तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 26 July 2020

पोषण आहार परस बागेचे महत्त्व सांगून महिलांना केले आरोग्याविषयी जागृती
आकाश लश्करे
उस्मानाबाद

कोतल शिवणी तालुका निलंगा जिल्हा लातूर येथे राहणाऱ्या दैवशाला तानाजी वनटे, घरची परिस्थिती एकदम बिकट आणि सहा बहिणी मधून यांना आई-वडिलांनी शिक्षण करण्यास पुढाकार घेऊन शिकवले आणि त्यानंतर लग्न करून दिले शेती एक एकर आणि तीही कोरडवाहू त्यांना एकूण मुले दोन आणि आणि घरामध्ये बसून राहण्यापेक्षा काहीतरी करावे असे धडपड यातूनच त्यांनी ब्युटी पार्लर शिलाई याचं प्रशिक्षण घेऊन आपला छोटासा व्यवसाय सुरू केला त्यानंतर स्वयं शिक्षण प्रयोग शासकीय अन्नसुरक्षा शेती या प्रकल्पामध्ये एक लीडर म्हणून सुरुवातीला गांडूळखत दशपरणी निमार्क याचं प्रशिक्षण घेतलं आणि त्यांना शेती विषयी गोडी निर्माण झाली अगोदर त्यांनी शेती दुसऱ्याला लावलेली होती पैशामध्ये त्या प्रशिक्षणानंतर त्यांनी ठरवलं की शेतीही स्वतः करावी आणि त्यानंतर त्यांनी शेती स्वतः करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या लक्षात आले की नदी अन्नधान्य पिकापेक्षा भाजीपाला आणि कडधान्य याचा जर उत्पादन घेतलं तर शेतीला पूरक असा व्यवसाय उभा राहू शकतो म्हणून त्यांनी वीस गुंठे क्षेत्रात भाजीपाला लागवड केला. त्याच बरोबर घराशेजारी छोटीशी परसबाग करण्यासाठी महिलांना प्रवर्तक करण्यास सुरुवात केली. त्यासाठी परस बागेची विशिष्ट रचना करून प्रत्येक भाजीपाला हा आठवड्यात लहान लेकरांच्या व महिलांच्या आरोग्यासाठी निराळे अन्न घटक व जीवनसत्वे मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे असते असे महिलांना सांगू लागल्या.
त्यासाठी सखी अन्नसुरक्षा शेती प्रकल्पामध्ये प्रशिक्षणामध्ये सांगितलेल्या परसबाग नियोजन आराखड्याचा उपयोग करून त्यांनी महिलांना तो आराखडा प्रत्येकाच्या परसबागेसाठी तयार करून देण्यास सुरुवात केली आणि त्यातूनच गावातील 20 महिलांनी त्या आराखड्याप्रमाणे परसबाग तयार केली आणि त्या महिलांना लक्षात आले की घरातील सांडपाण्यावर आरोग्यास उपयोगी व पैसे पण बचत होण्यासाठी ही परसबाग खूप महत्त्वाची आहे आणि त्या सर्व परसबागेच्या शेतावर जाऊन महिलांना तो आराखडा काढून देत त्याचं महत्त्व सांगत आहेत. त्याच बरोबर भाजीपाला विक्री शिवणकाम, स्टेशनरी व ब्युटी पार्लर या व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःचा उदरनिर्वाह व लहान लेकरांच्या शिक्षणासाठी मदत करून दैवशाला वनवे त्यांच्या परिवाराचा मजबूत कणा बनल्या आहेत.
भविष्यामध्ये त्यांना सेंद्रिय शेती करण्यासाठी जास्तीत जास्त महिलांना प्रवर्तक करण्या चे उद्देश मनाशी बाळगून आहेत

No comments:

Post a comment