तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 19 July 2020

डॉ. महेश कुलकर्णी यांचं हाॅस्पिटल म्हणजेच माणूसकीचं खरं दर्शन !सुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. १९ _ आलेल्या आजारी पेशंटवर उपचार करणं हे प्रत्येक डाॅक्टरांचं कर्तव्यच असतं, आणि ही माणूसकी दाखवणं हे अर्थातच रुग्णांवर उपचार करणं, ...म्हणजे चुकलं का..? गेवराई शहरातील मोंढा नाका येथील जातेगाव रोडवरील असलेलं गेवराई येथील महेश कुलकर्णी यांच हॉस्पिटल म्हणजे माणूसकीचं दर्शन घडविणांरं आहे एवढेच यानिमित्तानं सांगावं वाटतं.
            गेवराई शहरातील जातेगाव रोडवर असलेल्या कुलकर्णी हॉस्पिटल येथे गेल्या पंधरा दिवसांपूर्वी एक संशयित रुग्ण येऊन गेल्याने हे रुग्णालय सील करण्यात आले होते. मात्र सदरील संशयित रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने हे हॉस्पिटल पुन्हा सुरू करण्यात आले होते. तर यानंतर पुन्हा याठिकाणी येऊन गेलेल्या दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून काल येथील एक कर्मचारीच पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली होती. गेवराई येथील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने या हॉस्पिटलला सॅनिटाईज करून सर्व रुग्णांची माहिती देण्याचे आदेश आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आले आहेत, हे खरे असले तरी त्यात वाईट काहीच नाही हे त्रिवार सत्य आहे.
देशासह राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला असून बीड जिल्ह्यातही आता मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित आढळून येत आहेत. मागील काही दिवसात बीड येथील काही खाजगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाकडून खाजगी  दवाखान्यांना सक्त आदेश देत काळजी घेण्याची सूचना दिल्या आहेत,
      मात्र काही अपवाद वगळता अनेक खाजगी रुग्णालयात मनमानी व बेजबाबदारपणा करत प्रशासनाच्या नियमाला केराची टोपली दाखवत आहेत, परंतू गेवराई येथील कुलकर्णी हॉस्पिटलने खबरदारी घेऊन रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णालय सुरूच ठेवले हे केवळ माणूसकी समोर ठेवूनच अशी प्रतिक्रिया आमचे पत्रकार सुभाष मुळे यांना अनेकांनी दिली. मागील दोन दिवसांपूर्वी येथील एका कर्मचाऱ्याला त्रास जानवल्याने त्याचा स्वॅब पाठवल्यानंतर रात्री त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला, प्रशासनाच्या वतीने डॉक्टरांना हॉस्पिटल सॅनिटाईज व तपासणी केलेल्या रुग्णांची माहिती मागवली, अशा अवस्थेत चांगली सेवा लक्षात घेऊन गरजू व विश्वास असलेल्या लोकांच्या हितासाठी डॉ. महेश कुलकर्णी यांनी आपली वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली याबद्दल त्यांचे रुग्णांच्या वतिने आभार मानले जात आहे.

╭══════════════╮
   🖋 सुभाष मुळे 🖋 पत्रकार
   !! _मो. 94 2224 3787_ !!
╰══════════════╯

3 comments:

  1. खरच डॉ चे कौतुक करावे तेवढे कमीच आहे,अभिनंदन

    ReplyDelete
  2. खरच डॉ चे कौतुक करावे तेवढे कमीच आहे,अभिनंदन

    ReplyDelete
  3. खूप छान काम करत आहे सर गेवराई तालुक्यात

    ReplyDelete