तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 1 July 2020

डॉक्टर्स डे निमित्त सेनगाव येथे वृक्षारोपण करण्यात आलेसेनगाव प्रतिनिधी

        आज  डॉक्टर्स डे निमित्ताने मातोश्री स्वर्गीय लक्ष्मीबाई येवले विद्यालय येथे सरस्वती हॉस्पिटल व प्रसूती गृह चे संचालक डॉ. गजानन कृष्णाजी पायघन यांनी वृक्षारोपण केले. त्यांच्यासमवेत विद्यालयाचे प्राचार्य श्री विजय येवले सर तसेच सहकारी श्री विलास कोकाटे सर श्री गणेश रोडगे उपस्थित होते.
          डॉक्टर्स डे निमित्त आज रोजी सेनगाव येथे शहरातील सर्व डॉक्टरांना शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री संदेश भाऊ देशमुख यांनी कोरोना च्या महामारी च्या काळात जिज्ञासा ने जे डॉक्टर रुग्णसेवा देत आहेत अशा सर्व डॉक्टरांना अभिनंदन शुभेच्छा पर वृक्ष भेट दिले. भेट म्हणून भेटलेले वृक्ष जोपासले गेले पाहिजे या भावनेतून डॉ. गजानन पायघन यांनी लगेच पुढाकार घेऊन वृक्षारोपण केले व या माध्यमातून डॉक्टर्स डे साजरा केला.


तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment