तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 20 July 2020

माखणी शिवारात रानडुकराच्या उपद्रवाने शेतकरी हैराण
ताडकळस /प्रतिनिधी शेख शेहजाद
दि.२० जुलै, पूर्णा तालुक्यातील माखणी शिवारामध्ये मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड करण्यात आलेली आहे.  परंतु उभ्या पिकांमध्ये रानडुकरे हैदोस घालत मोठ्या प्रमाणावर पिकाचे नुकसान करत असुन रानडुकराच्या उपद्रवाने शेतकरी पुरते हैराण झाले आहेत.
माखणी परिसरातील अनेक शेतकऱ्यांकडे जलसिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस पिकाची लागवड केली जाते. कापूस, सोयाबीन, ज्वारी आदी पिकांच्या तुलनेत उसाची लागवड अधिक आहे. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर लपण असल्यामुळे डुकरांची संख्या मोठ्या प्रमाणावर झाली आहे. ही रानडुकरे उसाच्या शेतीमध्ये शिरून ऊस पिकाचे नुकसान करीत आहेत. ऊस खाण्याबरोबरच ऊसात दडून बसलेली रानडुकरे खत, पाणी देणाऱ्या शेतकऱ्यावरही हल्ला करु शकतात त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झालीआहे. 
वन विभागाने या रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी शेतकऱ्यांमधून मागणी होत आहे.
माखणी शिवारातील ऊस पिकाचे डुकरांच्या उपद्रवामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे या बाबीची स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाने दखल घेऊन बंदोबस्त करावा.

No comments:

Post a comment