तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 22 July 2020

स्वयम् शिक्षण प्रयोग अंतर्गत महिलांचे हक्क अधिकार आणि कायदे विषयक माहिती कार्यशाळा संपन
आकाश लश्करे
उस्मानाबाद 


 आज दि. 22/07/2020 रोजी अडव्होकॅटे ज्योती वाघे मॅडम जिल्हा सत्र न्यायालय उस्मानाबाद यांनी महिलांना खालील विषयावर सखोल माहिती आणि मार्गदर्शन केले यामध्ये
"महिलांचे  हक्क अधिकार  आणि कायदेविषयक माहिती कार्यशाळा " मध्ये शैक्षणिक, सामाजिक, कौटुंबिक, हक्क, अधिकार,मालमत्ता कायदा,  कौटुंबिक हिंसाचार, फसवणूक, इत्यादी विषयावर सखोल मार्गदर्शन  करून उपस्थित महिलांच्या सोबत प्रश्नोत्तरे करण्यात आली या विषयावर झुम च्या माध्यमातून महिलांची  ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात आली  कार्यशाळेसाठी स्वयम् शिक्षण प्रयोग च्या नेटवर्क मधील उस्मानाबाद जिल्ह्यातील गावपातळीवरील, परिसर, तालुका , आणि जिल्ह्यातील सर्व लिडर्स महिला सहभागी झाल्या होत्या आणि लातूर व सोलापूर जिल्ह्यातील लिडर्स पण सहभागी झाल्या होत्या एकूण 200 ते 250 माहीला सहभागी होत्या
 तसेच प्रमुख उपस्थिती कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर च्या वर्षा मोरवळकर मॅडम  उपस्थित होत्या यांनी पण महिलांना मार्गदर्शन केले
कार्यक्रम प्रस्थाविक स्वयम् शिक्षण प्रयोग च्या वेली नेटवर्क  लीडर देवकन्या जगदाळे यांनी केले तर कार्यक्रमाची पूर्वतयारी जिल्हा लिडर्स कमिटी उस्मानाबाद यांनी केली.आणि जयश्री कदम यांनी सर्वांचे आभार मानले.

No comments:

Post a comment