तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 23 July 2020

" सह्याद्री मित्र मंडळाचे आशा स्वयंसेविकाना सहकार्य "


महाराष्ट्रराज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या "राष्ट्रीय अभियानांतर्गत महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण भागात एकुण ७२००० आशा स्वयंसेविका
कार्यरत आहे.शहरातील झोपडपट्ट्या असो की ग्रामीण भागातील वाडी वस्ती, राज्याच्या कानाकोप-यात सार्वजनिक आरोग्याच्या प्रतिनिधी म्हणुन गेली कित्येक वर्षे कार्यरत आहे.
सध्याच्या कोरोनाच्या साथीत स्वतःचा जीव धोक्यात घालुन फार उत्तम काम करत आहे. अस असताना देखील त्यांना त्यांच्या तुटपुंज मानधनासाठी जिवावर बेतनारे काम करावे लागते. कोविड च्या विळख्यात अडकलेल्या रुग्णांना दवाखान्यात  घेऊन जाणे, रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तिंना १४ दिवसांसाठी वेगळे ठेवणे, रुग्णवाहिनी बोलावणे, फवारणी करुन घेणे अशी काम करावी लागतात व याच अनुषंगाने गोरेगाव येथील सह्याद्री मित्र मंडळातर्फे विभागातील अशा स्वयंसेविकाना ( प्लॅस्टिक पॉलिथिन गणवेश,हातमोजे,गॉगल,मास्क,फेसशील्ड, छत्री व सानिटायझर देण्यात आले.यावेळी स्थानिक शाखाप्रमुख अजित भोगले,सामाजिक कार्यकर्ते विशाल येरागी,अनिल दळवी,सचिन बागवे ,दत्ताराम सावंत,प्रसाद कदम सूर्यकांत सालम,अमोल अपरात,चेतन सरफरे दीपक,गोलतकर सौरभ गाडगीळ उपस्थित होते.या उपक्रमासाठी निखिल जाधव,तामिल मारन एचआरएस मंडळाचे विशेष सहकार्य मिळाल्याची माहिती सहयाद्रीचे संस्थापक सचिन चव्हाण यांनी दिली.

No comments:

Post a comment