तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 25 July 2020

दुचाकी अपघात प्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा दाखल


मंगरुळपीर - रस्ता कामात सुचनाफलक न लावल्याने झालेल्या दुचाकी अपघातामुळे वाहनाचे नुकसान होऊन फिर्यादी जख्मी झाल्याने पोलिसांनी कंत्राटदारावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी शरद येवले रा शहापूर यांनी पोलिसांत तक्रार दिली की,ता २१ रोजी रात्री दहा वाजताचे सुमारास फिर्यादी हे औषधी घेऊन घरी जात असतांना सुधाकर देशमुख रोहणेकर यांचे घरासमोरील रस्त्याचा खड्डा न दिसल्याने फिर्यादी हे दुचाकी क्र एम एच ३७ ७४४९ सह खड्ड्यात पडले त्यामुळे स्वतः जख्मी होऊन वाहनाचे नुकसान झाले. सदर रस्त्याच्या कंत्राटदाराने याठिकाणी सुचनाफलक न लावल्याने हा अपघात झाला.अशा तक्रारीवरून पोलिसांनी स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन चे कंत्राटदार भास्करराव माने यांचेवर कलम ३३७,३३८ भादवी नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार धनंजय जगदाळे यांचे मार्गदर्शनात पीएसआय मंजुषा मोरे,हेकॉ अरविंद सोनोने करीत आहेत.

फुलचंद भगत,वाशिम

No comments:

Post a comment