तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 20 July 2020

डोणगाव स्टेट बँके समोर फिजिकल डिस्टन्सिंग चा फज्जा


बुलडाणा (जमील पठाण) :- २०

डोणगाव येथील स्टेट बँके समोर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असताना, कुणावरही कारवाई केली जात नाही. महत्त्वाची बाब म्हणजे, येथे बाहेरून लोक येतात आणि कुठेही थुंकतात. आमच्या आरोग्यालादेखील त्यांच्यामुळे धोका असल्याने परिसर सॅनिटाइज करावा, संबंधितांवर कारवाई करावी, अशी प्रतिक्रिया स्थानिक रहिवासी देविदास खनपटे यांनी व्यक्त केली आहे
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक असताना डोणगाव स्टेट बँकेसमोर पैसे काढण्यासाठी हजारो लाभार्थींची गर्दी दिसून आली. लॉकडाऊनचे उल्लंघन होत असताना, स्थानिक पोलीस, बँक व्यवस्थापन हतबल झाल्याचे दिसून येत आहे.
शासनाचे सर्व नियम दावणीला बांधत मोठ्या संख्येने नागरिक एकमेकांना खेटून रांगेत उभे होते. आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गवई यांनी स्ता: काल मंगळवारी स्टेट बँके येथे येऊन नागरिकांशी चर्चा केली व सोशल डिस्टन्स ठेवायचे सांगितले व त्यांनी सोशल डिस्टन्स सुद्धा नागरिकांना ठेवले व  व्यवस्थित नागरिकांची रांगा सुद्धा लावल्या होत्या मात्र नागरिकांनी ते सोशल डिस्टन्स फक्त एकच दिवसा साठी मर्यादित ठेवून दुसऱ्या दिवशी मात्र येथे जैसे थे झाले अशातच प्रशासन आपल्या वेळे नुसार नागरिकांना वारंवार आवाहन करत आहे व आरोग्य अधिकारी यांनी तर स्वतः बँकेला घेऊन बँक व्यवस्थापक व नागरिकांन सोबत चर्चासुद्धा केली मात्र आरोग्य विभागाच्या पाठीमागे कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात काम नसल्यामुळे आरोग्य अधिकारी मात्र रोजच घेऊ शकत नाही त्यामुळे नागरिकांनी स्वतःहूनच सोशल डिस्टन्स ठेवून आपली सुरक्षा करावी मात्र असे कुठेच पाहायला मिळत नाही तर
डोणगाव येथील स्टेट बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यामुळे  पोलिस प्रशासनाने एक पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून स्थानिक भारतीय स्टेट बँकेत दिला तर मात्र यामुळे फिजिकल डिस्टन्स व गर्दी होणार नाही अशीही सुद्धा यामध्ये सुज्ञ नागरिकांची मागणी आहे.

No comments:

Post a comment