तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 1 July 2020

विठ्ठलाला दुग्धाभिषेक करून वाढदिवस साजरामंगरूळपीर(फुलचंद भगत)-भाजपाचे महाराष्टराज्य प्रदेश सदस्य सुरेश लुंगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत देशात कोरोनासारख्या महामारीने जनता ञस्त असल्यामुळे आषाढी कार्तीकेला विठ्ठलचरणी नतमस्तक होवून दुग्धाभिषेक करुन समस्त जनतेच्या सुदृढ आरोग्याविषयी साकडे घालुन आणी परिसरात वृक्षारोपन वाढदिवस साजरा करन्यात आला.
          देशात सध्या कोरोना महामारीने थैमान घातलेले असतांना भाजपाचे सुरेश लुंगे यांनी आपला वाढदिवस अतिशय साध्या पध्दतीने आणी शासकिय नियमांचे पालन करत वाशिम रोडवरील आश्रमामध्ये आषाढी कार्तीकेच्या पर्वावर विठ्ठलाला अभिषेक करुन समस्त जनतेच्या आरोग्याविषयी प्रार्थना करत कोरोना महामारी या देशातुन हद्दपार होवु दे यासाठी साकडे घातले.विश्रामगृह परिसरात या निमित्ताने वृक्षारोपनही करन्यात आले.यावेळी भाजपाचे सुरेश लुंगे,नरेंद्र गोलेच्छा,चितलांगे इंडेनचे संचालक तथा नगरसेवक पुरुषोत्तम चितलांगे,भाजपाचे नगरसेवक अनिल गावंडे,विशाल लवटे,विष्णू चव्हाण,मनोज शर्मा,मोहनसिंग रजोदिया,मोहनसिंग ठाकुर,जितुभाऊ ठाकूर,प्रशांत रत्नपारखी,किशोर जैन,चंद्रमणी इंगोले,गोविंद व्यास,प्रतिक लुंगे,प्रशांत गावंडे,गणेश राऊत यांचेसह आजी माजी भाजपा पदाधिकार्‍यांची ऊपस्थीती होती.

फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206
     9763007835

No comments:

Post a comment