तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 18 July 2020

आत्ता आपल्या सेनगाव तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत घाबरून न जाता काळजी घ्यासाखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

सध्या आपल्या सेनगाव तालुक्यातील  आजूबाजू ला कोरोना रुग्ण सापडत आहेत, याचे जास्त टेन्शन घेऊ नका. हे कधीना कधी होणारच होते, त्याची सुरुवात आहे असे समजा. सगळ्यात महत्वाचे जो कोणी कोरोना positive होईल त्याच्या बद्दल, भीती,  घृणा मनामध्ये आणू नका,सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथे कोरोनाचा रुग्ण सापडला होता त्यामुळे हिवरखेडा येथील गावकऱ्यांना वेगळ्या नजरेने पाहिले जात होते स्वता मला हि वाटर फिल्टर वर पाणी दिले नाही खडकी येथील जगदंबा वाटर फिल्टर वर पाणी आणण्यासाठी गेलो तर मला वापस करण्यात आले होते वास्तविक मि त्या कोरोना रुग्णांच्या संपर्कात देखिल नव्हतो तरी मला पाणी दिले नाही जर मला पाणी दिले नाही तर त्या रुग्णांच्या घरच्यांना कोण पाणी देणार हिवरखेडा येथील सुमारे 30 जणांच्या संपर्कात तो पोजिटिव्ह व्यक्ती आला होता त्यामुळे 30 जणांचे स्वब घेण्यात आले होते त्यामधील सर्वाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले त्यामुळे परिसरात आत्ता कूठ नागरिकांना दिलासा मिळाला आहे  त्यामुळे सर्वांना होईल तेव्हडी मदत करा सोशल डिस्टनचे पालन करा आणि मास्क चा वापर करा   कारण ही वेळ कोणावरही येऊ शकते. पण सगळ्यात महत्वाचे  या आजाराला जास्त घाबरू नका. अनेक तज्ञ डॉक्टरांचे म्हणने आहे की रोगा पेक्ष्या त्याच्या भीतीने जास्त लोक मरत आहेत, फक्त भीती आणि हार्ट अटॅक ने. कोणतीही negative बातमी पसरू देऊ नका. एकमेकांना सतत फोन वर बोला, मन हलकं करा, कोरोना वर जास्त बोलू नका, बोलला तर फक्त चांगलं बोला. दुसऱ्याला आधार वाटेल असेच बोला. आज सगळे चिंतेत आहेत त्यामुळे खाली उतरायला पण घाबरतात. काळजी घ्यायचीच आहे, पण मानसिक त्रास होईल इतकी पण नाही. तणाव हा वेगळ्या आजारांना आमंत्रण आहे. तणाव रहित राहायचे तर, एकटे कोंडून घेऊन चालणार नाही. मोकळा श्वास घ्या, सर्व मित्रांशी कायम बोलत राहा. त्यातून मन हलकं करा. ही आजच्या काळाची गरज आहे. सर्वांशी कायम बोलत राहा, फक्त कोरोना विषयी अजिबात बोलू नका, किंवा चांगले फक्त धीर देणारे बोला. बघा फरक वाटेल, मन शांत होईल, चांगली झोप लागेल, आणि तरच तब्बेत चांगली राहील. अजिबात घाबरू नका आणि दुसर्यांना घाबरवू नका ही विनंती.🙏
शिवशंकर निरगुडे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनां प्रसिध्दी प्रमुख सेनगाव

तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment