तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 21 July 2020

स्व नितिन महाविद्यालयाच्या वतीने जलमंदिरावर वृक्षारोपन
प्रतिनिधी
पाथरी:-शहरातील स्व नितिन महाविद्यालयाच्या वतीने तालुक्यातील वाघाळा येथे प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी जलमंदिर काठावर प्राचार्य डॉ राम फुन्ने यांच्या मार्गदर्शना खाली मंगळवार २१ जुलै रोजी वृक्ष लागवड करण्यात आली.

या वेळी प्रा डॉ साहेब राठोड, प्रा डॉ शितल गायकवाड, रासेयोचे प्रमुख प्रा मधूकर ठोंबरे, आयक्यूएसीचे प्रमुख प्रा डॉ भारत निर्वळ,प्रा डॉ हरी काळे, प्रा मधूकर ठोंबरे, किरण घुंबरे आणि माजी विद्यार्थ्यी या वेळी उपस्थित होते. गेली चार वर्षा पासून स्व नितिन महाविद्यालय जन्मभूमी फाऊंडेशनच्या सहकार्याने वाघाळा गावात वृक्ष लागवड आणि संवर्धनाचे काम करत आहे. गत वर्षी जन्मभूमी  फाऊंडेशन ने लोकसहभागातून जलमंदिर (बंधारा) बांधला या जलमंदिरावर या वर्षी मोॆठ्या प्रमाणात फळवृक्ष लागवड करण्यात आली आहे. मंगळवारी स्व नितिन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राम फुन्ने यांच्या मार्गदर्शनात जलमंदिर काठावर पन्नास फळ वृक्षाची लागवड करण्यात आली या वेळी या वृक्ष संवर्धनाची जबाबदारी वाघाळा गावातील महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी घेतली. या पुर्वी लागवड केलीली रोपे आता मोठ मोठ्या वृक्षात रुपांतरीत झाले असल्याने दरवर्षी वृक्ष लागवडी साठी उत्साह व्दिगुनित होत असल्याचे या वेळी महाविद्यालयाच्या टिमने प्रतिक्रीया दिली.

No comments:

Post a comment