तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 18 July 2020

नागापूर येथील वाण धरणाच्या पाणी साठ्यात जून महिन्यात धरण क्षेत्रातील चांगल्या पावसामुळे आवक वाढली

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
           शहरासह तालुक्यातील १५ गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या नागापूर येथील वाण धरणाच्या पाणी साठ्यात जून महिन्यात धरण क्षेत्रातील चांगल्या पावसामुळे आवक वाढली आहे. असाच पाऊस पडला तर यंदा लवकरच धरण भरण्याची शक्यता आहे.
                  गेल्या दोन तीन वर्षात धरण क्षेत्रात अत्यंत कमी पाऊस झाला होता.म्हणून धरण काही भरत नव्हते. एक वर्षा अगोदर धरण कोरडेठाक पडले होते. मात्र मागच्या वर्षी परतीच्या पावसामुळे वाण धरणात ४० टक्के पाणीसाठा जमा झाला होता. या धरणाची क्षमता १९.७०७ दलघमी आहे. सध्या जुन,जुलै महिन्यात वाण धरणाच्या क्षेत्रात आतापर्यंत पडलेल्या पावसाने धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होवून ६.३६१८ झाला आहे. एकुण पाणी साठा ३२.८३ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. या अगोदर चार वर्षांपूर्वी हे धरण भरले होते. ते मागच्या चार वर्षात पुन्हा भरला नाही.  अशाप्रकारे पाऊस पडत राहिल्यास यंदा लवकरच धरण भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे परळीकरांसह, तालुक्यातील १५ गावे व शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे.

No comments:

Post a comment