तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 29 July 2020

बन गावातील रस्ते चिखलमय ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्षहिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

सेनगाव तालुक्यातील जिल्ह्याच्या अंतिम टोक वर वसलेले चौदासे ते पंधराशे मतदान असलेले बन हे गाव  एकीकडे आपला भारत देश हा डिजिटल देश म्हणून वाटचाल करीत असताना दुसरीकडे या बन गावातील ही रस्त्यांची दुरवस्था... गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून ना या गावात नवीन रस्ते आले ना रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली ना या गावाला बस येते एक साधारण जरी पाऊस पडला तरी ओझे घेऊन तर सोडाच परंतु माणसाला रिकामे सुधा चालणे कठीण झाले आहे ना या गावात गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून जिल्हा परिषद सदस्य आले ना पंचायत समिती सदस्य आले ना आमदार आले ना खासदार आले हे पुढारी मंडळींना हे गाव दिसते ते फक्त एका दिवसासाठी तो दिवस म्हणजे इलेक्शन जाहीर झाले की प्रचार करण्यासाठी येणे कारण येथील गावात मतदानाची पहिली पेटी फुटते त्यामुळं हे गाव विकासापासून कोसो दूर लोटले जाऊ लागले आहे त्यामुळं या रस्त्यांची दुरवस्था दूर होणे अत्यंत गरजेचे आहे हीच ग्रामस्थांच्या वतीने मागणी करण्यात येत आहे


तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment