तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 3 July 2020

हिंगोली येथे कोरोना चाचणी प्रयोगशाळा उभारण्यात यावी - खासदार हेमंत पाटील


हिंगोली : प्रतिनिधी


नांदेड पाठोपाठ हिंगोली येथे सुद्धा कोरोना संसर्ग लाळ तपासणी प्रयोगशाळा उभारण्यात यावी अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे ,आरोग्य मंत्री , वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन परिषद ( आयसीएमआर ) यांच्याकडे  केली आहे .
                   दिवसेंदिवस राज्यात कोरोनाचा प्रसार वाढत असून या आजारामध्ये लवकरात लवकर रुग्णांचे  थ्रोट स्वॅबचे नमुने तपासण्यासाठी आणि तात्पुरते इलाज करण्यासाठी मराठवाड्यात नांदेड येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे, परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने हिंगोली येथे सुद्धा कोरोना संसर्ग थ्रोट स्वॅब तपासणी प्रयोगशाळा उभारण्यात यावी अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे ,आरोग्य मंत्री राजेश टोपे , वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख आणि केंद्रीय राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन परिषद ( आयसीएमआर )  यांच्याकडे केली आहे .यावेळी खासदार हेमंत पाटील म्हणाले की, यापूर्वी हिंगोली ,नांदेड आणि आसपासच्या जिल्हयातील रुग्णांच्या  लाळेचे नमुने पुणे आणि औरंगाबाद येथे तपासणीसाठी पाठविण्यात येत होते. नमुने तपासून अहवाल येण्यासाठी वेळ लागत होता, त्यांनतर  राज्यात एप्रिल महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे नांदेड येथे प्रयोगशाळा उभारण्यात आल्यामुळे काही प्रमाणात का होईना पुणे आणि औरंगाबाद येथील प्रयोगशाळांचा ताण कमी झाला आहे . हिंगोली येथे प्रयोगशाळा झाल्यास विदर्भातील काही जिल्ह्याना याचा फायदा होऊ शकतो  आणि काही तासात तपासणी अहवाल आल्यांनतर तात्काळ उपचार करता येऊ शकतील.  तपासणीसाठी लागणाऱ्या जनुकीय मटेरिअलद्वारे व्हायरसचे निदान करण्याच्या सुविधेसाठी अत्याधुनिक उपकरण यंत्रणा सुद्धा उभारण्यात यावी असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले . हिंगोली आणि नांदेड येथील प्रयोगशाळेमुळे मराठवाड्यातील आणि आजूबाजूंच्या राज्यातील जिल्ह्याना मोठा फायदा होणार आहे असे खासदार हेमंत पाटील म्हणाले.


तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment