तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 22 July 2020

हिंगोली हळद बोर्डासाठी कृषीमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद ; खासदार हेमंत पाटील यांच्यासह अभ्यास समिती स्थापन करून अहवाल सादर करणार


हिंगोली प्रतिनिधी

हिंगोली येथे हळद संशोधन व प्रक्रिया महामंडळ स्थापन करण्यात  यावे या खासदार हेमंत पाटील यांच्या  मागणीला राज्यसरकारने आज कृषीमंत्री दादाजी भुसे  यांच्या अध्यक्षतेखाली  आयोजित केलेल्या व्हिडिओ कॉन्फरसींग बैठकीमध्ये त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून हिंगोली जिल्हा व आजूबाजूच्या भागातील हळदीचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करून अहवाल मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात येईल. या समितीमध्ये अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून खासदार हेमंत पाटील यांचा समावेश असेल हे कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केले.
                   हिंगोली जिल्ह्यात हळदीचे एकूण उत्पादन क्षेत्र 41 हजार 538 हेक्टर असून सुकलेल्या हळदीचे एकूण उत्पादन 1 लाख 74 हजार 460 मे.टन  दरवर्षी होत असल्याने व किमान 90 टक्के हळदीच्या सेलम जातीच्या वाणाची लागवड करत असल्याने व जिल्ह्याच्या शिरड शहापूर येथून हळदीचा कोचा (मदर रायझोम ) मोठ्या प्रमाणात बाहेर देशात आणि राज्यात निर्यात केला जातो. यासर्व  बाबी लक्षात घेता  हिंगोली येथे हळद संशोधन व प्रक्रिया महामंडळ स्थापन करण्यात यावे अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी जानेवारी 2020 मध्ये  विजयवाडा येथे पार पडलेल्या संसदीय वाणिज्य समितीच्या  बैठकित केली होती,ज्याप्रमाणे देशाच्या विविध भागात  केंद्र शासनाने पिकाच्या उत्पादनानुसार कॉफ़ी , चहा, मसाले बोर्ड स्थापन करून उद्योग व्यवसायाला चालना दिली आहे त्याप्रमाणे हिंगोली येथे हळद संशोधन व प्रक्रिया महामंडळ स्थापन करण्यात यावे अशी मागणी केली होती . त्यानुसार केंद्र सरकारने सांगितले की राज्य सरकारने रीतसर अभ्यासपूर्ण अहवाल तयार करून केंद्राकडे पाठविल्यास पुढील कार्यवाही करण्यात येईल. त्यांनतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे , व कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे खासदार हेमंत पाटील यांनी या अनुषंगाने वारंवार भेटी घेऊन  पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता व राज्य  शासनाकडून यावर विचारविनिमय करण्यात येऊन केंद्राकडे प्रस्ताव दाखल करावा अशी मागणी केली होती .  याच प्रक्रियेतील पहिले पाऊल म्हणून आज (22 रोजी ) राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत राज्याचा कृषी , फलोत्पादन विभाग, खासदार हेमंत पाटील,  परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ , हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय आदींचा सहभाग होता. यावेळी बोलताना खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थिती आणि हळद उत्पादनाची माहिती कृषी मंत्र्यांपुढे मांडून जिल्ह्यात हळद संशोधनासाठी जागेची कुठे कुठे उपलब्धता आहे याची माहिती  देऊन हे संशोधन व संवर्धन महामंडळ जिल्ह्याच्या विकासा करिता किती महत्वाचे आहे हे स्पष्ट केले.  यावर कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी खासदार हेमंत पाटील यांच्या कार्याचे कौतुक करत तुमच्या सारख्या अभ्यासपूर्ण लोकप्रतिनिधींची मतदार संघाला गरज असल्याचे म्हणाले.  ते पुढे म्हणाले की, हिंगोली जिल्ह्यातील हळदीचे लागवड क्षेत्र ,एकूण उत्पादन , होणारी आर्थिक उलाढाल लक्षात घेत त्याकरिता एक अभ्यास समिती स्थापन करण्यात येईल यासमितीचा आलेला अहवाल मुख्यमंत्री , राज्यसरकार कडे सादर करण्यात येऊन पुढील निर्णय घेण्यात येतील व या समिती मध्ये खासदार हेमंत पाटील यांच्यासारख्या अभ्यासू लोकप्रतिनिधीचा, हळद उत्पादक शेतकऱ्यांचा  समावेश  असेल. आज झालेल्या बैठकीमुळे हिंगोली येथे होणाऱ्या हळद संशोधन महामंडळाच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला असून जिल्ह्याचे नाव  हळद उत्पादनात  जागतिक स्तरावर नक्कीच जाईल यात दुमत नसल्याची चर्चा सर्वत्र होत असून खासदार हेमंत पाटील यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.


तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment