तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 1 July 2020

परळी नगर परिषदेचे अधिकारी झोपेत आहेत का? - श्रीकांत पाथरकरपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
     शहरात पावसाच्या पाण्यामुळे जागो जागी खड्डे पडलेले होते.नागरिकांना कसरत करून पुढे जावे लागत होते.ते आता कमी होते की काय म्हणून त्या खड्ड्यात नगर परिषद कर्मचार्यांनी मुरूम च्या ऐवजी भले मोठाले दगड आणून टाकलेले आहेत.गेल्या दोन दिवसांपासून नागरीकांना अडचणीचा सामना करावा लागतो आहे.लवकरात लवकर दगडांची दबई करण्यात यावी अन्यथा मनसे च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाउपाध्यक्ष दत्ता दहीवाळ,तालुका अध्यक्ष श्रीकांत पाथरकर,शहरअध्यक्ष वैजनाथ कळसकर,शहरउपाध्यक्ष महेश शिवगन,शहरउपाध्यक्षविठ्ठल झिलमेवाड, सुमित कलशेट्टी,श्रीहरी दहीफळे,माणीक लटींगे आदींनी दिला.

No comments:

Post a comment