तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 2 July 2020

पंढरपूरच्या आषाढ़ी एकादशी निमितं घेऊया वसा शिक्षणाच्या वारीचा

 
   कोरोना सारख्या महाभयंकर संकटाच्या काळात खुप साऱ्या परिवारासोबत वेगवेगळे संकट ओढवले आहे. दोन वेळच्या जेवणाची देखील सोय करू शकत नाही. नानाविध अशा समस्यांना तोड़ द्यावे लागत आहे.अश्या गंभीर प्रसंगी प्रशासन,राजकीयनेते,सफाई कर्मचारी,पोलिस, पत्रकार, डॉक्टर, सेवाभावी संस्था तसेच सामाजिक  कार्यकर्ते शक्य होईल तेवढी मदत समाजात करत आहेत.जसे की जेवण,अन्नधान्य,किराणा मास्क सॅनीटायझर,अर्सेनिक गोळ्या,अशा स्वरुपात मदत पुरवित आहे .अशाच एका सामाजिक  कार्य करणाऱ्या समाजसेवक दांपत्त्याने आषाढी एकादशी निमित्त वसा शिक्षणाच्या वारीचा हा उपक्रम हाती घेतला आहे.तो म्हणजे खुप कुटुंबामध्ये दोन वेळच्या जेवणाची सोय नाही तर ती त्याच्या मुलांना शिक्षण कुठून देणार, आॅनलाईन शिक्षण कसे देणार, याच गोष्टीची दाखल घेत नरेंद्र लोहार व त्यांची पत्नी सौ यामिनी नरेंद्र लोहार  या दापत्याने ग़रीब गरजु मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा मानस हाती घेतला आहे. तसेच समाजातील उदार दातृत्वाच्या दानशुर लोकांना आणि सामाजिक संस्थाना देखील आवाहन करत आहे की तुम्हीदेखील तुमच्या आजुबाजुला असलेल्या गरीब कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी दत्तक द्यावे अथवा त्या मुलांना फुल नाही तर फुलाची पाकळी या उद्देशाने जे शक्य होईल ते शैक्षणिक साहित्य पुरवावे जेणे करुन येणारी भावी पीढी गरीबीमुळे शिक्षणाला वंचित राहणार नाही जरी त्यांना आॅनलाईन शिक्षण घेणं शक्य नसले तरी ते शैक्षणिक साहित्य असल्याने वाचन,अक्षरलेखन,चित्रकला व इतर कामं करत आपले ज्ञान विकसित करू शकतात.त्यासाठी आपल्याला शक्य होईल ते योगदान आपल्या आजूबाजूला असलेल्या गरीब,गरजू मुलांना द्यावे. हे नम्र विनंती आणि आवाहन

            धन्यवाद
सौ यामिनी नरेंद्र लोहार
        समाजसेविका
              मुंबई
     8425809292

No comments:

Post a comment