तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 19 July 2020

हिवरखेडा येथें श्री संत शिरोमणि सावता महाराज यांची पुण्यतिथी साजरी
साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 


सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथें श्री संत शिरोमणि सावता महाराज यांची 725 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली या वेळी कोरोनाच्या प्रादुर्भाव असल्यामुळे आपआपल्या घरीच सावता महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली सावता महाराज यांच्या ग्रंथाचे वाचन करून नंतर त्यांच्या प्रतिमेला पुष्प हार वाहून गर्दी न करता यंदा घरीच पुण्यतिथी साजरी करण्यात आली आहे हिवरखेडा येथील दत्तराव कुंडलिकराव निरगुडे गेल्या कित्येक वर्षा पासून सावता महाराज यांची पुण्यतिथी साजरी करतात व गावात महाप्रसादचे देखिल आयोजन करतात मात्र या वर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून त्यांनी आपल्या घरीच अगदी सादे पनात सावता महाराज यांची पुण्यतिथी साजरी केली आहें या वेळी पूर्ण गावाला महाप्रसादाची प्रगत न देता आपल्या घरीच प्रसादाचे वाटप केले आहें या वेळी उपस्थितीत  दत्तराव कुंडलीकराव निरगुडे शरद उद्धवराव निरगुडे मोतीराम महाराज पत्रकार शिवशंकर निरगुडे यांनी सावता महाराज याच्या प्रतिमेला पुष्पहार वाहून अभिवादन करण्यात आले 


तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment