तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 29 July 2020

शालांत प्रमाणपत्र परिक्षेतील इमदादुल-उलूम माध्यमिक शाळेच्या घवघवीत यश



परळी वैजनाथ ( प्रतिनिधि) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आज दिनांक 29 जुलै बुधवारी रोजी दुपारी एक वाजता दहावी बोर्डाचा निकाल जाहीर करण्यात आला शालांत प्रमाणपत्र परीक्षेत महॆबूबया  शिक्षण संस्थाद्वारा संचालित इमदादुल उलूम माध्यमिक शाळेने यशाची उज्वल परंपरा कायम ठेवत घवघवीत यश प्राप्त केले आहे
शाळेच्या 90.97% निकाल लागला आहे इमदादुल उलूम माध्यमिक शाळेतून शालांत प्रमाणपत्र परीक्षेत एकूण 144 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यात 131 विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण झाले 16 विद्यार्थ्या विशेष प्रविण्यासह प्रथम श्रेणीत 38 व्दितीय श्रेणीत 55 विद्यार्थी उत्तीर्ण झाले 
शाळेसह परळी शहरातून (उर्दू माध्यम) सिद्दिकी अब्दुल अलीम अब्दुल फहीम या विद्यार्थ्याने 90.20%  गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळवला.सय्यद निगार मुबीन 87.60% गुण घेऊन व्दितीय तर शेख जजामाहीन मोहम्मद अली 87% गुण घेऊन तुतीय क्रमांक मिळवले तसेच शेख जोबीया जरमीन 86.80% , कुरेशी अदनान जाफर 85% ,इनामदार जवेरया मुस्कान 84.40% गुण घेत घवघवीत  यश प्राप्त केले
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल  महॆबूबया शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शेख खाजा महॆताब उपाध्यक्ष शेख अहेमद फख्रोद्दीन सचिव सय्यद हनिफ स.करीम ( बहादुर सर) शाळेचे मुख्याध्यापक सय्यद वाजेद स.खादर, खालेद सर, एजाज सर, सय्यद अनवर सर, बखश सर व सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिली

No comments:

Post a comment