तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 28 July 2020

परळीत शहरातून होणारी अवैध राख वाहतुक बंद करा, सोमनाथ फड यांचे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन


5 आँगस्ट पर्यंत राखेची वाहतूकीवर निर्बंध घातले नाहीततर आत्मदहन-सोमनाथ फड

  
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  शहरातील होणारी अवैध राखेची वाहतुक बंद करा, अशी मागणी उपजिल्हाधिकारी यांच्या कडे सोमनाथ फड यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. 

सोमनाथ फड यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परळी परिसारातुन राजरोज दिवस रात्र आवैध राख वाहतुक होत असुन यामुळे परळी-कन्हेरवाडी-अंबाजोगाई रोड वरील सर्व गांवे व अजुबाजोच्या खेडोपाडी नागरीकांना व वयवृध्द यांना दमा व लहान मुला-मुलींचा कुपोषणाचा व इतर सर्व आजराची मोठ्या प्रमाणपणात वाढ होत आहे. तरी में साहेबांनी या आवैध राख वाहतुकीवर निबंध लवकरात लवकर लावण्यात यावे जेणे करून परळी व परीसरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही याची संपुर्ण जबाबदारी आपणावर राहील. अन्यथा आपण याच्याकडे दुर्लक्ष केले तर नाविलाजस्तव दि.५ ऑगस्ट २०२० रोजी आत्मदहन करीत आहे. याची संपुर्ण जाबदारी आपणावर व शासनावर राहील असा इशारा कन्हेरवाडीचे सोमनाथ अच्युत फड यांनी उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. या निवेदनाच्या प्रती ना.धनंजय मुंडे , साहेब बीड जिल्हा पालक मंत्री व सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, जिल्हाधिकारी साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय, बीड मा. तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय,परळी-वैजनाथ, मा. पोलीस निरीक्षक साहेब, ग्रामीण व शहर पोलीस स्टेशन,परळी-वैजनाथ, मा. तलाठी साहेब, तलाठी सज्जा कन्हेरवाडी कार्यालय, परळी-वैजनाथ यांना पाठविण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a comment