तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 18 July 2020

खासदार हेमंत पाटील यांच्या मागणीला यश ; हिंगोली येथील हळद संशोधन बोर्डाबाबत २२ जुलै रोजी कृषी मंत्र्यांसोबत बैठकहिंगोली प्रतिनिधी 

हिंगोली : हिंगोली येथे हळद संशोधन व प्रक्रिया महामंडळ स्थापन करण्यात  यावे या खासदार हेमंत पाटील यांच्या मागणीला राज्यसरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला असून या बाबतीत येत्या २२ जुलै रोजी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरसींग द्वारे बैठकीचे  आयोजन केले आहे. 

खासदार हेमंत पाटील यांनी केलेल्या मागणीला यश आले असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे . 
                   जानेवारी महिन्यात विजयवाडा येथे संसदीय वाणिज्य समितीची बैठक पार पडली होती, या बैठकीत खासदार हेमंत पाटील यांनी  हिंगोली जिल्हा हळद उत्पादनात आघाडीवर असून जिल्ह्यात हळदीची मोठी बाजारपेठ आहे व केंद्र शासनाने देशाच्या भागात त्या त्या पिकाच्या उत्पादनानुसार कॉफ़ी , चहा, मसाले बोर्ड स्थापन करून उद्योग व्यवसायाला चालना दिली आहे ही  बाब लक्षात घेता , हिंगोली येथे हळद संशोधन व प्रक्रिया महामंडळ स्थापन करण्यात यावे अशी मागणी केली होती . त्यांनतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे  व कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता व राज्य शासनाकडून यावर विचारविनिमय करण्यात येऊन केंद्राकडे प्रस्ताव दाखल करावा अशी मागणी केली होती .  हिंगोली जिल्ह्यालगत असलेल्या नांदेड, परभणी , यवतमाळ जिल्ह्यात किमान दहा लक्ष एकरवर  हळदीची लागवड करण्यात येते. या भागातील शेतकऱ्यांचा हळद पिकाकडे मोठा कल असून, हे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न देणारे पीक आहे. सोबतच करक्यूमीन कंटेंट हळदीमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने याचे संशोधन आणि संवर्धन करून त्यावर प्रक्रिया होणे गरजेचे आहे. हिंगोली जिल्ह्यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत  शेकडो एकर  जमीन  अनेक ठिकाणी उपलब्ध आहे . म्हणून  यावर विचार व्हावा असे खासदार हेमंत पाटील म्हणाले होते . 
याबाबत राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद देऊन येत्या २२ जुलै रोजी राज्याचे  कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ  कॉन्फरसींगद्वारे बैठकीचे आयोजन केले आहे. सोबतच राज्याच्या फलोत्पादन विभागाला सुद्धा हळद संशोधन बोर्डाच्या  अनुषंगाने लागणाऱ्या सर्व बाबी तात्काळ पुरविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत . या बैठकीचा रितसर तपशील  खासदार हेमंत पाटील यांना प्राप्त झाला आहे .

तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment