तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 2 July 2020

मंठा येथील एकतर्फी प्रेमातून हत्या करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा देण्याची मागणी


शहरातील नागरिकांचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

जिंतूर प्रतिनिधी 
जालना जिल्ह्यातील मंठा येथे भर दुपारी एका विवाहितेचा एकतर्फी प्रेमातून भर रस्त्यात हत्या करणाऱ्या आरोपीचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून नराधमास फाशीची शिक्षा देण्याची मागणी शहरातील सुजान नागरिकांनी दिनांक 2 जुलै रोजी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मंठा शहरातील संशयीत आरोपी शेख अल्ताफ शेख बाबू हा मागील अनेक दिवसांपासून एकतर्फी प्रेमातून सतत त्रास देत असे यामुळे त्या मयत  मुलीच्या आई वडिलांनी समजावून सांगीतले होते मात्र त्याने तिला त्रास देने काही बंद केले नाही घरचा बाहेर पडताच छेड काढणे वाढले होते दरम्यान रोजच्या त्रासाला कंटाळून घटनेच्या पाच दिवस अगोदरच तिचे लग्न लावून दिले होते हाच राग धरून संशयीत आरोपीने 30 जून रोजी भर रस्त्यात चाकूने वार करून तिची अमानुषपणे हत्या केली असल्याने पुरोगामी महाराष्ट्राच्या मातीला काळीमा फासणारी घटना आहे मागील अनेक दिवसांपासून महिला व मुलीच्यावर हत्या,बलात्कार करण्याच्या घटनेत दिवसेन दिवस वाढ   होते आहे यामुळे कायद्याचा वचक राहिला नसल्याचे दिसून येत आहे 
म्हणून असल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येत आहे असल्या नराधमाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालून फाशीची शिक्षा देण्याची मागणी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या निवेदनावर सचिन देशमुख,सुनील गाडेकर,बालाजी शिंदे सोसकर,बाळासाहेब काजळे,नागेश आकात,मंगेश कुर्हे,सुनील डोंबे,पवन देवकर,विजय भांबळे,दत्तराव कटारे, दीपक डोंबे, संतोष पारेकर,अतुल कोकडवार,नितीन दांगट,रमेश धोत्रे आदींचा सह्या आहेत

No comments:

Post a comment