तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 28 July 2020

दोन दिवसात तीन वृद्ध रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू


बीड : जिल्ह्यात रविवारपासून तीन वृद्ध रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यापैकी दोन रुग्ण माजलगाव तालुक्यातील तर एक परळी तालुक्यातील आहे. मृतात दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.

रविवारी सकाळी माजलगाव तालुक्यातील खतगव्हाण येथील ७० वर्षीय वृद्धाचा अंबाजोगाई येथे मृत्यू झाला. सोमवारी पहाटे जे ३४ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत त्यात संबंधित वृद्ध रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना अत्यवस्थ अवस्थेत शनिवारी स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान याच दिवशी पहाटेच्या रिपोर्टमध्ये  कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या नवीन वसाहत, भाटवडगाव , (ता.माजलगाव) येथील ८० वर्षीय महिला रुग्णाचा सोमवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात मृत्यू झाला. परळी जीरेवाडी येथील ६६ वर्षीय कोरोनाग्रस्त महिलेवर मागील दहा दिवसापासून उपचार सुरु होते. त्या महिलेचा आज (दि. २८) सकाळी ७.३० वाजता स्वाराती रूग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता २७ झाली आहे.

No comments:

Post a comment