तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 1 July 2020

वारी चुकण्याचा आयुष्यातील पहिला प्रसंग –ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटेपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
महाराष्ट्राच्या वारकरी सांप्रदायाला हजारो वर्षांची जाज्वल्य परंपरा आहे. लोकप्रबोधनाची पहिली चळवळ ही वारकरी चळवल आहे. दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविकांचा मेळा पंढरपूरी विठ्ठलाच्या दरबारात जमत असतो. महिनाभर शेकडो किलोमिटर चालत जावून विठ्ठलभक्तीचे दर्शन घडवणारे पाय यंदा थांबले आहेत, दिंड्या कुठे दिसत नाहीत, माऊलींच्या आणि तुकोबांच्या पादुका बसने पंढरपूरला जात आहेत हे पाहून कंठ दाटून आला. माझ्या आयुष्यातील वारी चुकण्याचा पहिला प्रसंग आहे असे भावूक मत अखिल भारतीय वारकरी मंडळाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांनी व्यक्त केले.
कोरोना आजारामुळे संपर्ण जग परेशान आहे. लाखो लोकांना आपला जीव या आजारामुळे गमवावा लागला आहे. भारतातही हे संकट ओढवल्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊन लावण्यात आले आहे. सगळंकाही जागच्या जागी थांबलं असून, मंदीरातही दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. यावर्षीच्या आषाढी वारीवरही हे संकट आलं आहे. या आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी यंदाची वारी रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. गर्दी टाळण्यासाठी जरी हा निर्णय घेण्यात आला असला तरी हे चित्र डोळ्याला पाहवत नाही. वारीला गेल्याशिवाय जीवाला चैन पडत नाही, यंदाची वारी चुकत असल्याने मनाला वाईट वाटत आहे. आषाढी वारीच्या निमित्त पांडुरंगाला एवढीच विनंती की, बा पांडुरंगा सबंध मानवजातीवर आलेले हे संकट दूर कर आणि आपला महाराष्ट्र लावकरात लवकर कोरोनामुक्त होऊ दे असे साकडे ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांनी घातले आहे.

No comments:

Post a comment