तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 25 July 2020

डोणगाव पोलीस स्टेशन क्वारंटाईन,कारभार मेहकर कडे दिलाबुलढाणा :- 25 (जमील पठाण )

 जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोणगाव पोलीस स्टेशनमधील एका कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट पाँझिटिव्ह आल्याने अधिकाऱ्यासह सर्व ३६ कर्मचारी क्वारंटाईन करून या पोलीस स्टेशनचा कारभार मेहकर कडे देण्यात आला आहे उपविभागीय पोलीस अधिकारी डी बी तडवी यांनी ही माहिती दिली आहे. डोणगाव पो.स्टे.चा २८ वर्षी य कर्मचाऱ्याचा रिपोर्ट आज पाँझिटिव्ह आला आहे.  डोणगांव  ठाण्यात अधिकारी व कर्मचारी मिळून ३६ जण आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना मेहकर येथे कोवीड केअर सेंटर मध्ये क्वारंटाईन करण्यात येऊन त्यांच्या रँपीड टेस्ट होणार आहेत. तर पोलीस स्टेशनचा कारभार मेहकर पोलीस स्टेशन कडे देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त आज तालुक्यातील लोणी गवळी येथील ६ जणांचा रिपोर्ट पाँझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे

No comments:

Post a comment