तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 21 July 2020

_उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे वाढदिवसानिमित्त आयोजित सेवासप्ताह_ आज आॅनलाईन निबंध स्पर्धा ; स्पर्धकांनी निबंध पाठवण्याचे आवाहनपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
      राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार  व सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे  यांच्या वाढदिवसानिमित्त 15 ते 22 जुलै दरम्यान आयोजित सेवा सप्ताहात आज(दि.२२) आॅनलाईन निबंध स्पर्धा होणार आहे. स्पर्धकांनी निबंध पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
      लॉकडाउनचा काळ अधिक सुसह्य आणि आनंदी जावा म्हणून अबाल वृद्धाकरिता विविध ऑनलाईन स्पर्धा सेवासप्ताहात आयोजित केल्या आहेत. यामध्ये आॅनलाईन निबंध स्पर्धा होणार आहे. स्पर्धा ऑनलाईन असून खुल्या गटासाठी आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना गौरवपत्र आणि आकर्षक भेटवस्तू देण्यात येईल विजेत्यांना भरघोस बक्षिसे दिली जातील. लाॅकडाउनमध्ये अनुभवलेले जीवन व कोरोनानंतरची आव्हाने व उपाययोजना या विषयावर आज,(दि.२२) निबंध  स्पर्धा  होत असुन आपले ६०० शब्द मर्यादेपर्यंत चे निबंध लक्ष्मण वाकडे मो..क्र.९८८१२४४०७५ व गोपाळ आंधळे मो. क्र. ९८२३३३५४३९यांच्याकडे पाठवावेत. कोणत्याही एका विषयावर आपले निबंध स्पर्धेसाठी पाठवावेत.

      ऑनलाईन स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व सर्व पदाधिकारी, सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळीच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a comment