्याने गोरगरीब,शेतकरी वर्ग समाधानी आहे.राज्याच्या मंत्रीपदावर कार्यरत असताना सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होणारा,केवळ एका फोनवर कसल्याही समस्येची सोडवणूक करणारा हा नेता.प्रशासकीय पातळीवरील कामाबरोबरच सामाजीक क्षेत्रातही त्यांच्या कार्याचा महायज्ञ सुरुच आहे.सध्या सुरु असलेल्या कोरोना संसर्गाच्या काळात हातावर पोट असलेल्या गरीब जनतेचे हाल होवु नये यासाठी आपल्या नाथ प्रतिष्ठाणच्या माध्यमातुन अन्नधान्य,भाजीपाला च्या रुपाने मोलाची मदत करत परळीतील जनतेला मोठा आधार दिला. लॉकडाऊन काळात ना.मुंडे साहेबांचा परळीकरांना आधार असल्याने अनेक अडचणीवर मात करता आली.सर्वसामांन्याच्या कामासाठी सतत हळवा असणारा हा नेता प्रशासकीय पातळीवर कार्य करताना खंबीर असल्याने बीड जिल्ह्यात अनेक विकासाच्या योजना येत आहेत.परळी मतदार संघातील जनतेच्या जिव्हाळ्याचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत यात  
 परळी साठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत मंजुर केली, परळी अंबाजोगाई रस्ता, परळी शहराचा बायपास, परळी धर्मापुरी रस्ता, परळी गंगाखेड रस्ता, ११०कोटी ची भुयारी गटार योजना ,शेतकरी पीक विमा कंपन्यांनी बीड जिल्हा वगळला होता. तो परत कंपन्यांनी बीड जिल्हा सहभागी करून घेतले. यासह येणार्या काळात शाश्वत विकास कसा असतो हे नामदार धनंजयजी मुंडे साहेब बीड जिल्ह्यातील जनतेला दाखवून देतील हा आमचा आमच्या नेतृत्वावर विश्वासच नाही तर खाञी आहे. अशा लोकमान्य लोकश्री नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांना जन्म दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा
 आपलाच @ भक्तराम फड .रा.भोजनकवाडी. ता.परळी. जि.बीड.

No comments:

Post a comment