तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 20 July 2020

कोरोना फक्त वाईटच का.....???
कोरोना मुळे किती तरी परिवार उध्वस्त झाले आणि काही काही परिवार च नाही तर जगातील ८०% देश त्रस्त झालेत त्यामुळे तो वाईट आहे हे काळ्या दगडावरची पांढरी रेश आहेच पण काहीही कितीही बोलल तरी कोरोना ने किती तरी चांगल्या गोष्टी घडवलेल्या आहेत त्या नाकारता येणार नाहीत....

भारता सारख्या देशात...
१) सुरुवात झाली घरात बसण्या पासून गोष्ट म्हणायला गेल तर तशी छोटीच आहे पण....
घरात न बसता उगाच कुठे तरी बोंबलत फिरायच आपल्या मुळे दुसऱ्यांना त्रास देत वायफळ खर्च करत फिरायच....
ते बंद झालं आता लॉक डाऊन सुरुवाती पेक्षा बऱ्या पैकी सौम्य झालाय पण बरेच लोक फक्त महत्त्वाच्या कामाला बाहेर पडतायेत पुण्या (लोक ज्याला सिटी म्हणतात) सारख्या ठिकाणी तर बाजारपेठा उघड्या झाल्या असून लोकांची गर्दी नाही....
२) कारोना आला लोकांचं स्वतः च्याच घरात पुरेपूर नसलेला वावर एकमेकांना वेळ न दिल्या मुळे होणाऱ्या उणीवा बऱ्या पैकी कमी झाल्या.... प्रत्येकजण आपल्या आपल्या परिवाराला वेळ देवू लागला...आजच्या शहरी वातावरणात दगदगीच्या जीवनात मुलांना आई बापांची मनमोकळीक पने भरपूर साथ मिळाली....
३) म्हातारे आई वडील काही गोड मुलांना नको नको झालेले असतात.... या वाईट काळात त्यांची सांगत लाभल्याने त्यांची या आयुष्यात असलेली किंमत कळाली....
४) सगळेच नाही म्हणणार पण किती तरी असे लोक असतात ज्यांना पैशांची किंमत नसते त्यांना आणि सर्वांनाच पैशाची किंमत कळाली....
५) एक बाप आपल्या मुलीच्या लग्नासाठी मुलीचा जन्म झाल्या पासून १--१ रुपया जमा करत असतो तरी आजच्या महागाईच्या काळात तो पुरत नाही... शेकड्याने लोक काही वायफळ खरच नको नको तो पैशाचा दिखावा अश्या अनेक गोष्टी. आज या कोरोनाच्या वेळी लग्न करायचे असल्यास फक्त पन्नास जणांच्या उपस्थितीत लग्न सोहळे अतिशय आनंदात पार पडत आहेत आणि मुलीच्या लग्नात कर्जबाजारी होणाऱ्या बापंची संख्या थोडी थोडकी का होईना पण कमी झाली आहे....
६) मंदिरांला टाळी लागली त्यामुळे ब्राह्मण भट्टांची अनेक काम बंद पडली... माणूस मेला तरी लोक त्याझ्या आत्म्याच्या शांती साठी हजारोंनी खर्च करायचे तो मेला की त्याझ्या सरणावर जण्या पासून त्याझ्या वर्षश्राद्ध पर्यंत जेवण भोग पूजा देव दर्शन आणि बरच काही ते बंद झालं आणि मेलेल्यांच्या आत्मा त्या गोष्टी नसल्या तरी आनंदाने स्वर्गात जात आहेत....
७) आणि या मुळेच माणसाला आयुष्याची, आयुष्यात असलेल्या माणसांची , पैशाची , वेळेची , किंमत चांगलीच कळली.....
८) अनेक सामाजिक सुधारणा घडल्या किंवा त्या घडायला सुरुवात तरी झाली अस नक्कीच म्हणता येईल...
९) नकारात्मकत दृष्टिकोनामुळे देखील समाजात चाललेल्या अनेक विकृत पद्धती समोर आल्या... त्या सुधारणे साठी अनेक लोकांनी स्वतः पासून सुरुवात केली...


शेवटी सांगायचं फक्त एवढच की प्रत्येक गोष्ट नकारात्मक दृष्टिकोनातून न पाहता त्याच गोष्टी थोड्या थोडक्या का होईना सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून बघा... तुमच्या मता मधे नक्की फरक पडेल .....


 
    लेखक: बाबासाहेब कुकडे
    मो: ७५०७१८१८७३

No comments:

Post a comment